Posts

Showing posts from October, 2020

'कुतूहल 'भुलाबाई च्या गाण्यांचे,कोजागिरी पौर्णिमेचे,पूर्ण चंद्राचे.....

Image
              आज अश्विन पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा बऱ्याच कथा आहेत या दिवसाच्या. आज कोजागिरी ,(को जाग री) पौर्णिमा आहे. आजचा पूर्ण चंद्र नेहमीपेक्षा 14% आकाराने मोठा व  नेहमीपेक्षा 35% जास्त शुभ्र असणार आहे. वर्ष भरात आज, अंतराने, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असणार आहे. मानवी शरीरात एकूण 60,% पाणी असते. त्याचे मेंदू व हृदयात प्रमाण 73% असते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवरील सागरावर ज्याप्रमाणे परिणाम होतो व भरती येते तसाच मानवी शरीरावर सुद्धा होतो. त्यामुळे आज रात्री तरुण पिढी जास्त बहकते तर निराश मनाची व्यक्ती स्व नाशाकडे जास्त झुकते. दोन्ही प्रकारच्या व्यक्ती सांभाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रम आयोजित करून  बदाम , केशर सारखे मसाला दूध पिण्याचा कार्यक्रम करतात. दम्याच्या आजारावरचे औषध सुद्धा या रात्री कोजागिरी च्या दुधातून घेतात. जडीबुटीपासून केलेली पावडर आणि शरद पौर्णिमेला पडणारी चंद्राची किरणे याचे मिश्रण म्हणजे हे औषध. त्यामुळे ते वर्षातून एकदा फक्त कोजागरीच्याच रात्री दिले जाते. 2020 मधील 13 पौर्णिमा खालीलप्रम...

'कुतूहल'बहुगुणी आपट्याचे/आपट्याच्या पानांचे☘️.....

Image
              आज विजयादशमी . या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पण, या आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व फार कमीजणांना ठाऊक आहे. तेव्हा, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया. आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो,टॅनिन ही मिळवले जाते. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. 'अश्मंतक' म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच 'अश्मंतक' याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ ...

'कुतूहल' रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या अन्नघटकांचे.......

Image
                       हिमोग्लोबिन(haemoglobin)हा रक्तातील महत्वाचा घटक असून.तो लोह(iron) आणि प्रोटीन(protein) यापासून बनलेला असतो.साधारणपणे रक्तामध्ये12ते14.5ml इतके हिमोग्लोबीन चे प्रमाण आवश्यक असते.मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्यामुळे ते ऍनिमिया ला बळी पडतात.डेंग्यू मलेरिया सारख्या आजारात हमखास हिमोग्लोबिन कमी होते.डॉक्टर त्यावर उपाय म्हणून लोह आणि प्रोटीन च्या गोळ्या देतात.मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते.अशावेळी तुमच्या सकस आहारातील पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात.....  ☘️पालक-पालकाचा तुमच्या आहारात समावेश असणं महत्वाचे आहे.पालकमुळे रक्तातील iron लोह वाढण्यास मदत होते.सुप्स, भाजी, पालकवड्या, पालक पराठा,आमटी, सलाड कोणत्याही स्वरूपात आपण ती खाऊ शकतो, पालकपनीर तर मस्तच.... पालकवर लिंबू पिळून खाल्ल्याने त्यातील लोह अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण होते. 🍊संत्रा-संत्र्यामधील व्हिटॅमिन 'c'आणि व्हिटॅमिन B6रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठ...

'कुतूहल' रक्तातील महत्वाचा घटक...प्लेटलेट्स platlets चे........,💉

Image
                                आता आपण बरेचदा म्हणजे पावसाळा संपत आला  की ऐकून असतो प्लेटलेट्स /पेशी कमी झाल्या म्हणून. कारण मलेरियाच्या डासांची संख्या ह्यावेळी जास्त वाढलेली असते. कालच एका मैत्रिणीने सांगितले माझ्या मुलाला Dengue maleria झाला त्याच्या पेशी कमी झाल्या .मुलाला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये होती.तेव्हा म्हंटले की असावी थोडी फार माहिती सर्वांनाच प्लेटलेट्स विषयी. plasma प्लाझ्मा प्रमाणे platelets देखील रक्तातील महत्वाचा घटक आहे. रक्त पातळ होवू न देण्याचं तसच रक्तवाहिन्याना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम  या  प्लेटलेट्स करतात.या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना'प्लेटलेट्स'हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसठी वैद्यकीय भाषेत 'थ्रोम्बोसाईट्स'ही संज्ञा वापरली जाते.      ह्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्यांना "मानवी शरिराची कवचकुंडलं "असे देखील म्हटले जाते कारण शरीरात जखम झालेल्या ठिकाणी ह्या प्लेटलेट्स आणि ...

'कुतूहल 'शुद्ध शाकाहारी पदार्थांचे.....

Image
                         हिरव्या आणि ताज्या रोज खाव्या भाज्या, पालेभाज्या घ्या मुखी आरोग्य ठेवा सुखी,भाजीपाल्याचे एकच महत्व स्वस्तात मिळेल भरपूर सत्व अश्या म्हणी आपण ऐकत असतो आणि ते अगदी खरं आहे. आपण सर्वच जाणतो की अंडी, मांस यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन protein असते, जे की शरीर बांधणीसाठी आवश्यक असते, उपयुक्त असते. परंतु शुद्ध शाकाहारी लोकांनी काय करावे ज्याने त्यांच्या शरीरातील प्रोटिन वाढण्यास मदत होईल?काळजी करू नका।काही पदार्थांचे सेवन केल्यास ,शरीर सुदृढ, निरोगी होईल, आरोग्य सांभाळण्यास मदत होईल. जसे की 💠पनीर-पनीर मध्ये काही अंशी फॅट आणि कॅलरीचा समावेश असतो,परंतु यात protein भरपूर प्रमाणात असतात.याशिवाय हे कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम,व्हिटॅमिन बी12,रायबोप्लेविन,आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण आहे.माझ्याकडे तर पनीर भुर्जी करी famous आहे.126gm चिजच्या कपात 194 कॅलरीसह 27gm प्रोटीन असू शकतात. 💠ग्रीक योगर्ट-आता ग्रीक योगर्ट म्हणजे एक प्रकारचे दही च आहे, फक्...