हिरव्या आणि ताज्या रोज खाव्या भाज्या, पालेभाज्या घ्या मुखी आरोग्य ठेवा सुखी,भाजीपाल्याचे एकच महत्व स्वस्तात मिळेल भरपूर सत्व अश्या म्हणी आपण ऐकत असतो आणि ते अगदी खरं आहे.
आपण सर्वच जाणतो की अंडी, मांस यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन protein असते, जे की शरीर बांधणीसाठी आवश्यक असते, उपयुक्त असते. परंतु शुद्ध शाकाहारी लोकांनी काय करावे ज्याने त्यांच्या शरीरातील प्रोटिन वाढण्यास मदत होईल?काळजी करू नका।काही पदार्थांचे सेवन केल्यास ,शरीर सुदृढ, निरोगी होईल, आरोग्य सांभाळण्यास मदत होईल.
जसे की 💠पनीर-पनीर मध्ये काही अंशी फॅट आणि कॅलरीचा समावेश असतो,परंतु यात protein भरपूर प्रमाणात असतात.याशिवाय हे कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम,व्हिटॅमिन बी12,रायबोप्लेविन,आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण आहे.माझ्याकडे तर पनीर भुर्जी करी famous आहे.126gm चिजच्या कपात 194 कॅलरीसह 27gm प्रोटीन असू शकतात.
💠ग्रीक योगर्ट-आता ग्रीक योगर्ट म्हणजे एक प्रकारचे दही च आहे, फक्त त्यातून exess water काढून टाकले जाते, जसे आपण श्रीखंड बनवताना काढतो तसे.
तर ह्यामध्ये ,ह्या फॅट नसलेल्या ग्रीक दह्यामध्ये 48%प्रोटीन असतात. जर आपण गृहीत धरले की170gm मध्ये17gm प्रोटीन आहेत ,ज्यामध्ये केवळ100 कॅलरी असतात, म्हणूनच हे दही प्रोटीन साठी एक उत्तम पर्याय आहे.
💠ब्रोकोली-ब्रोकोली जीवनसत्व' c',व्हिटॅमिन' k'फायबर आणि प्रथिनेयुक्त अशी एक आरोग्यदायक भाजी आहे.
ब्रोकोली ही विविध बायोऍक्टिव्ह पोषक तत्वांचा संग्रह आहे जी कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते.त्यात इतर भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन आहेत,म्हणजे चिरलेल्या ब्रोकोलीच्या 96gm मध्ये3gm प्रोटीन असू शकतात.ज्यामध्ये 31 कॅलरी असतात.
💠क्विनोआ/राजगिरा-क्विनोआ चे बीज सध्या जगातील सर्वात लोकप्रिय food पदार्थांपैकी एक आहे.
हे बऱ्याच जीवनसत्वे,खनिजे आणि फायबरचे मुख्य स्रोत आहे आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स चा साठा आहे शिजवलेल्या कविनोआच्या एका कपात22gm कॅलरीचे 185gm आणि8gm प्रोटीन असतात.
💠शेंगदाणे-शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतात .
100gm शेंगदाण्यांमध्ये 24gm प्रोटीन आढळतात तर 100gm कोंबडीमध्ये 15ते16gm प्रोटीन असतात.आता आपण अशी तुलना करू शकतो की अधिक शक्तिशाली कोण.
💠बदाम-सकाळी रिकाम्यापोटी बदामाचे सेवन केल्याने शरीरात भरपुर प्रोटीन व इतर पदार्थ मिळतात ज्यामुळे शरीर मजबूत बनते.
अंकुरित धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतं. म्हणून आहारात मोड आलेल्या धान्याचा जरूर समावेश करा. नॅचरोपॅथीमध्ये अकुंरित धान्य एखाद्या औषधाप्रमाणे वापरण्यात येतात. तज्ञांच्या मते सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये अथवा अकुंरित धान्य खाल्याने शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात. मात्र अनेकांच्या मनात मोड आलेल्या धान्य खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.
अंकुरलेले कडधान्ये मध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.
जसे अंकुरित मुगामध्ये ग्लुकोज ची पातळी कमी असते म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मूग खाऊ शकतात.सकाळी थोड्याशा अंकुरित मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.शिवाय यातून भरपूर फायबर, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजयुक्त पदार्थ मोठया प्रमाणात आहेत.व्हिटॅमिन बी6,व्हिटॅमिन इ,लोह, मॅग्नेशियम, potasium,झिंक, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड इ
दोन वेळच्या जेवणात किमान अर्धी वाटी पालेभाजी खाल्ली पाहिजे.पालेभाजी हा असा अन्नघटक आहे की जो आजकाल च्या तरुण तरूनणींना आवडत नाही पण लक्षात घ्या की आजारी पडून औषधे घेणे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी इंजेक्शन ,टॉनिक्स घ्यायला लागण्यापेक्षा आपल्या जेवणातल्या ताटातील एक कोपरा जर पालेभाजी ला दिला तर फरक बघा
त्यासाठी लहानपणी पासून मुलांना थोडं veg frankie, mix veg, veg पुलाव वगैरे दिले की आवड निर्माण होते. उदा.
पालक- लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांना तर ही गुणकारी ठरते.
मेथी- मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. भूक आणि अन्नपचन सुधारते, पोटात गॅसेस होत नाहीत.ह्यासारखेच आणखी भाज्या म्हणजे मुळा,
माठ करडई, शेपू, चाकवत, शेवगा,रान भाज्या माझ्या मुलाला आवडणारी भेंडी ऋतूनुसार मिळणाऱ्या सर्वच भाज्याइ.... so many.
मला आठवते माझा मुलगा शाश्वत लहान असताना एकदा fancy dress स्पर्धा होती त्याच्या शाळेत आणि theme होती भाजीपाला ,मग काय तब्बल 46भाज्या वापरून ,भाजीपाल्याचा वासुदेव बनवला होता त्याला, आणि त्याच्या जीवनातलं पहिलं बक्षीस मिळालं होतं तेव्हा त्याला त्या fancy dress मध्ये....
काही vegitarian म्हणी....
१. खाल दर रोज गाजर-मुळे,
तर होतील सुंदर तुमचे डोळे... 🥕
२. सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त... 🥒
३. डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.... 🍵
४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.... 🥒
५. जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री... 🍈
६. पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड..... 🥑
७.पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी..... 🌿
८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.... 🧀
९. दररोज एक फळ खावू या;
आरोगयाचे संवर्धन करु या.... 🍎
१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ह्रास.... 🍏
११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात यांचे महत्व फार... 🥗
१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज...🥒
१३. जेवणा नंतर केळी खा;
पाचनशक्तीला वाव द्या.... 🍌
१४. साखर व तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.... 🍣
१५. खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.... 🍑
१६. गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य...🥝
१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त...🥕🥑
१८. सुखा मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.. .🍱
१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका... 🍲
२०. जो घईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.... 🍋
२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व....🍓
२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग....🎋
२३. कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबी वाणी ..
अश्या कित्तीतरी म्हणी आपल्याला बरेच काही शिकवून जातात आणि आपल्याला शाकाहारी होण्यासाठी भाग पाडतात.
शरीर स्वास्थ्य खलु धर्म साधनम्.....
आज शाकाहारी दिवसानिमित्त हे सर्व सांगितले पण खरोखरच आहे न 'कुतूहल 'शाकाहारी पदार्थांचे...
☘️🍊🥑🍆🥝🍋🍐🍉🥕🍈🍅🌽🥔☘️
#कुतूहल शाकाहारी पदार्थांचे
# पालेभाजी
#व्हिटॅमिन
@सौ. उज्वला तायडे, अकोट
संदर्भ -इंटरनेट ,विश्वकोश
चित्र-google इंटरनेट
Comments
Post a Comment