Posts

हरित श्वासांचा सोहळा........

Image
हरित  श्वासांचा सोहळा...... “आकाशातला सूर्य जर झाकला, तर पृथ्वी अंधारते; निसर्गाचा श्वास जर अडखळला, तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येते.” आधुनिक जीवनशैली, औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानाचा अमर्याद वापर यामुळे मानवाने प्रगती साधली; पण या प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविवेकी वापर, जंगलतोड, प्रदूषण, हवामानबदल, जागतिक तापमानवाढ यामुळे निसर्गाचा श्वास अडकतोय. मानवाचे अस्तित्वच पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आज अत्यावश्यक झाले आहे. पर्यावरण म्हणजे आपल्याभोवती असलेले सर्व घटक — हवा, पाणी, माती, वृक्ष, प्राणी, मानव, समाज, संस्कृती. ही एक परस्परसंबंधित साखळी आहे. एखाद्या घटकातले बिघाड संपूर्ण साखळीला डळमळीत करते. उदाहरणार्थ, पावसाच्या पद्धतीत बदल झाला तर शेतीवर परिणाम होतो, अन्नसाखळी विस्कळीत होते आणि शेवटी मानवावर परिणाम होतो. पर्यावरण म्हणजे नुसती हवा-पाणी-माती एवढेच नव्हे, तर आपल्या जीवनाचा अदृश्य श्वास आहे. झाडाच्या पानावरून झरणारा दवबिंदू, आभाळावर तरंगणारे ढग, पावसात भिजणारी माती, नदीच्या ओठांवरून गाणे गाणारा लहान...

कुतूहल साडीचे......

Image
         आज 21 डिसेंबर म्हणजे जागतिक साडी दिवस. मागे एकदा असेच साडी दिवसाच्या निमित्ताने एकदा लिखाण केले होते. आज पुन्हा एकदा साडी दिवसाच्या निमित्ताने...... साडी हे असे एक अजब वस्त्र आहे की ज्याचे मला कायम कुतूहल वाटते. कारण साडी आणि माझा कित्येक वर्षांपासून चा घनिष्ठ संबंध आहे.कॉलेज मध्ये असताना  उच्च शिक्षनासाठी एम एस्सी ला असताना welcome कार्यक्रमात सर्वांनीच साडी घालण्याचे ठरवले होते.तेव्हा पहिल्यांदाच साडी घालण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर बी एड ला असताना फक्त lesson घेताना/पाठ घेताना साडी घालण्याची सक्ती होती. तेव्हा मात्र  साडी ह्या लांबलचक वस्त्राविषयी प्रचंड राग, चीड होती.पुढे शिक्षकी पेशात आल्यावर मात्र साडी शी चांगलेच घनिष्ठ नाते जुळले.सतत सात तास अंगावर  असले वस्त्र गुंडाळणे भयंकर वाटायचे.अर्थातच आताही वाटते फार तर कामावरून आल्यावर फक्त तिला  5 मिनिटात अंगावरून काढले म्हणजे हायसे वाटते. परंतु आता साडीवर चांगलेच प्रेम जडलेय. घरातील साडीचा कप्पा उघडताच  अंगावर साड्या पडून आपली साड्यांनी लूट होण्याइतपत परिस्थिती झ...

'कुतूहल' बहुगुणी कडुनिंबाचे ......

Image
    मनाला चैतन्य,आनंद आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय.म्हणतात ना, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते. लाल भडक गुलमोहर डोळ्यांना सुखावतो,जांभूळ ला ही बहर याच वेळी येतो.पिवळा धमक बहावा सुद्धा या महिन्यात बहरतो.बहावा ची  सोनसळी फुले  झुंबरा सारखी लटकून नेत्रसुख देतात.डेरेदार पळस सुद्धा या महिन्यात बहरतो.आपल्या वासाने मनमोहुन घेणारा मोगरा याच महिन्यात फुलायला लागतो. झाडांना आलेल्या पानगळीनंतर वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. चैत्र महिन्यात बऱ्याच फुलझाडांना मोहर येतो. कितीही झाडे बहरली तरीही कडुनिंबाचे पाने आपलं स्थान गुढी उभारताना राखून ठेवतात. उन्हाळा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला महिना सुरू होतो तेव्हा हवामानात वेगाने बदल होतात. कडाक्याची थंडी कमी झालेली असते आणि हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली असते. अशावेळी या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला बरेच बदल करावे लागतात. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते. या सगळ्या गोष...

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....

Image
  काही फुले रात्री उमलतात ..त्यांच्या या सवयीमागे एक महत्त्वाचे कारण आहे. फुलांच्या उमलण्यामागचा मुख्य उद्देश त्या वनस्पतीचा बीजप्रसार करणे हा असतो. उमलल्यानंतर आकर्षक दिसणारी अशी फुले मधमाश्यांना व किटकांना आकर्षित करतात. मधमाश्या अश्या फुलांवर बसतात व त्यांच्या मार्फत बीजप्रसार होत असतो. म्हणून त्यांना polineter म्हटले जाते. बहुतेक polinater हे दिवसाच्या सूर्यप्रकाशात फिरतात. परंतु काही कीटक रात्रीच्या अंधारात फिरणे पसंत करतात(nocturnal,निशाचर म्हणतात. उदा. पतंग(moth)म्हणून या किटकामार्फत ज्या वनस्पतींचा बीजप्रसार होतो त्या वनस्पतींच्या फुलांना या कीटकांच्या वेळापत्रकाप्रमाणे Adjust करावे लागते. म्हणूनच रात्री फुलणारी फुलं सामान्यपणे पांढरी किंवा फिकट रंगाची व सुगंधित असतात .जेणेकरून रात्रीच्या अंधुक प्रकाशात ती कीटकांना आकर्षित करू शकतील उदा. रातराणी. साधारणपणे भारतीय फुलं पांढरी आणि सुवासिक असतात तर रंगीत फुले कमी वासाची असतात. ह्या पांढऱ्या रंगाचं आणि पावसाचं पण एक नात असतं बरं का, बहुतेक सर्व पांढरी फुलं पावसाळ्यात फुलू लागतात कारण पण उघडच आहे. पाण्यामुळेच त्यांच्...

'कुतूहल' फास्टफूड चे......

Image
        16 nov म्हणे फास्टफूड डे आहे म्हणे आज, लवकर काहीतरी नवीन बनव ब्रेकफास्ट ला असं जेव्हा मुलगा म्हणाला की तेव्हा कळलं फास्टफूड डे पण असतो. एकविसाव्या शतकात वेगवान आयुष्याच्या नावाखाली माणसाला एक वाईट सवय जडली आहे, फास्ट फूड खाण्याची. चाट, वडापाव आणि बर्गर अगदी कमी वेळात बनवून मिळतो. फास्ट फूड म्हणजे काय? तर असे अन्नपदार्थ जे लवकरात लवकर तयार करून लगेच खायला देता येते आणि  खाणाऱ्या ग्राहकालाही ते पटकन किंवा उभ्या उभ्या देखील खाता येते. अगदी गाडी चालवताना, चालता-चालता, शाळेत मधल्या सुटीत पटकन खाता येतील असे पदार्थ म्हणजे फास्ट फूड. जिथे आरामात बसण्याची गरज भासत नाही, काटे चमचे प्लेट्स यांचीही फारशी गरज नसते, अशी व्यवस्था म्हणजे फास्ट फूड शॉप! आपल्याकडे गल्लोगल्ली आढळणाऱ्या वडापाव, पाणी-पुरी, भेळपुरी, चायनीज यांच्या टपऱ्या म्हणजेच फास्ट फूड शॉप्स! फास्ट फूड हे सहसा तळलेले किंवा गोड असते. आपल्याकडे जे पदार्थ टपरीत किंवा हातगाडीवर बनवले जातात ते त्याच तेलात वारंवार तळतात. असे वारंवार तळलेले पदार्थ आरोग्याला फारच हानिकारक असतात. कारण त्यात आरोग्याला घ...

'कुतूहल'उचकी लागण्याचे...

कधीकधी अचानकपणे उचकी लागते. आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्वासपटल असते. नैसर्गिक श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठविणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे आकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि ‘हिक्’ असा आवाज येतो. विशिष्ट प्रकारचा आवाज वारंवार घशातून येऊ लागतो, त्याला आपण उचकी म्हणतो. उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं?’ आपणही त्यावर हसून पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी त्वरीत थांबतेदेखील. कधी दीर्घ श्वास घेऊन तर पाणी पिऊन उचकी थांबवणे आपल्याला माहीत आहे.अश्या ह्या उचकीवर एक लावणीगीत सुद्धा निघाले होते.... मला लागली कुणाची उचकी...... उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते. यावेळी फुप्फुसातील...

'कुतूहल'पक्षी स्थलांतराचे..…....

Image
      आपलेकडे हिवाळ्यात भरपूर नवीन पक्षी पहायला मिळतात.पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे.  पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल सर्वांनाच  'कुतूहल' वाटते. हिवाळा ऋतूमध्ये परदेशातून अनेक पक्षी स्थलांतरीत होऊन आपल्याकडे येतात. पक्ष्यांचे स्थलांतर हा एक कुतूहलाचा विषय असून त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जगभरात दरवर्षी वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते.थंडीच्या मोसमात त्यांचे वास्तव्य असलेल्या देशात मोठया प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने त्यांना त्यांचे खाद्य कमी पडते, जगण्यासाठी वातावरण कठीण असते आणि त्यांच्या पिल्लांची सुयोग्य वाढ अशा प्रमुख कारणांसाठी हे पक्षी3ते4 महिन्यांसाठी स्थलांतर करतात. अन्न, पाणी आणि घरटी बांधण्याची सोय या तीन प्राथमिक गोष्टींची गरज जितकी मानवाला, तितकीच ती पक्ष्यांना देखील!म्हणून त्यासाठी होत असावे स्थलांतर.त्यामुळे साहजिकच पक्षी, ज्या ठिकाणी या गोष्टींची कमतरता भासू लागते, अशी ठिकाणे सोडून मुबलकतेच्या जागी स्थलांतर करतात.     हे पक्षी इतक्य...