Posts

Showing posts from April, 2021

'कुतूहल'सुपरमून/pink moon चे......

Image
       अवकाशात  विलोभनीय दिसणाऱ्या घटनांपैकी एक  घटना  म्हणजेआपल्याला सुपर मून  बघायला मिळणे आहे. चैत्र पौर्णिमेची ही 'सुपरमून' पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपर मून असणार आहे. यावेळेस चंद्र१४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. या 'सुपर मून' चे विशिष्ट म्हणजे पौर्णिमा २७ एप्रिलला असली तरी २६ ते २८ एप्रिल या तीन दिवस चंद्र जवळ जवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील  यावेळेस अंतर ३ लाख ५८ हजार ६१५ किमी असेल. कोरोनाच्या विषाणूचा प्रार्दुभाव आणि लॉकडाउनमुळे खगोल अभ्यासकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नसले तरी अनेक खगोलप्रेमी घरूनच सुपरमूनचाआनंद घेणार आहेत.नेहरू। सायन्स सेन्टर नि एक live दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षातील हा पहिलाच सुपरमून आहे.या पौर्णिमेच्या चंद्राला पिंक मून म्हणत असले तरी त्याचा रंगाशी काही संबंध नाही. खगोल वैज्ञानिकांनी सुपरमूनसाठी प्रत्येक पौर्णिमेला वेगळा रंग दिला आहे, म्हणून पिंकमून म्हणून याची ओळख निश्चित केली आहे. दुर्बिणीची गरज नाही  सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविता...

'कुतूहल'सुंदर वसुंधरेचे ..........

Image
 🌍🌱🌎🌱🌏🌱🌐🌱🌍🌱🌎🌱🌏🌱              वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे.  वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा ही वसुंधरा आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमींसोबतच सर्वसामान्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी संकल्प करून तो प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा. फक्त "save earth, save life",पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा",असे म्हणून चालणार नाही. जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. अलिकडे मानवाला विकास आणि प्रगती या दोन गोष्टींची चटक लागली आहे. त्यामुळे मानव निसर्गावर विजय मिळवू पाहात आहे. त्यासाठी डोंगर सपाट करणे, झाडे तोडणे... जंगलं नष्ट करणे असे उद्योग मानव करत आहे. कोळसा आणि भूखनिजांसाठी अति प्रमाणावर जमीन खणली जात आहे. ज्यामुळे पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. उद्योग आणि व्यवसाय उभारण्यासाठी, विस्तारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योग...

'कुतूहल'....मृगजळाचे....

Image
              लहानपणी सतत उन्हाळ्यात पडलेला प्रश्न असायचा, लांबून रस्त्यावर पाणी वाहताना का दिसते?लांब दूरवरून शेतात एकही पीक नसताना पाणी हल ल्यासारखे का दिसते?मोठ्यांकडून उत्तरे मिळायची मृगजळ आहे ते, तेव्हा खूप ' कुतूहल' वाटायचे त्या मृगजळचे. मिराज  किंवा  वाळवंटातील पाण्यातील लाटा याला हरीण/ डियर अनेकदा त्यावर फसतो, याला मृगजळ असे म्हणतात. जे कधी होणार नाही ,घडणार नाही अश्या गोष्टींचा निरर्थक आशावाद बाळगून त्या पाठी मृगाप्रमाणे धावणं म्हणजे मृगजळ. अगदी सोप्या भाषेत मृगजळ म्हणजे "जसं आहे तसं न दिसता वेगळे काहीतरी दिसणं" होय. आपण एखादी वस्तू पाहतो कारण त्यावर प्रकाश किरणं पडतात म्हणुन आणि किरणं सरळ रेषेत प्रवास करतात म्हणुन ती वस्तू आहे तशी जागेवर हुबेहूब आपल्याला दिसते. पण किरणं वाकडी तिकडी झाली तर ?आहे की नाही गंमत. दुपारच्या वेळेस उष्णतेमुळे जमीन खुप गरम होते. त्यातुन निघणारी गरम हवा वातावरणात असलेल्या हवेत मिसळते. वातावरणातील हवा कमी उष्णतेची असल्यामुळे त्यातुन जाणारी किरणं रिफ्रॕक्ट वाकडीतिकडी होतात. त्यामुळे आपण पाहिले की आप...