Posts

Showing posts from December, 2022

'कुतूहल'उचकी लागण्याचे...

कधीकधी अचानकपणे उचकी लागते. आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्वासपटल असते. नैसर्गिक श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठविणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे आकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि ‘हिक्’ असा आवाज येतो. विशिष्ट प्रकारचा आवाज वारंवार घशातून येऊ लागतो, त्याला आपण उचकी म्हणतो. उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं?’ आपणही त्यावर हसून पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी त्वरीत थांबतेदेखील. कधी दीर्घ श्वास घेऊन तर पाणी पिऊन उचकी थांबवणे आपल्याला माहीत आहे.अश्या ह्या उचकीवर एक लावणीगीत सुद्धा निघाले होते.... मला लागली कुणाची उचकी...... उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते. यावेळी फुप्फुसातील...