'कुतूहल'उचकी लागण्याचे...
कधीकधी अचानकपणे उचकी लागते.
आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्वासपटल असते. नैसर्गिक श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठविणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे आकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि ‘हिक्’ असा आवाज येतो.
विशिष्ट प्रकारचा आवाज वारंवार घशातून येऊ लागतो, त्याला आपण उचकी म्हणतो.
उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं?’ आपणही त्यावर हसून पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी त्वरीत थांबतेदेखील. कधी दीर्घ श्वास घेऊन तर पाणी पिऊन उचकी थांबवणे आपल्याला माहीत आहे.अश्या ह्या उचकीवर एक लावणीगीत सुद्धा निघाले होते.... मला लागली कुणाची उचकी......
उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते. यावेळी फुप्फुसातील हवा बाहेर येते आणि अशावेळी होणारा आवाज म्हणजे उचकी. ही क्रिया घडत असताना आपण श्वास आत घेऊ शकत नाही म्हणून उचकी लागली की आपल्याला अस्वस्थत वाटतं. आता ही उचकी लागते कशामुळे तर,गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने,
खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने,मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने,धुम्रपान केल्यामुळे,तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते,
हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते.
खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने,मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने,धुम्रपान केल्यामुळे,तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते,
हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते.
कधी कधी पोट फुगल्यामुळे उचकी लागते. लहान मुलांमध्ये दूध जास्त पिणे आणि हवा गिळणे,यामुळे अचानक कॉन्ट्रेक्शन निर्माण होते व ते उचकीचे रूप घेऊ शकते. बॉटल मधून दूध प्यायल्याने सुद्धा बाळाला उचकी येण्याची शक्यता असते. कारण दुधासोबत बाळ हवा सुद्धा गिळते. यामुळे बाळाचे पोट वाढते व त्याचा परिणाम म्हणून उचकी येते.
आता उचकी लागल्यावर आपण प्राथमिक स्वरूपात काही उपाय करू शकतो.जसे श्वास काही वेळासाठी रोखून धरायचा,थंड पाणी पिणे,जीभ बाहेर काढने आणि थोडा वेळ तसेच राहने, यामुळे घशामधील मांसेपेशी ओढल्या जातील आणि बरं वाटेल.
खाली बसून आणि गुडघ्याला छातीजवळ आनून दोन मिनिटं या स्थित बसल्यावर सुद्धा उचकी थांबू शकते.उचकी लागली तर साखर खाने,लिंबू आणि मधाचं चाटण खाने,चॉकलेट पावडरचं सेवन करने,मीठाचं पाणी पिणे,तीन काळेमीरे आणि खडी साखर चावून खाने आणि त्यावर पाणी पिणे,टमाटर चावून चावून खाने,
पीनट बटर खाने,उलटे आकडे मोजने, अश्या प्रकारचे उपायाने उचकी थांबू शकते .आता यातील काही उपाय तर उचकी आलेल्या व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे केंद्रित करणे आहे.असंही म्हटलं जातं की, उचकी लागलेल्या माणसाला घाबरविल्यास उचकी लगेचच थांबते.
उचकी लागणे यामागे अनेक कारणं असतात. उचकी लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे यावर उपायही आहेत. मात्र कोणाकोणाला उचकी खूप जास्त वेळ राहत असेल तर डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे.
आहे न 'कुतुहल'उचकी लागण्याचे.
#कुतूहल उचकी लागण्याचे
#उचकी
@सौ. उज्वला तायडे, अकोट
Comments
Post a Comment