'कुतूहल'डोळ्यांतील अश्रूंचे......
डोळ्यातून अश्रू येणे ही मनातील भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.रडण्याबाबत स्त्रीया पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असतात.आकडेवारीनूसार स्त्री महिन्यातून सरासरी ५.३ वेळा रडते तर पुरुष महिन्यातून सरासरी १.३ वेळा रडतो.जैविकदृष्ट्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणामध्ये Testosterone हे हॉर्मोन असते जे पुरुषांना रडण्यापासून रोखते.त्या उलट स्त्रीयांमध्ये Prolactin हे हॉर्मोन अधिक असते ज्यामुळे अश्रू उत्तेजित होतात.मात्र डोळ्यांमध्ये अश्रू येण्यासाठी केवळ ही दोन हॉर्मोन्स कारणीभूत ठरत नाहीत.एकूण तीन प्रकारचे रडणे असून त्यामध्ये विविध यंत्रणा व केमिकल्सचा समावेश असतो.जाणून घ्या डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय ! जाणून घ्या 'कुतूहल' डोळ्यांतील अश्रूंचे..….. एलिझाबेथ गिल्बर्टने तिच्या 'इट,प्रे,लव' या पुस्तकामध्ये लिहीले आहे की,"रडल्याबद्दल माफी मागू नका कारण या भावनेशिवाय माणूस केवळ रोबट आहे." अश्रू म्हटले की मला मात्र एकच आठवते ते म्हणजे वसंत कानेटकरांचे 'अश्रूंची झाली फुले'.... आणखी एक म्हणजे वि स खांडेकरांची "अश्रू". आजच्या साम...