'कुतूहल' साडी day चे.............
२१ डिसेंबर म्हणे जागतिक साडी दिवस,आज मात्र सर्वांच्या dp मध्ये साडी दिसली कारण आज साडी day आहे म्हणे...... साडी हा भारतीय स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा.कपाटात कितीहि साड्या असल्या तरीही तरी प्रत्येक साडी खुणावतेच.कपाट उघडल्यावर भलेही मग साड्या अंगावर पडून दररोज लूट झाली तरीही नवीन साडी हवीच असते.साडी हे भारतातले असे अजब वस्त्र आहे की त्याच्या मोहापासून कोणतीही भारतीय स्त्री वाचू शकत नाही.आणि एका स्त्रीला साड्या किती असतील हा तर कुणीच विचार करू शकत नाही, माझ्यामते जर कोणी संख्या विचारली तर ती infinate अगणितच असणार😊. स्त्रियांचं सौंदर्य खुलावणाऱ्या ६ वार आणि ९ वार पेहरावाचा दिवस.भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहराव. तसा हा पेहराव बहुतांशी भारतातच वापरात आहे, तरी देखील आपली प्रत्येक गोष्ट जागतिक असते. साडी प्रत्येक भारतीय स्त्रियांच्या अगदी मनाजवळची गोष्ट. लहान मुलगी भातुकली खेळताना अडखळत पण साडी नेसतेच. माझी मुलगी तर लहान असताना पासूनच कोणतीही नविन साडी आणली की सर्वांत अग...