हरित श्वासांचा सोहळा........
हरित श्वासांचा सोहळा...... “आकाशातला सूर्य जर झाकला, तर पृथ्वी अंधारते; निसर्गाचा श्वास जर अडखळला, तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येते.” आधुनिक जीवनशैली, औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानाचा अमर्याद वापर यामुळे मानवाने प्रगती साधली; पण या प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविवेकी वापर, जंगलतोड, प्रदूषण, हवामानबदल, जागतिक तापमानवाढ यामुळे निसर्गाचा श्वास अडकतोय. मानवाचे अस्तित्वच पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आज अत्यावश्यक झाले आहे. पर्यावरण म्हणजे आपल्याभोवती असलेले सर्व घटक — हवा, पाणी, माती, वृक्ष, प्राणी, मानव, समाज, संस्कृती. ही एक परस्परसंबंधित साखळी आहे. एखाद्या घटकातले बिघाड संपूर्ण साखळीला डळमळीत करते. उदाहरणार्थ, पावसाच्या पद्धतीत बदल झाला तर शेतीवर परिणाम होतो, अन्नसाखळी विस्कळीत होते आणि शेवटी मानवावर परिणाम होतो. पर्यावरण म्हणजे नुसती हवा-पाणी-माती एवढेच नव्हे, तर आपल्या जीवनाचा अदृश्य श्वास आहे. झाडाच्या पानावरून झरणारा दवबिंदू, आभाळावर तरंगणारे ढग, पावसात भिजणारी माती, नदीच्या ओठांवरून गाणे गाणारा लहान...