'कुतूहल',Flame of forest...पळसाच्या सौन्दर्याचे....
दररोज रस्त्याने जाताना अजूनही शिशिरातील थंडीचा गारवा बोचत असताना ,रस्त्याच्या दुतर्फा अचानक लालबुंद, नारिंगी पळस डोकं वर काढून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होता.तेव्हा जाणवत होते की इंग्रजांनी पळसाला flame of forest ही उपमा का दिली असावी. कारण तो फुलल्यानंतर विस्तवाच्या गोळ्याप्रमाणे दिसतो.वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेते.आपल्या अलौकिक सौन्दर्याचे मुक्तपणे प्रदर्शन करताना पळस रखरखत्या उन्हात जरासुद्धा घाबरून जात नाही. शिशिराची थंडी ओसरायला लागली की ,सृष्टीने पांघरलेली हिरवीगार शाल हळूहळू आपला रंग बदलायला लागते ,पिवळसर होत जाते.बऱ्याच झाडांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटू लागते, आणि अशातच मग हा तपस्वी/योगी आजूबाजूला कुठेही favourable वातावरण नसताना देखील माळरानावर, रस्त्याच्या दुतर्फा रुक्ष, ओसाड जागेवर दिमाखात फुलताना ,अगदीच डोकं वर काढून मिरवताना दिसतो. मी पळसाला योगी/तपस्वी याच साठी संबोधले होते कधीच कोणतीही कुरबूर न करता शांतपणे रखरखत्या उन्हात देखील एखाद्या तपसव्या प्रमाणे सम...