Posts

Showing posts from January, 2021

'कुतूहल'सुर्यसंक्रमणाचे,मकरसंक्रांतीचे...☀️🌞

Image
 एखादी वाईट घटना घडली, की 'संक्रांत आली' असे म्हटले जाते; ते योग्य नाही. दिनमान वाढत जाणे, सूर्य धनू राशीतून मकर राशीत जाणे,यात अशुभ असे काही नाही.  संक्रांत सणाचा मूळ हेतू जर कायम ठेवायचा असेल तर मकर संक्रमणाचा आग्रह न धरता उत्तरायणाशी संक्रांतीची म्हणजे तिळगुळाची सांगड घातली पाहिजे.. सूर्याचा प्रवास मेष ते मीन या राशीतून होतो. प्रत्येक राशीत सूर्याचा प्रवेश झाला की त्या संक्रमणास संक्रांत म्हणतात. ज्या राशीत प्रवेश होईल त्या राशीच्या नावाने ती संक्रांत ओळखली जाते. उदा. सूर्याने मेष राशीत प्रवेश केला की त्या संक्रांतीला मेष संक्रांत म्हणतात. सर्व आबालवृद्धांना जी माहिती आहे ती मकरसंक्रांत तिळगूळ देण्याघेण्याशी या मकरसंक्रांतीचा संबंध आहे. त्यामुळेच ही संक्रांत सर्वपरिचित आहे. तिळगूळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि संक्रांतीच्या आगेमागे हिवाळा असतो, त्यामुळे ही तिळगूळ वाटपाची प्रथा पडली याबद्दल मतभिन्नता नसावी असे वाटते. उन्हाळा काय, हिवाळा काय हे ऋतू आहेत आणि ऋतूस कालावधी असतो. ऋ तू सहा धरले तर प्रत्येक ऋतूचा काळ दोन महिन्यांचा असतो. सूर्यस्थानाचा म्हणजे सूर...

'कुतूहल 'न्यूटनच्या सफरचंदाचे........🍎🍎🍎🍎🍎

Image
🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎          मला लहानपणा पासूनच न्यूटन विषयी खूप कुतूहल वाटायचे, विशेष करून त्याला झाडावरून खाली पडताना दिसलेल्या सफरचंदाचे.त्याची कथा आवडायची परंतु न्यूटनच्या नियमांचा खूप खूप राग यायचा. शाळेत त्याचे 3ही नियम शिकवत असताना सारखे वाटायचे न्यूटन झाडाखाली बसला कसा असेल,सारखे त्याच्या फोटो चे कुतूहल वाटायचे.न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. एक सफरचंद झाडावरून खाली पडलं आणि त्यातून त्याला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची कल्पना सुचली अशी कथा तुम्ही ऐकली असेल.. रॉयल सोसायटीमध्ये जेवत असताना त्यानं ही कथा विल्यम स्टकलेला सांगितली. पुढे विल्यम स्टकलेनी न्यूटनचं चरित्र लिहिलं. त्यात या कथेचा उल्लेख आहे. तिथून पुढे न्यूटन म्हटलं की सफरचंद असं समीकरणंच बनलं होतं.परीक्षेत न्यूटनच्या कोणत्याही नियमावर प्रश्न विचारला की, काही मुले सरळ 👆वरची कथा लिहून ठेवतात, खूप हसायला येते,कारण तेवढे🍎सफरचंद जास्त लक्षात राहते. भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत ...