Posts

Showing posts from July, 2021

'कुतूहल'काजव्याच्या रात्री चमकण्याचे....

Image
                      माझा शाश्वत लहान असताना रात्री जेवण झाल्यावर थोडं फिरायला म्हणून आईकडे जाण्याचा नित्यक्रम होता आमच्या दोघांचा, आईचे घरही अगदीं जवळ 6घर पलीकडे. वाटेत रात्री शाश्वत ला काजवे चमकताना बघण्यात खूप खूप आनंद वाटायचा, कदाचित त्यासाठीच तो येत असावा माझ्यासोबत .... मग काय वाटेत सुरू व्हायची त्याची प्रश्नमाला, काजवे प्रकाश कसे देतात, दिवसा सूर्यप्रकाशात कुठे जातात, कसे चमकतात... इत्यादी. आपण प्रत्येकानेच पहिले आहे कि, रात्रीचे काजवे एक मंद असा विलक्षण प्रकाश फेकत असतात. सामान्यत: असे दृश उन्हाळ्याच्या रात्री दिसते. पण चंद्राच्या प्रकाशामध्ये सुद्धा या काजव्यांचे चमकणे स्पष्ट दिसते आणि हे एक आश्चर्य आहे,कुतूहल आहे. काजवा एक असा किटक आहे ज्याकडे आपण नेहमी कुतूहलाने पाहतो. तुम्ही अंधारात काजवा चमकताना कधी पाहिलाय का? प्रत्यक्ष पाहिला नसला तरी त्याच्या गोष्टी तरी नक्की ऐकल्या किंवा वाचल्या असतील. काजवाच्या चमकण्यामागचा मुख्य उद्देश आपल्या जोडीदाराला आकर्षित करुन घेणं आणि आपलं अन्न शोधणं हा असतो. आता शहरांमध्ये काज...