'कुतूहल'काजव्याच्या रात्री चमकण्याचे....
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात उबदार आणि दमट वातावरणामध्ये त्यांना प्रकाशित करणारा घटक हा अधिक सक्रीय होतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की, जवळपास २००० पेक्षा जास्त कीटकांच्या प्रजाती या अश्या वातावरणामध्ये आपल्या अंगातून प्रकाश फेकतात.
खरेतर हा एक केमिकल ची गंमत आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर काजव्याच्या शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया घडते. त्यामुळे ते चमकतात. या प्रक्रियेला bio-luminescence असे म्हणतात. परंतु हा प्रकाश लाईट बल्बसारखा नसतो.
सामान्य बल्बचा प्रकाश हा खूप उष्ण असतो, पण काजव्यांनी परावर्तीत केलेला प्रकाश हा शीतल असतो, त्यात प्रखरपणा जाणवत नाही. तरी त्यांना फायर फाइल्स म्हटले जाते, आहे की नाही गंमत…
या प्रकाशाने चमकणार्या काजव्यावर 1967 मध्ये रॉबर्ट बायल यांनी संशोधन केलं होतं. काजव्यांच्या शरीरात फॉस्फरस असतो असं आधी मानलं जात होतं. त्या फॉस्फरसमुळे काजवा चमकतो असं पूर्वी म्हटलं जायचं. पण, काजवा फॉस्फरसमुळे नाही तर त्याच्या शरीरातील बल्किल्युसिफेरेस नावाच्या प्रोटीनमुळे तेज पसरवू शकतो हे जर्मनीच्या या वैज्ञानिकानं सिद्ध करुन दाखवलं. काजव्याचा प्रकाश प्रखर नसला तरी हजारो काजवे एकत्र येतत तेव्हा तो परिसर उजळून जातो. काजवे रात्रीच चमकतात.
जेव्हा ऑक्सिजन, कॅल्शिअम, एडोनोसाइन ट्रायफॉस्फेट (ATP) आणि लुसिफेरीन हे घटक एकत्र येतात, तेव्हा लुसिफेर्सच्या प्रभावामुळे हा प्रकाश उत्पन्न होतो.
इंग्रजी मधे या किटकांना “ग्लो वर्म” किंवा “फायर फ्लाय” असे म्हणतात. पण खरेतर हे वर्म सुद्धा नाहित आणि फ्लाय किंवा माश्या सुद्धा नाहित. कोलिऑप्टेरा गणाच्या बिटल्स किंवा ढालकिड्यांच्या (लॅपिरिडी) कुळात यांचा समावेश होतो. हे किटक अर्थातच निशाचर आहेत आणि आणि त्यांच्या सुमारे २००० जाती असून त्यात सतत नविन उपजातींची भर पडत असते. जगभरात सगळ्या देशांमधे काजवे लुकलुकताना दिसतात याला फक्त अंटार्क्टिका खंडाचा अपवाद आहे. बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्याच्या नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. मात्र त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. त्यांच्या आकार मात्र नरापेक्षा बराच मोठा असतो. प्रकाश देणारे अवयव नर काजव्यात उदराच्या खालील बाजूस सहाव्या व सातव्या खंडांत तर, मादीत त्यामागील खंडांत असतात.
काजव्यांचा प्रकाश सहसा पांढरा, पिवळा, हिरवा किंवा तांबडा असतो. पोटामधल्या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरीन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज विकराच्या सान्निध्यात ऑक्सिजनाबरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधूनमधून थांबणारा असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने प्रकाशतात. काही जातीच्या माद्या मात्र सतत काही सेकंद प्रकाशतात. प्रजनन काळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मीलन घडून येते. मात्र याचाच फायदा काही इतर जातीच्या काजव्याच्या माद्या घेतात. त्या प्रकाशून नराला प्रतिसाद देतात पण तो नर मादीच्या जवळ आल्यावर चक्क त्याला खाउन टाकतात. मिलनाचा हंगाम संपला की नर मरतात. मादी सामान्यपणे दमट जागी अंडी घालते.
अंड्यातून बाहेर पडलेली काजव्याची अळी आणि पंख फुटलेला प्रौढ काजवा यांची जीवनशैली परस्परविरूद्ध पण परस्परपुरक असते. प्रौढ काजव्याला सगळे लक्ष पुनरूत्पादनावर केंद्रित यावे, अन्न शोधण्यात त्याचा वेळ आणि शक्ती वाया जाऊ नये म्हणून अळीरूपातला काजवा खा खा खाऊन शरीरात चरबीचा साठा करून ठेवतो. या अळीचा आहार मात्र स्पेशल असतो. गोगलगाय व तत्सम प्राण्यांखेरीज इतर कशालाही ही अळी तोंड लावत नाही.
गोगलगायींची हालचाल वाढते ती रात्रीच्या अंधारात त्यामुळे दिवसभर झाडाझुडपांच्या, पालापाचोळ्याच्या आसऱ्याने पडून असणारी काजव्याची अळी रात्रीच गोगालगायीच्या मागावर निघते. या अळीच्या शेपटीमध्ये ल्युसीफेरीन या द्रव्यामुळे प्रकाश उजळतो. पण या दिव्याचा भक्ष्य शोधण्यासाठी तीला काहीच उपयोग नसतो कारण आपल्या काळ्या, गुळगुळीत डोळ्यांनी तिला काहीच दिसत नाही. फक्त समोरच्या उजेडातील कमीजास्तपणा आणि अंधूक हालचाल जाणवते. दृष्टीतील ही जाणीव भरून काढण्यासाठीच निसर्गाने काजव्याच्या अळीला जाडसर चाचपण्या (ऍटेना) दिल्या आहेत. शिवाय या अळीच्या तोंडाभोवती अतीसंवेदनाशील अश्या सहा स्पर्शीकाही असतात. त्यांच्या मदतीने अळी आपले सावज - गोगलगाय शोधते.
काजव्यांमध्ये निर्माण होणारा प्रकाश हा रासायनिक प्रक्रियेतून होतो, आणि तो जैविक प्रकारचा असतो. काजव्यांच्या पोटात मॅग्नेशियम, प्राणवायू, लुसिफेरसचे आणि लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते. मिलनाच्या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी ही प्रकाशनिर्मितीची कला निसर्गाने काजव्याला दिली आहे.
आता हे काजव्याच्या प्रकाशाचे प्रकरण तुमच्या लक्षात आले असेल....

👌👌...detail information about chemical reaction of
ReplyDeletebio luminescence...
लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा प्राणी
ReplyDeleteफारचं छान आणी दुर्मिळ माहिती आहे.
खूप छान माहिती आहे काजव्याची
ReplyDeleteउज्ज्वला मॅडम