'कुतूहल' बहुगुणी कडुनिंबाचे ......
मनाला चैतन्य,आनंद आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय.म्हणतात ना, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते. लाल भडक गुलमोहर डोळ्यांना सुखावतो,जांभूळ ला ही बहर याच वेळी येतो.पिवळा धमक बहावा सुद्धा या महिन्यात बहरतो.बहावा ची सोनसळी फुले झुंबरा सारखी लटकून नेत्रसुख देतात.डेरेदार पळस सुद्धा या महिन्यात बहरतो.आपल्या वासाने मनमोहुन घेणारा मोगरा याच महिन्यात फुलायला लागतो. झाडांना आलेल्या पानगळीनंतर वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. चैत्र महिन्यात बऱ्याच फुलझाडांना मोहर येतो. कितीही झाडे बहरली तरीही कडुनिंबाचे पाने आपलं स्थान गुढी उभारताना राखून ठेवतात. उन्हाळा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला महिना सुरू होतो तेव्हा हवामानात वेगाने बदल होतात. कडाक्याची थंडी कमी झालेली असते आणि हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली असते. अशावेळी या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला बरेच बदल करावे लागतात. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते. या सगळ्या गोष...