कुतूहल साडीचे......
आज 21 डिसेंबर म्हणजे जागतिक साडी दिवस. मागे एकदा असेच साडी दिवसाच्या निमित्ताने एकदा लिखाण केले होते. आज पुन्हा एकदा साडी दिवसाच्या निमित्ताने...... साडी हे असे एक अजब वस्त्र आहे की ज्याचे मला कायम कुतूहल वाटते. कारण साडी आणि माझा कित्येक वर्षांपासून चा घनिष्ठ संबंध आहे.कॉलेज मध्ये असताना उच्च शिक्षनासाठी एम एस्सी ला असताना welcome कार्यक्रमात सर्वांनीच साडी घालण्याचे ठरवले होते.तेव्हा पहिल्यांदाच साडी घालण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर बी एड ला असताना फक्त lesson घेताना/पाठ घेताना साडी घालण्याची सक्ती होती. तेव्हा मात्र साडी ह्या लांबलचक वस्त्राविषयी प्रचंड राग, चीड होती.पुढे शिक्षकी पेशात आल्यावर मात्र साडी शी चांगलेच घनिष्ठ नाते जुळले.सतत सात तास अंगावर असले वस्त्र गुंडाळणे भयंकर वाटायचे.अर्थातच आताही वाटते फार तर कामावरून आल्यावर फक्त तिला 5 मिनिटात अंगावरून काढले म्हणजे हायसे वाटते. परंतु आता साडीवर चांगलेच प्रेम जडलेय. घरातील साडीचा कप्पा उघडताच अंगावर साड्या पडून आपली साड्यांनी लूट होण्याइतपत परिस्थिती झ...