Posts

Showing posts from June, 2022

'कतूहल'मातीच्या सुगंधाचे.......

Image
    आमचेकडे आज पहिल्या पावसाचे आगमन झाले.आणि वातावरणात सगळीकडे सुगंध पसरला आजूबाजूला,  घराघरांत सर्व आसमंतात हवाहवासा वाटणारा सुगंध. अर्थातच दरवर्षी येत असतो असा मातीचा गंध, विश्वातील सर्वच सुगंधांना मागे टाकणारा सर्वच आबालवृद्धांना आवडणारा असतो.नकळतपणे मन लहानपणात शिरले. लहानपणी दरवर्षी पहिल्या पावसाचे आगमन झाले की मातीला हा सुगंध कसा येत असावा असा प्रश्न पडायचा. बरेच वेळा आजी, आजोबा कडून उत्तर मिळायचे उन्हामुळे धरणीमाता तापलेली असते पाऊस पडला की ती आनंदित होऊन वारा तिचा सुगंध पसरवत असतो. उत्तर तेव्हा काहीसं पटायचं, पण नेहमीच कुतूहल वाटायचं त्या सुगंधाच.हा सुगंध का येतो? कुठून येतो आणि हा सुगंध नेमका कसा तयार होतो? मी पण मग इंटरनेट वरून माहिती मिळवली. पावसाचे थेंब पडल्यानंतर मातीमधून एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधाची निर्मिती होते जेव्हा पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा हवेचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे फुटले की ते आधी वरच्या दिशेने पुढे सरकतात आणि हवेमध्ये छोट्या छोट्या कणाना बाहेर काढत असते ज्याला एरोसॉल असे म्हणतात. तर यामागे वनस्पती शास्त्र स...