'कतूहल'मातीच्या सुगंधाचे.......
पावसाचे थेंब पडल्यानंतर मातीमधून एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधाची निर्मिती होते जेव्हा पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा हवेचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे फुटले की ते आधी वरच्या दिशेने पुढे सरकतात आणि हवेमध्ये छोट्या छोट्या कणाना बाहेर काढत असते ज्याला एरोसॉल असे म्हणतात. तर यामागे वनस्पती शास्त्र सुद्धा आहे आणि जैवविज्ञान शास्त्र सुद्धा असल्याचे मानले जाते.
पाऊस पडल्यानंतर मातीतून सुगंध येतो त्या सुगंधास ‘पेट्रिकोर’ असे म्हटले जाते. हा सुगंध मातीत असणाऱ्या सूक्ष्म स्ट्रेप्टोमाइसेट बॅक्टेरियाचे उपउत्पादन आहे, ज्यामुळे जियोस्मिन नावाचे संयुग तयार होते.
असे म्हटले जाते की बॅक्टेरिया सोबत झाडातून निघणारे तेल सुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाचे कारण बनते. एका शास्त्रज्ञांच्या मते झाडाद्वारे उत्सर्जित केले गेलेल्या काही तरल पदार्थ आणि बॅक्टेरिया द्वारा निघणारे काही विशेष रसायन यांची पावसाच्या थेंबा सोबत अभिक्रिया होते ज्यामुळे अशा प्रकारचा सुगंध वातावरणामध्ये तयार होतो.
एका रिपोर्टनुसार मातीमध्ये उपलब्ध असणारे बॅक्टेरिया एक्टिनोमाइसेट्स किंवा स्ट्रेप्टोमाइसीट याच्या सुगंधाचे कारण सुद्धा बनते.वैज्ञानिकांच्या मतानुसार मातीमध्ये सापडणारे बॅक्टेरिया सोबतच काही बीजाणूना मातीमध्ये पसरवून देतो यासोबतच काही झाडे, वनस्पती उन्हाळ्यात पाणी न मिळण्याच्या कारणामुळे सुकून जातात.
या झाडांच्या द्वारे सुद्धा एक प्रकारचा तरल पदार्थ बाहेर निघतो आणि तो मातीमध्ये मिसळून जातो पाऊस पडल्यानंतर जसे मातीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी पडते तेव्हा तो तरल पदार्थ क्लोरीन गॅस आणि मातीच्या जिवाणू पाणी सोबत मिसळून एक केमिकल रिएक्शन(chemical reaction) तयार करतात ,या कारणामुळेच मातीतून सुगंध येऊ लागतो.
पाऊस पडल्यानंतर मातीतून येणार्या सुगंधाचे एक कारण फ्रेश सुगंध सुद्धा सांगितले जाते खरंतर ओझोनच्या कारणामुळे वादळानंतर फ्रेश गंध येऊ लागतो. वैज्ञानिकाच्या मतानुसार ओझोनमध्ये क्लोरीन गॅस प्रमाणे तिखट आणि तेज गंध असतो पाऊस पडल्यानंतर जेव्हा वातावरणामध्ये उपलब्ध असणारा ओझोन गॅस काही प्रमाणा मध्ये पाण्यासोबत मिसळतो आणि यामुळेच वातावरणामध्ये सुगंध पसरू लागतो.
वेगवेगळ्या झाडांद्वारे निघणारे तेल सुद्धा एक कारण सांगितले जाते. रिपोर्टनुसार पर्यावरणामध्ये हे तेल जमा झालेले असते आणि पाऊस पडताच यासोबत काही केमिकल या तेलाला हवेमध्ये सोडून देतात आणि म्हणूनच पाऊस पडल्यावर वातावरणामध्ये सुगंध निर्माण होण्याचे हे कारण सुद्धा सांगितले जाते. असे सांगितले जाते की पावसाचे पाणी आणि माती यांच्यासोबत केमिकल रिएक्शन होते आणि म्हणूनच एक आगळा वेगळा सुगंध वातावरणामध्ये दरवळू लागतो.
अशा या सुगंधावर खूप कवींनी कविता केल्या त्यात ना. धो. महानोरांचे जाई जुईचा गंध मातीला माझे आवडते गीत असो किंवा बहिणाबाईंच्या कविता असो.
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
पहिल्या पावसाने, धरतीच्या परिमयाने (मृदगंध) जीव भरून गेल्याचे बहिणाबाई म्हणतात.
#कुतूहल मातीच्या सुगंधाचे
#कुतूहल पहिल्या पावसाच्या सुगंधाचे
@उज्वलातायडे, अकोट
संदर्भ-माहिती इंटरनेट
मातीच्या सुगंधाची खूप छान शास्त्रीय माहिती
ReplyDeleteखूप विस्तृत आणि छान माहिती
ReplyDeleteछान
ReplyDelete