'कुतूहल'पक्षी स्थलांतराचे..…....
आपलेकडे हिवाळ्यात भरपूर नवीन पक्षी पहायला मिळतात.पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल सर्वांनाच 'कुतूहल' वाटते. हिवाळा ऋतूमध्ये परदेशातून अनेक पक्षी स्थलांतरीत होऊन आपल्याकडे येतात. पक्ष्यांचे स्थलांतर हा एक कुतूहलाचा विषय असून त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जगभरात दरवर्षी वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते.थंडीच्या मोसमात त्यांचे वास्तव्य असलेल्या देशात मोठया प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने त्यांना त्यांचे खाद्य कमी पडते, जगण्यासाठी वातावरण कठीण असते आणि त्यांच्या पिल्लांची सुयोग्य वाढ अशा प्रमुख कारणांसाठी हे पक्षी3ते4 महिन्यांसाठी स्थलांतर करतात. अन्न, पाणी आणि घरटी बांधण्याची सोय या तीन प्राथमिक गोष्टींची गरज जितकी मानवाला, तितकीच ती पक्ष्यांना देखील!म्हणून त्यासाठी होत असावे स्थलांतर.त्यामुळे साहजिकच पक्षी, ज्या ठिकाणी या गोष्टींची कमतरता भासू लागते, अशी ठिकाणे सोडून मुबलकतेच्या जागी स्थलांतर करतात. हे पक्षी इतक्य...