'कुतूहल'ग्रीष्मातील 'बहावा' आणि 'गुलमोहोराचे'...
करोना vaccine घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्याने रस्त्यावरील सुंदर अश्या सोनसळी रंगाच्या, जर्द पिवळ्या रंगाची झकाळी असलेल्या बहावा ,लालबुंद असलेल्या गुलमोहोर, नितांत सुंदर ,मनमोहक अश्या ग्रीष्मातील दोन्हीही झाडांचे दर्शन घडले. गाडीतून झरकन बहाव्याची झाडे सरकत होती ,मोहच आवरला नाही गाडी थोडीशी थांबवायला लावली आणि घेतले नयनसुख त्या सोनसळी रंगांच्या फुलांचे. गाडीतील AC च्या थंडाव्या पेक्षाही थंडावा जाणवत होता तेव्हा त्या फुलांकडे बघताना. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हणतात. कुसुमाकर असेही त्याचे एक यथार्थ नाव आहे. कारण नवीन पोपटी, चकचकीत, तजेलदार हिरव्यागार पालवीबरोबर अनेकानेका वृक्षवेलींच्या फुलण्याचा, बहरण्याचा हा काळ असतो. आपण लहानपणापासून घोकत आलो आहोत, की ‘चैत्र-वैशाख वसंत ऋतू’ मराठी साहित्यामध्ये सर्वत्र असेच वर्णन केलेले आढळते. अगदी निसर्गप्रेमी भरभरून फुलायला लागलेल्या बहाव्याचे किंवा गुलमोहराचे सुंदर रंगीत चित्र वृत्तपत्रात देऊन त्याखाली लिहितात, की ‘वसंत ऋतूची चाहूल.’ वास्तविक बहावा आणि गुलमोहर हे ग्रीष्मात फुलणारे वृक्ष आहेत...