Posts

Showing posts from September, 2020

'कुतूहल 'सुदृढ, सुंदर हृदयाचे.....♥️

Image
                                            आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येवून अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होवू शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. आपल्या देशात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 32%मृत्यू हृद्यरोगामुळे होतात ,प्रत्येक घरात 1 हृदय रोगी आढळतो, त्यामुळे 'जागतिक हृदय दिन'असे दिवस साजरे करून हृद्यरोगविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होवू नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी ,हृदय कसे सुदृढ ठेवावे हे माहीत असणे गरजेचे आहे.....         पहिले तर मला याचेच कुतूहल वाटते की हृदयाला एका विशिष्ट symbol ♥️मध्ये सिनेमात represent करतात, त्याहीपेक्षा आणखी एका गोष्टीचे कुतूहल वाटते की दरवर्षी heart, circulation, double circulation हा part वर्गात घेत असताना ,हृदयाची संरचना घेताना लगेच एखादा विध्यार्थी उठून ♥️ अशी हृदयाची संरचना क्...

'कुतूहल' निसर्ग पर्यटनाचे....

Image
                                                पर्यटन ,प्रवास म्हंटले की सर्वांनाच आनंद होतो .सहलीला जायचे म्हणजे सर्वांचे चेहरे प्रफुल्लित होतात, शाळेत तर सहलीचा नुस्ता विषय जरी काढला तरी सर्वांची लगबग सुरु होते, सर्वच आनंदी होतात. सहलीवरून परत आल्यावर  नव्या उत्साहाने, नव्या जोमाने ,नव्या ऊर्जेने विध्यार्थी अभ्यासाला लागतात. पर्यटन म्हणजे अगदीच थोरामोठ्यांपासून तर लहानांपर्यत आवडीचा विषय असतो. "केल्याने देशाटन, पंडित, मैत्री,सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन ,मनुजा चातुर्य येतसे फार ". या अवघ्या दोन ओळीत कविश्रेष्ठ मोरोपंत यांनी पर्यटनाची महती गायली आहे .यावरून राष्ट्रीय, तसेच जागतिक पर्यटनाचे किती महत्व आहे हे लक्षात येईल.  पर्यटन म्हणजे काय तर ,एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास..... आजकाल आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येनी, अडचणींनी, वि...

'कुतूहल' संपात दिनाचे/Equinox day चे....🌍🌐🌞

Image
                       काल सहजच blog लिहीत असताना माझा मुलगा मला विचारत होता, आता कशाबद्दल लिहिते आहेस, त्याला सांगितले अरे उद्या 'संपात दिन 'आहे न त्यावरच लिहीत आहे.त्यावर त्याचे उत्तर आता हे काय नविन संपात दिन आणि हसायला लागला 😀teenagers मुलं अशीच करतात.Equinox day सांगितले तर मात्र त्याला लगेच  कळले.... मग काय जाणून घेऊया 'कुतूहल'संपात दिनाचे... आपली पृथ्वी सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेला उगवताना दिसतो.🌄🌅 संपात दिन म्हणजे दिवस व रात्र समान. 22 सप्टेंबर ते22डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो यालाच 'दक्षिणायन' म्हणतात.21मार्च ते21जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो यालाच 'उत्तरायण'म्हणतात.       23 सप्टेंबर ते21मार्च या कालावधीत सौर ऊर्जा बऱ्याच कमी प्रमाणात मिळत असल्याने उत्तर गोलार्धात हिवाळा असतो.दक्षिण गोलार्धात अगदी उलट परिस्थिती असते.21 मार्च ते23सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धातील प्रदेशात सूर्यप्रकाश अधिक काळ मिळतो व सूर्यकिरण 23सप्टेंबर त...

'कुतूहल' वाफेच्या शक्तीचे.......

Image
                 लहानपणी वाफ म्हटले की, वाफेची शक्ति म्हटले की चटकन नाव यायच ते जेम्स वॅट चे, कारण ते शाळेत असताना तोंडपाठ करून घेतले होते, जोड्या लावा च्या प्रश्नात हमखास येते म्हणून😊.एक lesson पण होता .वाफेची शक्ती-जेम्स वॅट.वाफेवर चालणारे engine.मला अजूनही आठवते, एकदा शाळेत शिक्षकांनी प्रश्न विचारला होता, तुम्हाला काय वाटते वाफेवर चालणाऱ्या engine बद्दल, वाफेच्या शक्ती बद्दल, कुणीतरी लगेच उत्तर दिले रेल्वेच्या रुळावर खूप साऱ्या उकळत्या पाण्याच्या केटल्या ठेवून त्यावरून रेल्वे इंजिन जाऊ द्यायचे खूप मजा येईल,त्याला हातावर 2छड्या मिळाल्या वरून सर्व वर्ग खि ....खि... करून हसत होता......तेव्हापासून एकच लक्षात ठेवले जेम्स वॅट-वाफेचे इंजिन.😄. वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट ला ओळखले जाते. प्रेशर कुकर हे सर्वांच्या घरी असणारं    वाफेवर चालणार उपकरण आहे.                   इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरच्या वापर केला जातो. दाबाखाली असलेल्या वा...

'कुतूहल' ओझोनच्या संरक्षक छत्रीचे...🌍.⛱️☔🏖️

Image
☂️⛱️☂️⛱️☂️⛱️☂️⛱️☂️⛱️☔⛱️☔⛱️☔ हो,'कुतूहल 'ओझोनच्या संरक्षक  छत्रिचे ........ ☔छत्री आपल्याला बहुतकरून पाऊस, उन्हापासून संरक्षण देते, परंतु निसर्गात पृथ्वीभोवती असणाऱ्या ozone च्या संरक्षक कवचाच्या छत्रीचे काय?ते तर आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीचे संरक्षण करते .म्हणूनच मी त्या ozone च्या कवच्याला छत्री म्हटले☂️. पण आपण काय करतो आहोत, त्या संरक्षक छत्रीलाच भोकं/छिद्र किंबहुना भगदाड पडण्याचे काम आपल्या कृतीतून करत आहोत. आणि म्हणूनच मग आज आपल्याला ओझोन संरक्षण दिवस साजरा करावा लागत आहे. मग काय जाणून घ्यायचे का या ozone च्या संरक्षक छत्रीचे 'कुतूहल' आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला म्हणजेच पृथ्वीवरील सर्वच सजीवांना जगण्यासाठी oxygen म्हणजेच प्राणवायूची आवश्यकता असते. ऑक्सिजन आपल्याला वनस्पती कडून मिळत असतो तो ही फुकट बरं. आणि आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड/धोंडा मारण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे काय तर आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करत आहोत.🌱त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला कदाचित,' हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृनाच्या मखमालीचे 'ही कविता फक्त green k...

'कुतूहल ' corona virus चे ..........

Image
                काल ,पर्वापासून news channel वर एकच बातमी वारंवार दिसते आहे मंदिर, मस्जिद, चर्च,.... इतर धार्मिक स्थळे उघडण्यात येणार. शाळा, कॉलेज,NEET, JEE ,अंतीम वर्ष परीक्षा या, या तारखेला सुरू होणार...... अचानक 5 महिन्यांपूर्वीच चित्र डोळ्यांसमोरून झरझर येऊ लागले. दहावीचा paper रद्द करण्यात आला. science&technology paper चे गठ्ठे अक्षरशः मी कडक उन्हात वाळवून नंतर त्यावर sanitizer spray करून घाबरत valuation करून तोंडाला मास्क लावून moderatorchya हवाले केले होते.... सगळेच काही नवीन होते sanitizer फक्त अधूनमधून वापरले जात होते पूर्वी, तेव्हापासून ते एक essential म्हणून आजही कायम सोबत आहे, मास्क वापरणे नविन होते तेव्हा ,वारंवार हात धुणे आता मात्र सगळ्या सवयी अंगवळणी पडल्यात. मार्च महिन्यात अचानक मंदिर, मस्जिद, चर्च ,शाळा, कॉलेज, कारखाने सर्वच पटापट बंद करावी लागली.....  सगळीकडे फक्त एकच नाव CORONA, COVID-19 सर्वांना ह्या नविन corona चे 'कुतूहल'वाटू लागले, आणि ते साहजिकच होते.     विज्ञानाची किती गरज आहे हे...

'कुतूहल'आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्याचे.....🌈

Image
           🌈⛈️🌅🌄☀️🌦️💦⛅💧🌨️🌦️🌧️🌈 इंद्रधनुष्य दिसणे हे एक अवकाशातील 'कुतूहल 'च आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात घडणाऱ्या ह्या घटनेचे कित्येकांना कौतुक वाटत असते. डोळ्यांना अतिशय सुखद असणारी ही घटना आहे. सुर्यप्रकाशामुळेच आपण सभोवताली असणारी सृष्टी बघू शकतो ,प्रकाश नसता तर सगळीकडे आपल्याला अंधार आणि अंधारच दिसला असता .सुर्यप्रकाशिवाय आपण मानवी जीवणाची कल्पनाच करू शकत नाही.🌄. मला तर लहानपणापासून च ह्या घटनेचे भारी वेड. खास आनंद घ्यायचा असला तर श्रावण महिन्यात घेता येतो. लहानथोरांपासून सर्वांनाच इंद्रधनुष्य बघावसा वाटतो. कदाचित इंद्रधनुष्याला त्याच्या आकारामुळे त्याचे हे नाव मिळाले असावे असे मला वाटते, कारण त्याची रंगीत कमान धनुष्यासारखी दिसते म्हणून.🌈 इंद्रधनुष्य म्हणजे काय तर आकाशात दिसणारी सात रंगांची उधळण. इंद्रधनुष्य जो व्यक्ती बघतो त्याच्या पाठीशी सूर्य क्षितीजापासून फार उंचावर नसेल तर सकाळी पश्चिमेला व संध्याकाळी पूर्वेस पाऊस पडत असताना आकाशात जे विविधरंगी अर्धवर्तुळं दिसते ते म्हणजे इंद्रधनुष्य.(Rainbow) इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंद...

कुतूहल सूर्योदय, सुर्यास्ताला दिसणाऱ्या सुर्याच्या लाल रंगाचे ..🌞

Image
       सूर्य सकाळी उगवतो तेव्हा तो एखाद्या लाल गोळ्यासारखा दिसतो. जसजसा दिवस वर येतो तसतसा तो पांढरा दिसतो आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचा रंग परत लाल होतो ,हे असे होण्याचे काय बरं कारण असेल, आहे न कुतूहल.... जाणून घायचे मग.                    🌐पृथ्वी सूर्याभोवती🌞 फिरते हे आपल्याला माहीत आहे. पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो त्या भागावर सूर्यप्रकाश पडतो. आणि त्या भागावर दिवस झाल्याचे आपण म्हणतो.  साधारणपणे सूर्योदय होणे म्हणजे सुर्याचे क्षितीजाच्या वर येणे.🌄🌅 सूर्यप्रकाश जांभळा, पारवा, अस्मानी/निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी ,तांबडा/लाल या रंगाच्या एकत्रीकरनामुळे होतो.🌈प्रकाश विभक्त झाल्यानंतर या वेगवेगळ्या सात रंगात होतो. तरंग लांबी हा प्रारणांचा/किरणांचा महत्वाचा गुणधर्म आहे.आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी 400 nm ते700nm च्या दरम्यान असते .यामध्ये तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700nm च्या जवळ असते.  सायंकाळी सूर्य जेव्हा ...