'कुतूहल' वाफेच्या शक्तीचे.......

               
 लहानपणी वाफ म्हटले की, वाफेची शक्ति म्हटले की चटकन नाव यायच ते जेम्स वॅट चे, कारण ते शाळेत असताना तोंडपाठ करून घेतले होते, जोड्या लावा च्या प्रश्नात हमखास येते म्हणून😊.एक lesson पण होता .वाफेची शक्ती-जेम्स वॅट.वाफेवर चालणारे engine.मला अजूनही आठवते, एकदा शाळेत शिक्षकांनी प्रश्न विचारला होता, तुम्हाला काय वाटते वाफेवर चालणाऱ्या engine बद्दल, वाफेच्या शक्ती बद्दल, कुणीतरी लगेच उत्तर दिले रेल्वेच्या रुळावर खूप साऱ्या उकळत्या पाण्याच्या केटल्या ठेवून त्यावरून रेल्वे इंजिन जाऊ द्यायचे खूप मजा येईल,त्याला हातावर 2छड्या मिळाल्या वरून सर्व वर्ग खि ....खि... करून हसत होता......तेव्हापासून एकच लक्षात ठेवले जेम्स वॅट-वाफेचे इंजिन.😄.
वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट ला ओळखले जाते. प्रेशर कुकर हे सर्वांच्या घरी असणारं    वाफेवर चालणार उपकरण आहे.                   इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरच्या वापर केला जातो. दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे हे त्याचे तत्व आहे. परंतु आपल्याकडे 3,4 शिट्ट्या होवू देण्याची परंपरा आपण काही सोडत नाही, वास्तविक त्यामध्ये पाहिजे तेवढे प्रेशर create झाले की अन्न आरामात सहजतेने शिजते, आणि जंतू देखील मरतात. जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु ते प्रेशर कूकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.आहे न 'कुतूहल'वाफेच्या शक्तीचे...
उकळत्या पाण्याच्या उष्णतेइतकी ह्या वाफेची उष्णता असते. एका पसरट भांड्यात/परातीत पाणी भरून ते वातावरणात उघडे ठेवले की पृष्ठभागाच्या पाण्याचे रूपांतर वायूत होते; परंतु हा वायू तप्त नसतो तेव्हा त्याला बाष्प म्हणतात.तसे कोणत्याही द्रवाचे बाष्पीभवन होते. तसेच ते उकळले असता त्याच्या काही भागाचे रूपांतर वायूत होते;पण त्यास वाफ म्हणत नाहीत. फक्त पाण्याच्या तप्त वायूसच वाफ म्हणतात.100℃तापमानाला पात्रात ठेवलेले पाणी उकळत असले, तरी सगळ्याच पाण्याची एकदम वाफ होत नाही. त्यासाठी त्याला सतत उष्णता पुरवावी लागते. उघड्या भांड्यात तयार होणारी वाफ वातावरणीय दाबाखाली तयार होते. परंतु बंद भांड्यात उदा. प्रेशर कुकर मध्ये तयार होणारी वाफ वातावरणीय दाब अधिक त्यात तयार झालेला वाफेचा दाब यांच्याखाली तयार होते त्यामुळे अश्या दाब ला निरपेक्ष दाब म्हणतात. जसजसे बंद भांड्यात वाफेचे प्रमाण वाढत जाते तसतसा निरपेक्ष दाब वाढत जातो बंद भांड्याचे घनफळ निश्चित असल्याने तेवढ्याच जागेत वाफ सामावू लागते. त्याला दाबपात्र म्हणतात. बाष्पीपात्रात पाण्यापासून वाफ निर्माण करतात.
1gm पाण्याचे तापमान 0℃ते100℃पर्यंत वाढवल्यास 100cal/418.68ज्यूल उष्णता द्यावी लागते, परंतु संपूर्ण 1gm पाण्याचे रूपांतर वाफेत करण्यासाठी या उष्णतेच्या 5.4पट म्हणजे 540cal/2266.87ज्यूल उष्णता द्यावी लागते, म्हणून उकळत्या पाण्यापेक्षा वाफेचा चटका वा दाह जरा जास्त असतो. या उष्णतेला सुप्त उष्णता म्हणतात.
540cal ही सुप्त उष्णता समजण्यात येते.
वाफ ही रंग, वासरहीत असून ती दिसत नाही. पाण्याचा अंश असलेल्या वाफेला सद्रव वाफ म्हणतात. पाण्याचा अंश नसलेल्या वाफेला शुष्क वाफ म्हणतात.
मला तर  आता कुठे हल्ली त्या वाफेच्या  शक्तीचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.खूप सारे message पण viral होत आहेत, वाफेबद्दल चे.
Corona आणि वाफ जणू काही एक समीकरणच झालंय. गेल्या 4,6महिन्यांपासून त्या वाफेच्या शक्तीचा आविष्कार सातत्याने घरोघरी होताना दिसतोय.घरोघरी steamer आले, corona virus ला मारून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वच.
श्वास नलिका(Trachea),आणि अन्ननलिका(food pipe)ह्या दोन वेगवेगळ्या आहेत.एक paranezal सायनस म्हणून नाकाच्या पाठीमागे एक हाड असते, त्याच्या मागे एक पोकळी असते, त्या पोकळीमध्ये संसर्गाचे जंतू जाऊन बसतात. तिथे एक प्रकारचे locking mechanism असते त्यामुळे बाहेरील जंतू जाऊन प्राथमिकता तिथे अडकतात. परंतु तिथून ते चार दिवसांनी फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात आणि नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो जर त्या जंतूंना पॅरानेझल सायनस मध्येच मारायचं असेल तर steam घेणे अति आवश्यक. आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहचू शकत नाही. साधारणपणे 40℃ते60℃ची वाफ ही त्या virus ला पांगळी करून आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते.70℃ची वाफ ही त्या virus ला पुर्णपणे मारते. असे ऐकिवात आहे. घरात बसून असाल तर एकदाच वाफ घ्यायची, बाहेर जात असाल तर दोनदा, आणि जास्त लोकांमध्ये जात असाल तर तीनदा. covid-19 च्या संपर्कात असाल तर दर2तासांनी वाफ घेतली पाहिजे.
असो या वाफेच्या शक्तीने जर corona virus नष्ट होत असेल तर चांगलेच आहे, आपल्याला सर्वसामान्य जनतेला परवडणार आहे हे वाफ घेणे, लस आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत.लहान मुलांना आणि म्हाताऱ्या लोकांना तर खूप कंटाळा येतो या दररोजच्या वाफ घेण्याचा.पण करणार काय,precaution is better than cure.because safety
 is our no 1 priority.
डॉक्टर आपल्याला सर्दी, खोकला असल्यास वाफ घ्यायला सांगतात. वाफेमुळे नाकातला आणि घश्यातला म्युकस ज्यामुळे कफ तयार होतो तो पातळ होतो आणि शरीरात कमी झालेले ऑक्सिजन चे प्रमाण वाढते त्यामुळे मोकळा श्वास घेता येतो.सर्दी, कफ steam थेरेपी नि बरी होते पण corona virus चे काय?मला वाटते वाफेच्या शक्ती चे प्रयोग करून पहायला काहीच हरकत नाही.

😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷
          #कुतूहल वाफेच्या शक्तीचे
           #प्रेशर cooker
             

               


             @सौ. उज्वला तायडे, अकोट

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....