'कुतूहल'दुधाच्या पांढऱ्या रंगाचे...
'कुतूहल'दुधाच्या पांढऱ्या रंगाचे....... दुधाचा रंग पांढरा च का? लहानपणी सारखं कुतूहल वाटायचं सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग एकसारख्याच का? लहानपणी जेव्हा जेव्हा जबरदस्तीने दूध प्यावे लागत होते तेव्हा वाटायचे दूध वेगवेगळ्या रंगात मिळाले असते तर किती छान झाले असते, वेगवेगळ्या रंगाची वेगळी चव असती,असे सारखे वाटायचे. घरातील थोरामोठ्यांना हा प्रश्न विचारला की सांगायचे सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढरा च असतो, मुकाट्याने पिऊन घ्यायचे. आहे की नाही 'कुतूहल'. माझ्यासारखे तुम्हाला पण कुतूहल वाटत असेल न? आपण कधी विचार केलाय का की,आपण जे दूध पितो जे की म्हशींपासून, गायींपासून मिळते ते पांढऱ्या रंगाचेच का असते ? आज याचे उत्तर शोधू या चला. दूध हे बहुतांश पाण्यापासून बनलेले असते. दुधात87℅पाणी असते व इतर13%मध्ये चे जर वर्गीकरण करायचे झाले तर त्यामध्ये- 5%लॅक्टोज ,साधारणपणे4%चरबीयुक्त घटक व उर्वरित 4%प्रथिने असतात. 4%प्रथिनांमध्ये कॅल्शियम व कॅसिन नावाचे घटक उपलब्ध असतात. कॅल्शियम व कॅसिन चा दूध पांढरे असण्याशीकाय संबंध? संबंध आहे आणि तो ही खूप जवळचा आहे. कॅल्शियम आणि कॅसिन मध्...