Posts

Showing posts from August, 2020

कुतूहल जास्त oxygen देणाऱ्या झाडांचे....

Image
 🌱🌲🌳🌴🌵🌿🌾🍀☘️🌿🌵🌴🌳🌲🌱                           सर्वसाधारणपणे सर्व झाडे रात्रीच्या वेळी वातावरणात कार्बनडायॉक्साईड सोडतात ,मात्र काही झाडे ऑक्सिजन उत्सर्जित करून पर्यावरणास हातभार लावतात पाहूया नेमकी कोणती आहेत ही झाडे.  कारण आता covid-19,corona मुळे शरीरातील ऑक्सिजन lavel ला जास्त महत्त्व आले आहे.                                   आपल्याला आपलाच निसर्ग वाचवण्यासाठी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्याची आवश्यकता पडते. आहे की नाही "कुतूहल". दरवर्षी देशभर झाडे लावण्याचा सोहळा वनमोहोत्सवाच्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी लाखों रोपं लावली जातात पण ती सगळी जगतातच असे नव्हे. निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी ...

"कुतूहल "सुरवंटा च्या रंगबिरंगी फुलपाखरांचे....🦋

Image
दरवर्षी पावसाळ्याच्या सुमारास आपणांस फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व चित्रविचित्र नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फ़ुलांवरून त्या फुलावर स्वच्छन दपणे उडताना आढळतात.सर्वांनाच आकर्षित करतात. फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखामुळे हे कीटक उडताना लहानथोरांचे लक्ष आपणाकडे सहजतेने आकर्षून घेतात. काल, परवाची गोष्ट आहे, माझा मुलगा शाश्वत mobile मध्ये फुलपाखरू त्याच्या कोशातून बाहेर पडण्याची shooting /videoकाढून तो आनंदी क्षण अनुभवत होता, मला सुद्धा घरातून अंगणात आणून तो क्षण टिपणाचा आग्रह करत होता,म्हणत होता thanks to nature. I am so lucky, I will get to see an adult butterfly emerge. मुलांची सृजनशीलता व पर्यावरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यांना बळकटी येणेही महत्वाचे आहे. कीटकांची नैसर्गिक रचना कशी असते हेही त्यांना कळायला हवे. "असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी"याप्रमाणे जर आवड असेल तर या अडचणींवर मात करता येते. पर्यावरणाबाबत भान वाढीस लागणेही आजची आत्यंतिक गरज आहे. कोणत्याही वयोगटातील माणसे ह्यास अपवाद नाहीत ही जाणीव खरेतर लहानपणापासून वाढीस लागायला हवी.     फ...

कुतूहल जंगलाचे देणे रानभाज्यांचे.........

Image
            पावसाळा सुरू झाला की या रानभाज्या जंगलात/रानात कोणत्याही मेहनती शिवाय आपोआप उगवतात सध्याच्या organic food च्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या  अर्थाने organic food असतो.त्यांना कोणत्याही कीटकनाशक, खत दिलेले नसते.पूर्णपणे नैसर्गिक रीतीने ,पध्दतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातील एक पर्वणीच आहे.     त्या दिवशी घरी परतत असताना कामानिमित्त गाडी घेऊन बाजारातून आले असता   एक मुलगा जोरजोरात आवाज देऊन ओरडून म्हणत होता जिवतीची फुलं  विसचा पंधरा ला 1 गंज(bunch) घ्या मॅडम,60चे 4 गंज घ्या, आधीच पाऊस पडत असल्याने अंगात तो raincoat ,आजूबाजूला भरपूर वाहनांची गर्दी, त्याला म्हंटले 100ला दे. माझ्याकडे चिल्लर नाही. तो नाही म्हणाला माझ्याकडे4च आहेत ते 60 ला घ्या, असू दे .म्हणून त्याच्या हातात 100रुपये दिले. मला पावसात गाडी हातात घेऊन त्रास होत होता, त्यातल्या त्यात पिशवी सोबत नसल्याने फुले ठेवायची कुठे हा देखील प्रश्न होता. त्याला त्याच्याजवळ असलेली पिशवी दे म्हंटले तर तो म्हणाला माझेकडे paper होत...

मुरांबा मैत्रीचा .............एक कुतूहल....

Image
मैत्री चा मुरांबा आहे न "कुतूहल".खरोखरच आता मैत्री चा मुरंबा झाल्यासारखे वाटत आहे.मुरांबा/मुरंबा/मोरावळा मुरल्यानंतर त्याची गोडी आणखी वाढू लागते, आणि खरं म्हणजे त्या मुरंब्यांनी आजार बरा होतो. मित्र/मैत्रीण म्हणजे आपल्यासारखाच असणारा परंतु दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला एक जीव. मैत्री तशी खरी तर शाळेमध्ये असतानाच रुजते. आज सुरेखा आणि माझ्या मैत्रीला 27 वर्षे झालीत . 11वि ला प्रवेश केल्यानंतर सर्वच नवे, नवे चेहरे ,वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्वच,त्यात ती मला आपलीशी वाटली आणि मी अलगदपणे माझी मान विश्वासाने तिच्या खांद्यावर टाकली. तिथपासून सुरू झाला मैत्रीचा प्रवास ,पुढे 12वि, Bsc, Msc, सर्वच 1च बाकड्यावर (bench).वर .अगदी रूममध्ये दररोज चा चहा बनवण्यापासून ते माझी प्रत्येक दिवशी वेणी घळण्यापर्यंत ,आणि मेस मध्ये जेवण चांगले नसले की रूममध्ये काहीतरी बनवून खाऊ घाळलेपर्यंत लाड पुरवलेत माझे ,शिवाय प्रवासात माझे डोके तिच्या मांडीवर ठेवून मला त्रास होऊ नये म्हणून.आणि आता profesionaly सुद्धा एकाच ठिकाणी, त्यामुळे प्रत्येक, training, workshop, science exhibits, मुलेही एका...