Posts

Showing posts from August, 2021

'कुतूहल'वैज्ञानिक दृष्टीकोनाचे...

Image
      परवा एका विद्यार्थ्याने विचारले,  ते वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय?आज बऱ्याच लोकांच्या status ला बघितले म्हणून विचारले.थोडं घाईत होते म्हणून म्हटले नंतर सांगते.मानवी प्रगतीमध्ये प्रश्न विचारण्याचा आणि त्याची उत्तरे शोधण्याचा खूप मोठा वाटा आहे.मानवी विकासात व मानवी प्रगतीत कशाचा वाटा जास्त आहे हे ठरवायचे झाले तर निरीक्षण करणे, प्रश्न विचारणे, पर्याय शोधणे या बाबींचा वाटा महत्वाचा ठरेल. पूर्वी पडलेले अनेक प्रश्न व समस्या मानव एकट्याच्या जोरावर सोडवत असणार .मात्र आता त्याचे प्रश्न अनेकांच्या मदतीने सुटू लागले .इंटरनेट चा वापर करून एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. त्यामुळे मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करता येते. त्याने मिळवलेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडले जाते.एका थोर विचारवंताने म्हटले आहे,"श्रध्दा ठेवणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती नसून प्रश्न विचारणे आणि ज्ञान मिळवणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशाळेतील विज्ञानाचे प्रयोग यामध्ये फरक आहे. प्रयोगशाळेमध्ये केले जाणारे प्रयोग हे नक्कीच ...