Posts

Showing posts from May, 2022

'कुतूहल'फळांचा राजा आंब्याचे...

Image
    🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭आंबा म्हंटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही, मग तो कच्चा असो की पिकलेला. फलाहार हा आरोग्याच्या दृष्टीने एकदम सुयोग्य असा आहार आहे. मनुष्याला फळे आवडतातच. विविध ऋतुंमध्ये उपलब्ध होणारी सर्व फळे हा निसर्गाचा चमत्कारच आहे. त्यामध्ये ऐन उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध असणारे आंबा हे फळ सर्वांप्रमाणे  माझेही आवडते फळ आहे.मलाच काय तर आबालवृद्धांना आवडणार गोड फळ म्हणजे आंबा. आंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतात. आंब्याची आगमनाची चाहूल आंब्याच्या झाडाला मोहोर आल्यावर समजते. त्या मोहोराचा सुद्धा एक मंद  असा सुवास असतो. ह्या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतात. कोकीळ हा पक्षी त्यावेळेस कुहू... कुहू .…करून गाणी म्हणत असतो. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते. आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात.   आंबा फळाचा राजा आहे. आंबा  हे भारत आणि पाकिस्तान या देशां...