'कुतूहल'फळांचा राजा आंब्याचे...
हापूस ही एक आंब्याची जात आहे. हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.
कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास 'आंब्याचा माच लावणे' किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात.अशा प्रकारे साधारणतः १०-१५ दिवसात, झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.
हा १०-१५ दिवसाचा अवधी कमी करण्यासाठी रसायने टाकून आंबा, केळी, चिकू इत्यादी फळे पिकविण्याचे एक तंत्र आहे. त्याने ३-४ दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कारबाईड इत्यादी रसायनांचा वापर यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत रसायनांचा काही अंश फळात जातो. ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती १ ते २ दिवस आंब्याच्या पानांत किवा धान्यात दाबून ठेवतात.
आंब्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.आंब्यातील व्हिटॅमिन ए,सी, आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहेत.आंब्यामध्ये व्हिटॅमिन इ, जस्त, लोह, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहेत.मॅग्नेशियम आणि पोटॅशिअम असते.
आंबा फळात पॉलीफेनॉल आणि वनस्पती संयुगे असतात जे अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. मॅंगीफेरिन, कॅटेचिन्स, अँथोसायनिन्स,कॅम्पफेरॉल, रॅमनेटीन, बेंझोइक ऍसिड आणि इतरांसह डझनभर भिन्न प्रकार आहेत.
आंब्या मध्ये अ, क जीवनसत्व मोठ्या प्रमाणांत आहे. तसेच उष्मांक(calories), प्रथिने (proteins ), तांबे(Copper), पोटॅशिम (Potassium) ,फायबर (Dietary fiber), ब६ जीवनसत्व (Vitamin B6), ब५ जीवनसत्व (Vitamin B5) हे घटक देखील थोड्याफार प्रमाणात असतात. संशोधनातून असे निदर्शनात आले आहे की, आंब्यामधील पोषक द्रव्यामुळे आपली पचनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढते.
भारतीय संस्कृती मध्ये आंब्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आंब्याची पानांचा वापर तोरण बनवण्यासाठी केला जातो, जे आपण घरातील दारांना लावू शकतो. मुख्यतः लग्न समारंभात, मंगल कार्यात, सणांच्या दिवशी किंवा शुभप्रसंगी आंब्याच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कलशामध्ये आंब्याचा टाळा (कलम ने केलेल्या आंब्याची फांदी) नारळाबरोबर ठेवला जातो. उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. परंतु यापैकी चांगल आणि पिकलेला आंबा कसा शोधायचा?
नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंब्यांना कार्बाईडने पिकविलेल्या आंब्यासारखा पिवळा चकचकीत आकर्षक रंग येत नाही. तो मळकट दिसतो
कृत्रिमरीत्या कार्बाईडमध्ये पिकविलेले आंबे दिसायला आकर्षक पिवळे दिसतात, त्याला दाबल्यानंतर सहजासहजी ते दबत नाहीत. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा नाकाजवळ धरला तर, त्याचा घमघमाट येण्याऐवजी उग्र वास येतो आणि स्वादिष्ट नसतात म्हणजे त्यात गोडवा आलेला नसतो, आंबट लागतात. रस केला तर त्यात साखर टाकावी लागते.मला तर आंबा फळाची रांगोळी काढण्याचा मोह देखील आवरता आवरत नाही.हल्ली मुलं आंबा चोळून खात नाहीत तर छान आंब्याला काप देऊन त्याचे तुकडे करुन खातात.
आमच्या लहानपणी आम्ही मात्र सुरकुत्या पडलेले आंबे पिळून, चोळून खायचो.रात्री झोपताना सुध्दा सुरकुत्या पडलेले आंबे आजीच्या गोष्टी ऐकताना ,खात.खूप मजा यायची .आजीचा सुरकुत्या पडलेला गौरवर्णी ,पिवळा चेहरा आणि आंबा दोन्हीही सारखेच दिसायचे .आमचेकडे झाकणाचे आंबे म्हणून गम्मत करत खाण्याची खूप मजा यायची. सुट्टी आणि आंबा खाण्याची मज्जा खूपच वेगळी असते. उन्हाळ्यात पाहुणे आले की आंब्याचा रस हमखास बनवला जातो. मला आठवते आमच्या लहानपणी जर घरात टोपलभर आंबे दिसले म्हणजे,खूप आनंद व्हायचा आम्ही समजून जायचो की, आत्या येणार आणि मग आई तो बिनपाण्याचा रस बनवणार .एरवी मात्र पाणी घालून रस बनवला जायचा. खास पाहुणे नसले,पाणी घालून केला तरीही त्याचा गोडवा मात्र कायम असायचा. त्यावेळी एवढे कृत्रिम रसायने पिकवण्यासाठी नाही वापरले जायचे.तेव्हा घरीच गवतात आंबे ठेवून पिकवले जायचे.उन्हाळा आणि आंबा खूपच छान कॉम्बिनेशन आहे.आंब्याचे विविध पदार्थ बनवून सुट्टीचा आनंद घेत खाल्ले जातात.खरोखर आंबा हे फळ अमृततुल्य फळ आहे यात काही शंका नाही.म्हणूनच हे फळ सर्वांच्या आवडीचे होऊन फळांच्या राज्याच्या यादीत जाऊन बसले. आहे न 'कुतूहल'आंब्याच्या गोडव्याचे.
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

Comments
Post a Comment