कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....

 
काही फुले रात्री उमलतात ..त्यांच्या या सवयीमागे एक महत्त्वाचे कारण आहे. फुलांच्या उमलण्यामागचा मुख्य उद्देश त्या वनस्पतीचा बीजप्रसार करणे हा असतो.
उमलल्यानंतर आकर्षक दिसणारी अशी फुले मधमाश्यांना व किटकांना आकर्षित करतात. मधमाश्या अश्या फुलांवर बसतात व त्यांच्या मार्फत बीजप्रसार होत असतो. म्हणून त्यांना polineter म्हटले जाते. बहुतेक polinater हे दिवसाच्या सूर्यप्रकाशात फिरतात. परंतु काही कीटक रात्रीच्या अंधारात फिरणे पसंत करतात(nocturnal,निशाचर म्हणतात. उदा. पतंग(moth)म्हणून या किटकामार्फत ज्या वनस्पतींचा बीजप्रसार होतो त्या वनस्पतींच्या फुलांना या कीटकांच्या वेळापत्रकाप्रमाणे Adjust करावे लागते. म्हणूनच रात्री फुलणारी फुलं सामान्यपणे पांढरी किंवा फिकट रंगाची व सुगंधित असतात .जेणेकरून रात्रीच्या अंधुक प्रकाशात ती कीटकांना आकर्षित करू शकतील उदा. रातराणी.
साधारणपणे भारतीय फुलं पांढरी आणि सुवासिक असतात तर रंगीत फुले कमी वासाची असतात.
ह्या पांढऱ्या रंगाचं आणि पावसाचं पण एक नात असतं बरं का, बहुतेक सर्व पांढरी फुलं पावसाळ्यात फुलू लागतात कारण पण उघडच आहे. पाण्यामुळेच त्यांच्यात सुवास निर्माण होतो.
सुगंधी ,वासाची पांढरी फुलं म्हटली की पहिलं नाव तोंडावर येतं ते जाई, जुई, रान जाई, मोगरा, मदनबाण,निशिगंध.
जुईला तर वर्षभर फुले येतात. same जुईचीच copy असणार दुसरं फुल म्हणजे 'सायली' किंवा' चमेली.' आणखी एक शुभ्र सुंदर फूल म्हणजे'कुंदा',म्हणूनच की काय पांढऱ्या स्वच्छ दातांना कुंद कळ्यांची उपमा देतात."या कुंदेन्दू तुषार हार धवला "सारख्या सरस्वतीच्या श्लोकात पण धवल पणासाठी(पांढऱ्या)कुंदाची उपमा दिली आहे. पण कुंदाच जरा वेगळं आहे, जवळ गेलो तरच येतो त्याचा गंध. पाच पाकळ्यांच चांदणीसारखं दिसणार वासानं घर सुगंधित करणारं फूल म्हणजे 'मोगरा'.कधी एकेरी तर कधी खूप गच्च पाकळ्यांच हे फुल .या मोगऱ्याच्या एका जातीच नाव तर हजारी मोगरा आहे कारण तो गुच्छ गुच्छयांनी फुलतो. परवाच friendship day ला gift केला मला माझ्या मैत्रिणीने हा हजारी मोगरा.
ब्रह्महकमल (Epiphyllum oxypetalum)हे cactus(निवडुंग)वर्गातील एक झुडूप आहे, cactus असून ह्याला काटे नसतात. वास्तविक निवडुंग म्हटलं की त्याला काटे आलेच  ही आपली समजूत आहे.त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची पांढऱ्या रंगाची, सुगंधित फुले येतात ,जुलै सप्टेंबर च्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास हे फुल पूर्ण उमलते, मात्र सकाळपर्यंत कोमेजून जाते. एकाच दिवशी अनेक घरात एकाच वेळी अनेक ब्रह्महकमले फुलतात ही आश्चर्याची गोष्ट समजली जाते.
फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलने या पाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो बरं.
"निशिगंध"/गुलछबु/गुलछडी/Tuberose ही सुद्धा सुवासिक अशीच फुले आहेत .रात्री उमलतात म्हणून त्यांना निशिगंध म्हणतात. हे फुले खोडसदृश दांड्याच्या टोकावर येतात. त्या दांड्यावर30फुलं असतात. याची पण गंमत आहे, दांड्याच्या खालच्या भागातील फुले आधी उमलतात त्यानंतर त्याच्या वरची आणि सर्वात शेवटी टोकाकडील फुले उमलतात ....
नलिसारख्या आकारातून पांढऱ्या रंगाच्या सहा पाकळ्या वर आलेल्या असतात अश्या विशिष्ट रचनेमुळेच त्याला Tuberose म्हणतात.
पांढऱ्या फुलांवर वेगवेगळ्या रंगांच्या छटा आल्या की त्यांचे रंग वेगवेगळे वाटतात .रातराणी दरवळण्याची वेळ रात्री8वाजता पासुन 2,3 पर्यंत .पहाट झाली की मात्र पारिजातकाचे राज्य सुरु होतं. अत्यंत मधुर वासाच हे फुल भल्या पहाटे दरवळण्यास सुरवात होते ते सुर्योदया पर्यंत .ज्यांना पहाटे उठण्याचा कंटाळा येतो त्यांना मात्र ह्याच्या सुगंधाचा आनंद घेता येणार नाही.
या बाई या, या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या.... ही कविता आठवते लहानपणी ची जेव्हा माझ्या अंगणातले बकुळी चे फुल बघते.
छोट्या बटणच्या आकाराचं बकुळीच फुलाचा छान सडा दिवसभर पडत असतो. लांबपर्यंत याचा मंद सुगंध जातो हे फूल सुकल्यावर देखील सुगंध देते..... आहे न कुतूहल "बकुळी" च्या फुलाचं.
"बुचाच फुलही "असच सुंदर लांबपर्यंत वास दरवळणार ,याला लांब देठ असल्याने दोरा न ओवताच छान गजरा करता येतो. फुलदाणी मध्ये पाण्यात ही फुले ठेवली की छान आरामात 3-4 दिवस सुगंध देतात. यालाच "गगनजाई/ आकाशमल्लिका//आकाश निल "सुद्धा म्हणतात. त्याहीपेक्षा अगदी 6-7 पाकळ्या असलेले "अनंताचे"टपोरे फुल कोकणात तर फारच प्रिय .वास/सुगंध तर इतका छान की याला गंधराज/सुगंधराज देखील म्हणतात.आणि हो दरवर्षी सकाळची शाळा लागली म्हणजे चैत्र पहाटेच्या मंद झुळकी बरोबर कडुलिंबाच्या फुलांचा वास दरवळतो गाडीवरून जाताना आगदी मोहरून टाकणारा सुगंध अप्रतिमच!
असाच मोहरून टाकणारा आंबेमोहोर आंब्याच्या मोहराचा वास तो सुद्धा तेव्हाच सोबतीला असतो.
काही बाभळी ना देखील छान वासाची फुले येतात.
कामाचे कितीही tension असले तरी ते हलकं करण्यासाठी ही फुले सदा सोबतीला असतात.
प्राजक्त म्हटला की मला लहानपणी चे गाणे आठवते
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले...... गाणं म्हणत जिथे हे झाड दिसेल तिथे झाडाखाली उभे राहून दुसऱ्या कोणीतरी फांदी हलवायची फुले तर नाही पण अंगावरती पाण्याचे थेंब पडायचे.... त्यातही आनंद होता.. फुले तर पहाटेच ओघळून गेलेली असायची.
"पारिजात "रंग, रूप,गंध गुणधर्म सगळे कसे अनोखे, वेगळेपण .
चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या आठवतात 
"झाडावरून प्राजक्त ओघळतो ,
त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थ असा नाही,
की त्याला इजा होत नाही"
'अश्रूंची झाली फुले 'ह्या नाटकातील विद्यानंदानी आशीर्वादपर लाल्या ला दिलेली प्राजक्ताची फुले त्याच्या हातावर ठेवत ,त्यांनी म्हटलेली वाक्ये आठवतात ,"ह्या फुलांसारखा हो! सुंदर,सात्विक आणि प्राजक्तासारखा सुगंधी "
परिजातकविषयी बऱ्याच आख्यायिका आपल्या संस्कृतीत ऐकिवात आहोत. जसे की एकदा देवर्षी नारदाने श्री कृष्णाला ही फुले भेट म्हणून दिली, श्रीकृष्णाला ती खूप आवडली ,त्यानी ती रुख्मिणीला दिली. रुख्मिनी पारिजातकाच्या फुलांकडे बघुन हरवून गेली आणि तिने लगेच ती आपल्या केसात माळली. ही वार्ता सत्यभामा हिला कळली, तिला खूप राग आला आणि तिने श्रीकृष्ण जवळ हट्टच धरला की मला हा वृक्ष आपल्या वाटिकेत हवा. शेवटी श्रीकृष्णाने इंद्राशी युद्ध करून हा वृक्ष मिळवला आणि सत्यभामा ला दिला, तिने आपल्या वाटिकेत खरा पण झाले उलटेच प्राजक्ताच्या फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायचा .पुढे मग सत्यभामा चा रुक्मिणीबद्दल मत्सर वाढतच गेला.
ह्या परिजातका संदर्भात आणखी एक कथा ऐकायला मिळते......पारिजात   नावाच्या राजकन्या ची .
या झाडाची फुले रात्रीच उमलतात आणि रात्रीच गळून पडतात .असे वाटते की पारिजात राजकन्ये चे दुःख म्हणून रात्रभर फुलांचे अश्रू ओघळत असते. 
म्हणून या झाडाला The tree of sarrow/The sad tree म्हणूनही ओळखतात.
असो ह्या झाल्या दोन्हीही आख्यायिका आपल्याला माहिती आहे की बीजरोपन केल्याशिवाय झाड उगवत नाही. fertilisation, germination, pollination,  reproduction     ह्या सगळ्या process शिवाय plant formation होत नाही.
अजब आहे न रंगांचे सौंदर्य दुरून न्याहाळता येते, मात्र सुवास आपल्या जवळ खेचून आणतो. सुगंधी फुलांमुळे बरेचसे रोग, रोगजंतू नष्ट होतात, प्रतिकार शक्ती वाढते.
तापलेल्या मातीवर पाऊस पडल्यावर जो मातीचा गंध दरवळतो त्याच्यापुढे बाकी सर्व गंध फिक्के पडतात असं बहुतेकांच मत असते अर्थातच माझंही त्यापेक्षा काही वेगळं नाही. तरीपण फुलांच्या वासाच/सुगंधा च महत्त्व कमी होत नाही.
निसर्ग महान आहे, त्याची गुपिते मानवी बुद्धीला न उलगडलेले कोडेच आहे.🙏.
माणसाचं जग पण ह्या फुलांसारखं असावं प्रत्यकाने आपल्या कर्तृत्वाने, अस्तित्वाने सर्वांनाच आपलंसं करावं,फुलांना ना जात, धर्म, पंथ त्यांच काम फक्त आपल्या रंगाने, सुगंधाने सर्वांनाच आनंद देणं, आकर्षित करणं आहे.
जी फुले दिवसा उमलतात त्यांना खूप आकर्षक रंग असतात आणि जी रात्री उमलतात त्यांना रंग पांढरा शुभ्र असतो पण खूप आल्हाददायक सुगंध असतो.
आहे न "कुतूहल "रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सुगंधी फुलांचे.
      🌼🌼  🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼             #कुतूहल रात्री उमलणााऱ्या पांढऱ्या सुगंधी फुुलाचे
#पांढरी फुले
#सुगंधी फुले
#रात्री उमलणारी फुले
                संदर्भ-माहिती मराठी विश्वकोश
 Internet, पाठ्यपुस्तके,

@उज्वला किसन तायडे,अकोट

Comments

  1. अतिशय आवडणारा विषय घेतलास खूप नवीन माहिती मिळाली। असच छान छान लिहित रहाbest wishes

    ReplyDelete
  2. Very good information about White fragrant flowers

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती सांगितली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......