Posts

Showing posts from March, 2021

'कुतूहल'....once upon a mulberry plant......

Image
                आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने            कुतूहल माझ्या  अंगणातीलmulberry plant चे...  Once upon a mulberry plant..... माझा शाश्वत लहान असताना माझ्या प्रत्येक story ची starting अशीचअसायची ..... त्याला कारणही तेवढेच महत्वाचे आहे.. माझ्या आईने माझ्या एका वाढदिवसाला दिला होता, mulberry plant झाले त्याला 10वर्षे. दररोज माझ्या शाश्वतला झोपताना 4ते5 गोष्टी सांगाव्या लागायच्या.आज त्या mulberry वर खूप मोठ्या संख्येने चिमण्या, कोकीळ पक्षी, बुलबुल पक्षी आणि इतरही पक्षी भरपूर प्रमाणात येतात. कारण त्यावर पक्ष्यांना थंड पाणी पिण्यासाठी3,4 earthen pot, 2 bird feeder लावले आहेत त्याने. दररोज सायंकाळी,सकाळी पक्ष्यांची शाळाच भरते त्या mulbery वर, खूप खूप आनंद होतो पक्ष्यांची शाळा बघून. या झाडाचे इंग्रजी नाव mulberry, तर मराठीत तुती/तुतु, शहतूत,मोरस,अशी बरीच नाव आहेत ह्याला. सामान्यपणे जंगलात,आणि शेती पण केली जाते याची.भारतात रेशीम किड्यांची खाद्य म्हणून याच्या पानांचा उपयोग केला जातो. तुतींच...

'कुतूहल'मोगऱ्याच्या सुगंधी फुलांचे....

Image
      "मोगरा फुलला ,मोगरा फुलला| फुले वेचिता बहरु कळीयासी आला||" असा सूर कानी पडताच कुणाच्याही नकळत वाऱ्याच्या मंद झुळकेने उमलणारी  मोगऱ्याची कळीच  आठवते. सौन्दर्याचीही एक परिभाषा असते. तसेच सुगंधाचीही. मोगऱ्याचा हा सुगंध  देखील मादक पासून ते मनाला शांती देणारा, पावित्र्यदायक अशा अनेक छटा घेवून येतो. जाई, जुई, मधुमालती,चाफा, बकुळी, शेवंती आणि पारिजातक या भारतीय सुगंधी फुलांच्या मांदियाळी मध्ये मोगरा मात्र आपला पहिला नंबर ठेवून आहे. खरोखरच पहिलाच नंबर मिळवला या मोगऱ्याने  म्हणूनच तो देवाच्या चरणी सुगंधी फुल म्हणून तर एखाद्या नायकिणीच्या केसातला गजरा म्हणून देखील जाऊन बसला. एवढ्यावरच थांबला नाही तर लग्नसारख्या मंगलप्रसंगी प्रत्येक सुवासिनीच्या केसातील स्थान अबाधित ठेवून बसला. मोगऱ्याच्या खूप प्रजाती आहेत, बट मोगरा, सिंगल, डबल, मोतीया, गुडूमलाई, मदनबाण.हजारी मोगरा तर यावर्षी माझ्या एका मैत्रिणीने वाढदिवसाला दिला होता. ,त्यातील मदनबाण हा मोगरा मला मझ्या घरीच womens day ला gift मिळाला मदनबाण म्हणजे मोगऱ्याच्या कुळातील राजा असे म्हणाय...