Posts

Showing posts from July, 2022

'कुतूहल' पाऊस पडण्याचे..........🌧️⛈️🌨️🌧️💧

Image
     ये रे ये रे पावसा....... हे गाणे लहानपणी सर्वांनीच म्हंटले असेल. आणि पावसात भिजण्याचा आनंद सुद्धा घेतला असेल.अगदी हक्काने आपण पावसाला बोलावतो, तेही त्याला पैसा देण्याचे आमिष दाखवून.सर्वांनाच हवाहवासा असणारा हा पाऊस पडतो तरी कसा?माझा शाश्वत लहान असताना पाऊस पडला की विचारायचा  आकाशाला खूप मोठा शॉवर कसा काय बसवत असतील?मग तो नेहमी करता का नाही बसवत?पाऊस कसा पडत असेल?असे विचारायचा शाश्वत सारखे प्रश्न बहुतेक मुलांना पडत असतील.      उन्हाळा सहन केल्यानंतर पृथ्वी ओलाव्यासाठी आसुसलेली असते. त्याचीच परिणीती म्हणून पाऊस सुरू होतो आणि सर्व निसर्ग आणि सजीव सृष्टी सुखावते.पाऊस सुरू झाला की सर्वत्र विशिष्ट प्रकारचे चैतन्य पसरते. त्या चैतन्याने सर्व सजीवसृष्टी न्हाऊन निघते.पाऊस पडणे ही एक नैसर्गिक  हवामानविषयक घटना आहे.धरतीवर असलेल्या एकूण  पाण्याचं सतत  अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ ...