'कुतूहल'अचानक येणाऱ्या जांभई चे.......
दररोज आपण स्वतः किंवा इतरांना एकदा तरी जांभई देताना बघतो. जांभई देताना वेडेवाकडे तोंड करून ,विशिष्ट प्रकारचा आवाज देखील काढला जातो. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना!मग जाणून घेऊया कुतूहल जांभई येण्याचे. एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय. जांभई दिल्याने मेंदू toxin free होतो. ऑक्सिजन चा पुरवठा वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढला असल्यास नियंत्रित होण्यास मदत होते. परिणामी तणाव कमी होतो. जांभई कशी असते ते आपल्या सर्वानांच माहिती आहे. संपूर्ण जबडा उघडून आपण जोरात श्वास बाहेर सोडतो. बऱ्याचदा जांभई दिल्यानंतर आपण उसासा देखील सोडतो. जांभई देताना आपल्या जबड्यांच्या होणाऱ्या वेगवान हाल...