Posts

Showing posts from November, 2021

'कुतूहल'करंजीला मुरड घालण्याचे......

Image
लहानपणी सणासुदीलाच नाही तर इतर ही कधी आई करंजी  बनवताना विशेष करून मुरड घालून केलेली करंजी बनवताना खूप कुतूहल वाटायचे, करंजीला मुरड घालण्याचे.सुटीचा दिवशी किंवा रात्री ड्युटी वरून आल्यावर, बनवायची.हातात अभ्यास, पुस्तक घेवून आईचा पदार्थ होईपर्यंत बसायचे स्वयंपाकघरात. आई म्हणायची करंजीला मुरड घालता आली म्हणजे त्यातील गोडवा कायम राहतो,करंजितला ओलावा निघून जात नाही, नात्यांचेही तसेच आहे.तेव्हा त्या वाक्याचा अर्थ नव्हता कळला, पण मुरड घालणं तेवढे जमले. आईला आजीने शिकवली होती, करंजीला मुरड घालणे, आणि आईने मला. आता आई नाही पण आता कुठे आईच्या बोलण्याचा अर्थ कळतोय, आणि नात्यांना, स्वतःला आणि करंजीला पण छान मुरड घालता येते. करंजी हा महाराष्ट्रीयन फराळातील एक मुख्य पदार्थ आहे. सणासुदीला , लग्नकार्यात करंजीचा फराळ घरोघरी बनवला जातो. गौरीगणपतीच्या नैवेद्यामध्ये आणि दिवाळीच्या फराळात करंजी बनवली जातेच.  मुळात करंजी मोठ्या आकाराची असल्यामुळे या पदार्थामुळे फराळाच्या ताटाला चांगली शोभा येते. शिवाय चवीला खुशखुशीत असल्यामुळे अनेकांच्या आवडीची असते. करंजी दिसायला आणि खायला कितीही...