'कुतूहल' झाडांना पाणी देण्याचे.....🌱💦
बऱ्याच वेळी ,बऱ्याच लोकांना हा प्रश्न निर्माण होत असतो की झाडाला पाणी नेमकं केव्हा द्यावं.माझ्या शेजारच्या मावशी तर झाडाखाली थोडं जरी कोरड दिसलं की लगेच ,झाड सुकेल म्हणून लगेचच पाणी घालतात ,विशेकरून तुळशीच्या झाडाला, अगदी उन्हात सुद्धा. पाण्याला समानार्थी शब्द आहे ‘जीवन’. आपल्यासारखेच झाडांसाठीही पाणी म्हणजे जीवनच आहे. मात्र कुंडीतील झाडांना पाणी जास्त झाल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडलेले बऱ्याचदा पाहायला मिळते.. पाणी घालताना प्रथम झाडावर चहूबाजूने थोडंसं पाणी घालावं म्हणजे झाड धुतलं जातं आणि पानं स्वच्छ होतात. त्यामुळे आपली झाडं साहजिकच ताजीतवानी दिसतात. नंतर झाडाच्या बुंध्याशी चहूबाजूने थोडं पाणी घालावं. पाणी घालताना पाण्याच्या धारेखाली हात धरावा. तांब्याने फार वरून पाणी ओतू नये. त्यामुळे मातीत खड्डा पडून माती आजूबाजूला उडते आणि अस्वच्छता होते. पाणी कुंडीच्या खाली असलेल्या भोकातून थोडंसं बाहेर यायला लागेल इतपतच घालावं. कुंडीच्या आकाराप्रमाणे पाण्याचं प्रमाण बदलेल. उगाच जास्त पाणी घालून पाणी फुकट घालवू नये, तसेच आजूबाजूची जागापण खराब करू नये. सर्वसाधारणपणे कुंडीती...