'कुतूहल'दुधाच्या पांढऱ्या रंगाचे...
दुधाचा रंग पांढरा च का?
लहानपणी सारखं कुतूहल वाटायचं सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग एकसारख्याच का?

लहानपणी जेव्हा जेव्हा जबरदस्तीने दूध प्यावे लागत होते तेव्हा वाटायचे दूध वेगवेगळ्या रंगात मिळाले असते तर किती छान झाले असते, वेगवेगळ्या रंगाची वेगळी चव असती,असे सारखे वाटायचे.
घरातील थोरामोठ्यांना हा प्रश्न विचारला की सांगायचे सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढरा च असतो, मुकाट्याने पिऊन घ्यायचे.
आहे की नाही 'कुतूहल'.
माझ्यासारखे तुम्हाला पण कुतूहल वाटत असेल न?
आपण कधी विचार केलाय का की,आपण जे दूध पितो जे की म्हशींपासून, गायींपासून मिळते ते पांढऱ्या रंगाचेच का असते ?
आज याचे उत्तर शोधू या चला.
दूध हे बहुतांश पाण्यापासून बनलेले असते.
दुधात87℅पाणी असते व इतर13%मध्ये चे जर वर्गीकरण करायचे झाले तर त्यामध्ये-
5%लॅक्टोज ,साधारणपणे4%चरबीयुक्त घटक व उर्वरित 4%प्रथिने असतात.
4%प्रथिनांमध्ये कॅल्शियम व कॅसिन नावाचे घटक उपलब्ध असतात.
कॅल्शियम व कॅसिन चा दूध पांढरे असण्याशीकाय संबंध?
संबंध आहे आणि तो ही खूप जवळचा आहे.
कॅल्शियम आणि कॅसिन मध्ये जे रंगद्रव्य(pigments)उपलब्ध असतात ते कोणत्याही प्रकारच्या रंगातून निघणाऱ्या तरंगलांबी शोषून घेते नाही.
जेव्हा एखादे रंगद्रव्य सर्व च्या सर्व रंगाच्या तरंगलांबी बाहेर टाकते(परावर्तित करते)त्यावेळी त्या वस्तूचा किंवा पदार्थाचा रंग आपल्या डोळ्यास पांढरा दिसू लागतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे पाणी पारदर्शी असल्यामुळे दुधाचा रंग ठरवताना जी क्रिया कॅल्शियम व कॅसिन घडवून आणतात त्यावर सर्वस्वी दुधाचा रंग अवलंबून असतो.
दुधामध्ये चरबी देखील अधिक प्रमाणात असते.जी सफेद रंगाची असते.आणि दुधामध्ये जितक्या जास्त प्रमाणात चरबी आणि चिकनाई राहत असते तेवढेच ते दुध अधिक सफेद तसेच पांढरे शुभ्र राहत असते.
याचमुळे म्हशीचे दुध हे गायीच्या दुधापेक्षा अधिक सफेद राहत असते कारण म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा चरबी अधिक प्रमाणात असते.
कॅल्शियम व कॅसिन सर्व तरंगलांबी परावर्तित करत असल्यामुळे दुधाचा रंग पांढरा दिसतो.
आहे की नाही 'कुतूहल
#दूध
#दुधाचा रंग
#white milk

@उज्वला तायडे, अकोट
Comments
Post a Comment