'कुतूहल ' corona virus चे ..........
काल ,पर्वापासून news channel वर एकच बातमी वारंवार दिसते आहे मंदिर, मस्जिद, चर्च,.... इतर धार्मिक स्थळे उघडण्यात येणार. शाळा, कॉलेज,NEET, JEE ,अंतीम वर्ष परीक्षा या, या तारखेला सुरू होणार......
अचानक 5 महिन्यांपूर्वीच चित्र डोळ्यांसमोरून झरझर येऊ लागले. दहावीचा paper रद्द करण्यात आला. science&technology paper चे गठ्ठे अक्षरशः मी कडक उन्हात वाळवून नंतर त्यावर sanitizer spray करून घाबरत valuation करून तोंडाला मास्क लावून moderatorchya हवाले केले होते.... सगळेच काही नवीन होते sanitizer फक्त अधूनमधून वापरले जात होते पूर्वी, तेव्हापासून ते एक essential म्हणून आजही कायम सोबत आहे, मास्क वापरणे नविन होते तेव्हा ,वारंवार हात धुणे आता मात्र सगळ्या सवयी अंगवळणी पडल्यात.
मार्च महिन्यात अचानक मंदिर, मस्जिद, चर्च ,शाळा, कॉलेज, कारखाने सर्वच पटापट बंद करावी लागली.....
सगळीकडे फक्त एकच नाव CORONA, COVID-19
सर्वांना ह्या नविन corona चे 'कुतूहल'वाटू लागले, आणि ते साहजिकच होते.
विज्ञानाची किती गरज आहे हे आज corona साठी लस निर्मितीसाठी ,आणि ती तयार झाली तरी ती सर्वसामान्यांना मिळण्यासाठी सगळं जग आशेने बघत आहे ,ह्यावरुन स्पष्ट होते. म्हणूनच सर्वच देशबांधवांना विनंती करावीशी वाटते, एकच धर्म आहे आणि तो आहे माणुसकी/मानवता.🙏विज्ञानवादी व्हा व जगणं सुसह्य बनवा.
WHO जागतिक आरोग्य संस्थेने corona virusला pandemic म्हणून घोषित केले. खरंतर 10 वर्षांपुर्वी म्हणजे2009 साली जेव्हा स्वाईन फ्लू पसरला होता तेव्हाही pandemic म्हणून घोषित केले होते, परंतु त्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली होती. साहजिकच त्यावेळी internet conection नसल्याने आपली बरीचशी पब्लिक social media पासून दूर होती. आज मात्र चर्चा होत आहे,digital तंत्रज्ञान असल्यामुळे. pandemic म्हणजे हा आजार जलदगतीने पसरणारा आहे.
तिकडे हॉस्पिटलमध्ये corona worriers 6ते8 तास PPE किट घालून ,त्या ईश्वर, अल्ला, गॉड, देवाच्या रुपात कॉरोनाशी लढा देत आहेत तुमच्या ,माझ्यासाठीच.त्यांच्यामध्येच आपलं जे काय असेल ते दैवत शोधायचे आहे.🙏.
'विज्ञानवादी व्हा, "
आज मला राष्ट्रसंतांच्या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली. फार पूर्वी त्यांनी ग्रामगीतेतून लिहिलेल्या काही ओळी ........….आजच्या corona काळात perfect ..
कशास काही नियम नूरला |
कोण रोगी कोठे थुंकला?
कोठे जेवला, संसर्गी आला|गोंधळ झाला सर्वत्र||
त्याने रोगप्रसार झाला
लागट रोग वाढतच गेला|
बळी घेतले हजारो लोकांना|वाढोणी साथ||
गाव असो अथवा शहर|
तेथील बिघडले आचारविचार|
म्हणोनि रोगराईने बेजार|
जाहले सारे जनलोक||
व्यक्ती व्हाया आदर्श सम्यक |पाहिजे दिनचर्या सात्विक|
सारे जीवन निरोगी ,सुरेख|तरीच होईल गावाचे||
आपल्या ग्रामगीतेतून समाजजीवनाचे यथार्थ चित्रण केले होते. खरंच आज अश्या मौलिक विचारांची जगाला जास्त गरज आहे.स्वच्छ भारत चा सुंदर विचार त्यांनी तेव्हाच मांडला होता सर्वांसमोर.
संत गाडगेबाबा नी सुद्धा आपल्या भजन, कीर्तनातून, समाजप्रबोधन करून सर्व जनतेला कृतीतून स्वछता चे धडे दिले.2000-01 पासून आपण 'संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान' बघतोय.यावर्षी तर प्रत्येक घराघरात स्वच्छता अभियान सुरू आहे .
फार वर्षांपूर्वी एक जहाज बुडाले होते ज्याचं नाव होतं 'Titanic'.त्यावर नंतर एक त्याच नावाची movie पण काढण्यात आली होती, अजूनही आठवते कॉलेज ला असताना सर्व hostel girls मिळून सोबत बघितलेला first day show... unforgatable.असो,
ते जहाज बुडण्याचे कारण होते casual approach म्हणजेच कुठलिही गोष्ट सहजपणे घेणे .असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा हवामान खात्याने त्या कंपनीच्या managementला iceberg समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती तरी देखील ते जहाज 2000 प्रवाश्यांना घेवून समुद्रात निघालं होतं. त्या जहाजात आपत्कालीन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या कारण काय तर त्याची गरजच नाही. Titanic जहाज कधी बुडणारच नाही.
त्या जहाजाच्या कॅप्टन ला विचारले असता 25 वर्षांचा अनुभव असूनही कुठलाही iceberg त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही असं कॅप्टन च म्हणणं होतं.
नंतर 2000 प्रवाशांना घेवून निघालेलं Titanic एका छोट्याशा icebergला धडकून नेस्तनाबूत झालं. विशेष म्हणजे त्या प्रवासी जहाजात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकं होते.first, second, third, उच्च वर्णीय ,सगळेच. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सगळेच एकमेकात मिसळले होते. माणूस म्हणून सगळेच एकमेकांना वाचवायचा प्रयत्न करत होते. कुणी businessman, कुणी सफाई कामगार, कुणी वेटर, कुणी celebrity, कुणी पोलिटिकल सगळेच्या सगळेच बुडून समाधिस्त झाले. कुठल्याच वर्गाचं कुणीच वाचलं नाही. त्याचं एकमेव कारण होतं casual approach.
आताची परिस्थिती आणि corona च्या बाबतीत देखील आपलं हेच चालू आहे.आपण कुठल्याही जाती धर्माचे असा, कुठल्याही profession चे असा ,कुठल्याही political party चे ,असा corona आणि त्याचा संसर्ग याबाबतीत चा casual approach सगळ्यांना बुडवायला पुरेसा आहे. त्यामुळे परिस्थिती चे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. येणारे पुढचे काही दिवस खूप महत्वाचे असणार आहेत..corona नावाच्या संकटाला संयमाने सामोरे जाणे यातच प्रगल्भता आहे.
"कबीरा कहे हें जग अंधा
अंधी जैसी गाय
बछडा था सो मर गया
झुठी चाम चटाय"
संत कबीर म्हणतात हे जग पण त्या आंधळ्या गाईसारखे आहे .
माणसाने कितीही शोध लावले तरी त्याला निसर्गावर विजय मिळवणे शक्य नाही ,असे एक प्रतिपादन असते .वैज्ञानिक दृष्टीकोनाची धारणा अशी आहे की निसर्गामागचे नियम समजून घ्यावेत व त्या आधारे आपले जीवन सुखकर बनवावे.
आजपर्यंत मानवजातीला असलेले अनेक रोग मानवाने हद्दपार केले.
संपुर्ण जग हादरवून टाकणाऱ्या ,जगभरात थैमान घालणाऱ्या corona virus चा बिमोड करण्यासाठी लस तयार करण्यात आली, आता फक्त थोडा संयम राखून लस येईपर्यंत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे मानवाने प्रयोगशाळेत लस तयार करण्यात यश मिळवले. जय विज्ञान🙏.
सर्वच virus वर आतापर्यंत लस तयार होवून ते आजार बरे/नष्ट सुध्दा झालेत. उदा.
🔰आजार व विषाणू🔰
▪️गोवर (मिझल): गोवर विषाणू
▪️इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C)
▪️कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G)
▪️पोलिओ : पोलिओ विषाणू
▪️जापनीज मेंदूज्वर : Arbo-virus
▪️रेबिज : लासा व्हायरस
▪️डेंग्यू : Arbo-virus
▪️चिकुनगुन्या : Arbo-virus
▪️अतिसार : Rata virus
▪️एड्स : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)
▪️देवी : Variola Virus
▪️कांजण्या : Varicella zoaster
▪️सर्दी : सर्दीचे विषाणू
▪️ गालफुगी : Paramixo virus
▪️जर्मन गोवर : Toza virus
आता हा सुद्धा corona- corona /COVID virus-19
असे म्हणतात प्रत्येक गोष्टीला advantages, disadvantages असतात,
Lockdown काळात आपण सर्वांनी आपापल्या कुटुंबाला कधी न दिलेला अमूल्य असा वेळ दिला, कुटुंबामध्ये संवाद, सुसंवाद साधला, प्रत्येक व्यक्तीचे सुप्त गुण बाहेर पडले, स्वछतेच्या चांगल्या सवयी लागल्या, निसर्गाला सुद्धा काही महिने, काही दिवस pollution free जगता आलं, कल्पना करा मानसी एक वाहन पकडले तर दर दिवशी वाहनांमधून होणारे प्रदूषण किती असेल, कारखाने, उद्योगधंदे सर्वच बंद ,निसर्गाने सुद्धा एक उसासा टाकला असावा.......
लस आपल्या पर्यंत येणारच आहे.
तोपर्यंत सर्वांनाच corona fighter व्हायचे आहे.
सोशल distance mentain करून ,corona सोबत लढायचे आहे, आपापसात नाही, .🙏
😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷
#corona
#कुतूहल corona चे
#covid-19
संदर्भ-माहिती इंटरनेट,चित्र इंटरनेट
@उज्वला तायडे ,अकोट
खूप छान सांगड घातली corona आणि टायटॅनिकची.. खूप छान लिहिलं...
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete