'कुतूहल' संपात दिनाचे/Equinox day चे....🌍🌐🌞

          
            काल सहजच blog लिहीत असताना माझा मुलगा मला विचारत होता, आता कशाबद्दल लिहिते आहेस, त्याला सांगितले अरे उद्या 'संपात दिन 'आहे न त्यावरच लिहीत आहे.त्यावर त्याचे उत्तर आता हे काय नविन संपात दिन आणि हसायला लागला 😀teenagers मुलं अशीच करतात.Equinox day सांगितले तर मात्र त्याला लगेच  कळले....
मग काय जाणून घेऊया 'कुतूहल'संपात दिनाचे...
आपली पृथ्वी सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेला उगवताना दिसतो.🌄🌅
संपात दिन म्हणजे दिवस व रात्र समान.
22 सप्टेंबर ते22डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो यालाच 'दक्षिणायन' म्हणतात.21मार्च ते21जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो यालाच 'उत्तरायण'म्हणतात.
      23 सप्टेंबर ते21मार्च या कालावधीत सौर ऊर्जा बऱ्याच कमी प्रमाणात मिळत असल्याने उत्तर गोलार्धात हिवाळा असतो.दक्षिण गोलार्धात अगदी उलट परिस्थिती असते.21 मार्च ते23सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धातील प्रदेशात सूर्यप्रकाश अधिक काळ मिळतो व सूर्यकिरण 23सप्टेंबर ते21मार्च या वर्षार्धातील कोनांपेक्षा अधिक उच्च कोन करून पडत असतात म्हणून या प्रदेशात सौर ऊर्जा अधिक प्रमाणात मिळत असते त्यामुळे तिथे उन्हाळा असतो.
विषुववृत्तावर कोणत्याही दिवसाचे तापमान जवळजवळ सारखेच असते व सुर्यकिरणही  उच्च कोन करून  किंवा लंब  पडत असतात तेथे सौरऊर्जेचा पुरवठा वर्षभर होत असतो .त्यामुळे तेथे उन्हाळा व हिवाळा असे ऋतु प्रत्ययास येत नाही.
पृथ्वीच्या पृष्ठभागास व वातावरनास सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेत फेरफार होत असल्यामुळे ऋतू निर्माण होतात.जागतिक दृष्टया हिवाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतू मानतात.
पृथ्वीचा प्रकाशित भाग अप्रकाशित भागापासून वेगळे करणारे वर्तुळ म्हणजे प्रकाशवृत्त.प्रकाशवृत्तामुळे विषुववृत्ताचे दोन जवळजवळ सारखे भाग होत असल्याने विषुववृत्तावर दिवसाची व रात्रीची लांबी वर्षभर जवळजवळ सारखीच असते.परंतु विषुववृत्तापासून जो जो ध्रुवाकडे जावे तो तो कोणत्याही ठिकाणच्या अक्षवृत्ताचे प्रकाशवृत्ताने होणारे दोन भाग असमान होत असल्याने दिनमान व रात्रीमान यांच्यातील काल विषमता वाढत जाते.21 जून रोजी कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंब पडत असतात व तेथील दिनमान साडेतेरा तास असते .उलट22डिसेंबर रोजी कर्कवृत्तावर सूर्यकिरण सुर्याच्या43°कोन करून पडतात व दिनमान साडेदहा तासांचे असते .21 जूनला उत्तर ध्रुववृत्तावर दिनमान24तासांचे असते व सूर्यकिरण सुर्याच्या47°अंशाचा कोन करून पडतात🌄.
पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेशी विवक्षित कोन करून सातत्याने राहत असल्याने व पृथ्वीच्या सूर्या भोवतीचा परिभ्रमण काल नियमित असल्याने फेरफार नियमितपणे होत असतात .म्हणून ऋतुही नियमित येत असतात.
              🌎पृथ्वी स्वतःभोवती फिरताना, सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना तिचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी लंब नसून सूर्य 66.5°अंशाचा कोन करतो.
अक्ष विचलन विचारात घेतले नाही तर कक्षेतील कोणत्याही स्थानी पृथ्वी असो ,तिच्या अक्षाची दिशा अ चर व एका विशिष्ट दिशेस समांतर राहत असते.पृथ्वीच्या अशा गतीमुळे पृथ्वीवर कोणत्याही एकाच स्थानी लागोपाठच्या कोणत्याही दोन दिवशी मध्यान्हचे सूर्यकिरण अगदी तोच कोन करून पडत नाहीत व पृथ्वीच्या पृष्ठावरील बहुतेक सर्व ठिकाणी संपात दिनांखेरीज (दिवस व रात्र समान कालावधी चे असलेल्या दिवसांखेरीज )इतर दिवशी दिनमान व रात्र मान सारखेच असत नाहीत.येथे सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळेवर ,सुर्यबिंबाचा विस्तार व प्रकाशाचे वक्रीभवन यांचा परिणाम लक्षात घेतला नाही.
              पूर्वी ऋतू या शब्दाचा अर्थ सूर्याला दोन संक्रांती भोगण्याला लागणारा कालावधी असा करीत.
त्यामुळे12राशीत6ऋतू होवून ऋतुचक्र पूर्ण होई.
21 मार्च हा वसंत संपात दिन म्हणजे 12तास ची रात्र आणि12 तासाचा दिवस .  सूर्य क्रांतिवृत्तावर  दक्षिण गोलार्धामधून उत्तरगोलार्धामध्ये  जाताना विषुववृत्ताला जेव्हा संपात बिंदूमध्ये छेडतो ,त्या घटनेला वसंत संपात म्हणतात, आणि त्या बिंदूला वसंत संपात बिंदू म्हणतात.(march equinox)म्हणजे ह्या दिवशी सूर्य उत्तरायनातून प्रवास करताना संपात बिंदूतून जातो ,ह्या दिवशी 12तासाचा दिवस व12तासाची रात्र असते.
आणि आजचा22 सप्टेंबर म्हणजे 'शरद संपातदिन'Equinox day.यालाच विषुव दिन सुद्धा म्हटल्या जाते.
आहे की नाही कुतूहल संंपात दिनाचे .
🌞🌍🌎🌏🌐🌞🌍🌎🌏🌐🌞🌍🌎🌏🌐
 
             #कुतूहल संपात दिनाचे
         #Equinox day
           #वसंत संपात दिन
        #शरद संपात दिन
           संदर्भ-मराठी विश्वकोश
            चित्रे-google इंटरनेटसौजन्य

               @सौ. उज्वला तायडे
            
           

Comments

  1. संपात दिन या शब्दाचा विसर पडला होता ग
    हो कुतूहल पण होत याच
    खूपच डिटेल लिहिलंस
    तुला असे नवीन विषय सुचतात याच मला जास्त कुतूहल आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....