'कुतूहल' बहुगुणी कडुनिंबाचे ......



    मनाला चैतन्य,आनंद आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय.म्हणतात ना, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते.
लाल भडक गुलमोहर डोळ्यांना सुखावतो,जांभूळ ला ही बहर याच वेळी येतो.पिवळा धमक बहावा सुद्धा या महिन्यात बहरतो.बहावा ची  सोनसळी फुले  झुंबरा सारखी लटकून नेत्रसुख देतात.डेरेदार पळस सुद्धा या महिन्यात बहरतो.आपल्या वासाने मनमोहुन घेणारा मोगरा याच महिन्यात फुलायला लागतो. झाडांना आलेल्या पानगळीनंतर वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. चैत्र महिन्यात बऱ्याच फुलझाडांना मोहर येतो. कितीही झाडे बहरली तरीही कडुनिंबाचे पाने आपलं स्थान गुढी उभारताना राखून ठेवतात.
उन्हाळा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला महिना सुरू होतो तेव्हा हवामानात वेगाने बदल होतात. कडाक्याची थंडी कमी झालेली असते आणि हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली असते. अशावेळी या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला बरेच बदल करावे लागतात. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते. या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत आहाराशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीला कडूनिंबाचा पाला लावला जातो. इतकेच नाही तर हा आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असल्याने आंघोळीच्या पाण्यात घालण्याची आणि त्याची चटणी करण्याचीही पद्धत आहे.
गुढीपाडव्याला सहसा कडुनिंबासह गुळ खाल्ला जातो. अनेकांना कडुनिंबाची कडू चव आवडत नाही त्यामुळे गुळासह कडुनिंब खाण्यास पसंती दर्शवतात. पण कडुनिंब आणि गुळ एकत्र खाण्याचे देखील आरोग्यासाठी फायदे आहे. गुळातील लोहाचे पचन कडुनिंबाच्या पानांमुळे खूप चांगले होते. कडूनिंब हा थंड प्रवृत्तीचा पदार्थ आहे तर गुळ उष्ण प्रवृत्तीचा आहे त्यामुळे संतुलन राखण्यास मदत होते. एकाच वेळी उर्जा आणि अँटी ऑक्सिटंड दोन्ही मिळते.
मला कडुनिंब फुलांचा सुगंध खूपच आवडतो.रस्त्याने दररोज सकाळी  कामाच्या ठिकाणी जाताना येतांना मंद दरवळणारा सुगंध सोबतीला असतो.
कडुलिंबाच्या फुलांना चमेलीसारखाच गोड सुगंध असतो.
इतर फुलांप्रमाणे त्याचा सुंदर फ्लॉवर पॉट घरात बनवला की छान  गंध दरवळतो.
 तमिळमध्ये, कडुलिंबाच्या फुलांना वेपाम्पू म्हणतात, ते वाळलेल्या पावडर आणि ताज्या स्वरूपात वापरल्या जातात. दक्षिण भारतात, पचडी, फ्लॉवर भात, मसूर आणि रसम यासारख्या विविध पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. डिशच्या शीर्षस्थानी, ते गार्निश करण्यासाठी शिंपडले जातात.या  कडूनिंबाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.....
कडूनिंब जंतुघ्न असल्याने कोणत्याही त्वचाविकारात कडूनिंबाच्या पाल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी अंगावर घेतल्यास त्वचाविकार दूर होण्यास मदत होते. बरेचदा थंडीने किंवा जास्त उष्णतेने त्वचा कोरडी पडते. अशावेळी कडूनिंबाच्या तेलाचा त्वचेवर वापर केल्यास निश्चितच फायदा होतो. 
कडूनिंबाची चव अतिशय कडू असते. बदलत्या हवामानात सर्दी-कफाचे विकार वाढतात. आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये  कडूनिंबाचा वापर केला जातो. तसेच कडूनिंब शीत प्रकृतीचा असल्याने उष्णतेच्या विकारांसाठीही कडूनिंब पोटात घेणे फायदेशीर ठरते. यामुळे उष्णतेचे विकार नियंत्रणात येण्यास मदत होते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील ही साखर नियंत्रणात राहावी यासाठी कडूनिंब अतिशय फायदेशीर असतो. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रक्ताशी निगडीत समस्या असल्यास कडुलिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. कडूनिंब हा रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने रक्तशुद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. पोटातून काढा दिल्यास त्याचा फायदा होतो. 
महिलांमध्ये केस गळणे, केसांत कोंडा होणे, उवा किंवा लिखा होणे अशा समस्या वारंवार उद्भवताना दिसतात. अशावेळी कडूनिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास या समस्या दूर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांच्या समस्यांसाठीही कडूनिंब उपयुक्त असतो.
गळून पडलेली कडुलिंबाची पाने, जी किंचित  अल्कधर्मी (पीएच 8.2) असतात, ती जमिनीतील आम्लता कमी करण्यासाठी चांगली असतात.
दररोज रिकाम्या पोटी सुमारे 4-5 कडुलिंबाची पाने खाणे सुरक्षित आहे. तथापि, ही प्रथा थोड्या काळासाठी शिफारस केली जाते कारण जास्त डोसचे दीर्घकाळ सेवन केल्याने मूत्रपिंड आणि यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सस्तन प्राणी, पक्षी, मधमाश्या आणि वनस्पती यांच्यासाठी कडुलिंबाचे तेल अक्षरशः बिनविषारी आहे. तेलामध्ये आढळणारा “Azadirachtin” हा घटक सागरी जीवनासाठी माफक प्रमाणात विषारी असू शकतो.
कडुलिंबाचे फायदे जवळजवळ जबरदस्त आहेत. या झाडाचे मुळापासून पानांपर्यंत व्यावहारिक उपयोग असल्याने, कडुलिंबाची झाडे आता जगभरातील उष्ण आणि शुष्क ठिकाणी संशोधन, व्यावहारिक उपयोग आणि कापणीसाठी उगवली जात आहेत.यंत्रसामग्रीसाठी वंगण म्हणूनही त्याचा उपयोग होतो.कडुलिंबाच्या झाडाच्या अष्टपैलुत्वावर विचार केला तर  ही प्रजाती खरोखरच मानवी आरोग्य आणि आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर वृक्षांपैकी एक असू शकते.
गुढीपाढवा हा हिंदूनववर्षातील पहिला दिवस आहे. हा दिवस लोक उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. सकाळी लवकर उठतात. अंघोळ करून घराची सजावट करतात. घरोघरी आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. दारी सुंदर रांगोळी काढतात. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. प्रसाद म्हणून कडुलिंब आणि गुळ दिला जातो. गुढीपाडव्याला सहसा कडुनिंबासह गुळ खाल्ला जातो. अनेकांना कडुनिंबाची कडू चव आवडत नाही त्यामुळे गुळासह कडुनिंब खाण्यास पसंती दर्शवतात. पण कडुनिंब आणि गुळ एकत्र खाण्याचे देखील आरोग्यासाठी फायदे आहे. गुळातील लोहाचे पचन कडुनिंबाच्या पानांमुळे खूप चांगले होते. कडूनिंब हा थंड प्रवृत्तीचा पदार्थ आहे तर गुळ उष्ण प्रवृत्तीचा आहे त्यामुळे संतुलन राखण्यास मदत होते. एकाच वेळी उर्जा आणि अँटी ऑक्सिटंड दोन्ही मिळते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने जेव्हा आपण नवीन वर्षात प्रवेश करतो, नव्या ऋतुमध्ये प्रवेश करतो, ऊबदार तापमानामध्ये प्रवेश करतो तेव्हा घरामध्ये कडुनिंबांचे पानं असणे आवश्यक आहे. कारण कडूनिंबाचे भरपूर उपयोग आहेत.असा हा कडुनिंब अमृतापेक्षा काहीच कमी नाही.कडुनिंब नुसते एक झाड नसून कितीतरी सजीवांना पोसणारी एक परिसंस्थाच आहे.
आहे न कुतूहल बहुगुणी कडुनिंबाचे.
#कडुनिंब 
#कडुलिंब
 संदर्भ--काही माहिती इंटरनेट

 @उज्वला तायडे, अकोट 





Comments

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....