पाऊस थांबला की हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते.हिवाळ्याला सुरुवात झाली की त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात.
हिवाळ्यात त्वचेची विशेषत्वाने काळजी घेणे आवश्यक आहे.हिवाळ्यात अनेक जणांना कोरडी रखरखीत त्वचा,त्वचेला खाज सुटणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.त्वचा कोरडी पडण्यामागे वाढते वय, तीव्र रासायनिक साबण,क्रीम, खूप गरम पाण्याने आंघोळ करणे,स्टीम बाथ सतत घेणे,कपडे भांडी धुताना तीव्र पावडर, साबणाचा वापर,बदलते हवामान, थंड वातावरण ,जास्त पावर च्या औषधें ,अशी अनेक कारणे असू शकतात.यामुळे त्वचा फुटणे, कोरडी पडणे,खाज सुटणे असे त्रास होऊ शकतात.हिवल्यामुळे वातावरणातील कोरडेपणा त्वचेचे नुकसान करू शकतो. यासाठी काही उपाय वेळीच केले तर त्वचेची जास्त हानी, त्रास होणार नाही.
या काळात काही त्वचारोग जास्त त्रासदायक ठरू शकतात. उदा. इसब,आटोपीक डरमाटायटीस ,सोरायसिस, ईचथिओसीस,रोझेशिया इ. या सगळ्या त्वचाविकारांसाठी ,थायरॉईड, मधुमेह,अशक्तपणा, पोषणमूल्याचा अभाव ,यकृताचे आजार,आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज या बाबीही कारणीभूत असू शकतात.त्वचा प्रमाणाबाहेर कोरडी झाली तर त्याची परिणीती त्वचेला भेगा पडणे,त्यातून रक्त येणे,खाज सुटने,आणि जंतुसंसर्ग होणे अशा अजूनच त्रासदायक गोष्टींमध्ये होऊ शकतो.आपण जाणीवपूर्वक काही गोष्टींची काळजी घेतली तर त्वचेचे हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होवू शकतात.
त्वचेसाठी सौम्य साबण, क्रिम वापरावेत .घाम येण्याच्या जागा सोडल्या तर बाकी त्वचेला साबण लावण्याची गरज नसते.आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा,आंघोळीनंतर त्वचा खसखसून पुसण्याऐवजी स्वच्छ मऊ कापडाने पुसून/टिपून घ्यावी.त्वचेत किंचित ओलावा असतानाच त्वचेला उत्तम प्रतीचे moisturiser लावावे.त्याने त्वचेतील आर्द्रता टिकण्यास मदत होते.लोकर त्वचेवर घासली गेल्यास खाज सुटते,म्हणून लोकरीच्या कपड्याच्या आत सुती कापड घालावे.भांडी, धुणी, इतर स्वच्छतेची कामे करताना रबरी हातमोजे घालावे./वापरावे.
आणखी काही घरगुती उपाय म्हणजे.-.....
☘️आंघोळीपूर्वी शरिराला तेल लावणे-आंघोळीच्या दहा मिनिटे अगोदर पूर्ण शरीरावर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावून मालिश करायची.यामुळे त्वचा कोमल आणि सतेज बनते.याला दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑइल किंवा आपल्या आवडीचे कोलनचे काही थेंब टाकून आंघोळ करणे.आंघोळीसाठी पाणी जास्त गरम नसावे.गरम पाणी त्वचेचा नरमपणा
काढून घेते आणि त्वचेला जास्त शुष्क बनवते.कारण गरम पाण्याने स्नान केल्याने त्वचेतील प्राकृतिक तेल नष्ट होते.आणखी महत्वाचे म्हणजे आंघोळीसाठी घेतलेल्या पाण्यात 2,3 टिस्पून मध घातल्यास त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.
☘️भरपूर पाणी पिणे-उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची गरज असल्याने भरपूर प्रमाणात पाणी पिल्या जाते.परंतु हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि कमी पाणी शरीरात घेतले जाते.परंतु हे शरीसाठी घातक ठरते.हिवाळ्यातही हवा कोरडी असल्याने शरिराला अधिक पाण्याची गरज असते.कोरड्या हवामानामुळे शरीरातील पाणी कमी होते.अशा परिस्थितीत शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी आपण जास्तीतजास्त पाणी पिणे महत्वाचे आहे.या दिवसात दर तासाला1ग्लास पाणी पिले पाहिजे.
☘️आहाराची काळजी घेणे-हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात.फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते.परंतु या हंगामात विशेषतः बेरीज(berries)(strawberry,कॅनबेरी(blue berry), ब्लॅकबेरी,ब्लुबेरी)खाणे फायद्याचे ठरते. माझेकडे तर mulberry चे मस्त झाड आहे .berries मध्ये जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात,ज्यामुळे आपली त्वचा निरोगीआणि चमकदार राहण्यास मदत होते.हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर,रस आणि दूध यांचा समावेश करावा.
यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
☘️हात आणि पायांची विशेष काळजी घेणे-हिवाळ्यात हात आणि पायांची आर्द्रता राखणे फार महत्त्वाचे आहे.
पायात ओलावा टिकवण्यासाठी आपण मॉइच्छुरायझर किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकतो.
हातापायावर साय, लिंबू, ग्लिसरीन चा वापर करू शकतो.साबण वापरायचा असला तर तो ग्लिसरीन युक्त, व्हिटॅमिन E युक्त वापरावा.
☘️पुदिन्याचा वापर -पुदिन्याची पाने त्वचेसाठी यक्सफोलियटर म्हणून काम करते.
☘️ऑलिव्ह ऑइल-ऑलिव्ह ऑइल थंडीमध्ये त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मदत करते.आंघोळीच्या अगोदर1तास ऑलिव्ह ऑइल ने मसाज करावी.
ड्राय स्कीन म्हणजेच कोरडी त्वचेसाठी माॅईश्चराईजर हे पोषणाचं काम करतं. त्वचेला आवश्यक ओलावा देण्याचं काम मॉईश्चराईजर करतं. हे फक्त मुलींच्याच नाहीतर मुलांच्या त्वचेसाठीही चांगल आहे. मॉईश्चराईजरमुले तुमची त्वचा निरोगी आणि हायड्रेट राहते. असं म्हटलं जातं की, त्वचेला अंतर्गतरित्या ओलावा पाण्याने मिळतो तर बाहेरील कोरडेपणा दूर करण्याचं काम मॉईश्चराईजर करतं, ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. मॉईश्चराईजर त्वचेत खोलवर जातं. मॉईश्चराईजर आपल्या रोजच्या दिनचर्येत सामील केल्यास तुमच्या चेहऱ्यावर वेळेआधी सुरकुत्या येणार नाहीत. खासकरून ज्या लोकांची त्वचा कोरडी असते त्यांच्यासाठी तर मॉईश्चराईजर वरदान आहेत. तसं तर बाजारात अनेक कोरड्या त्वचेसाठी अनेक मॉईश्चराईजर्स मिळतात पण तुम्ही हवं असल्यास घरगुती पद्धतीने त्वचेला मॉईश्चराईज करू शकता.
1. मध (Honey)

मध हे खूपच चांगल क्लींजर आणि मॉईश्चराईजर आहे. याची विशेष बाब म्हणजे मधाच्या वापराने त्वचा कोमल आणि चमकदार होते. दोन चमचे मधात 8 चमचे गुलाब जल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकु द्या. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धूवून टाका.
2. नारळाचं दूध (Coconut Milk)

कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध दूध त्वचेत खोलवर जाऊन मॉईश्चराईज करून पोषण देतं. कोकोनट मिल्कच्या वापराने अनेक तास तुमची त्वचेतील आर्द्रता कायम राहते. नियमितपणे सकाळा त्वचेला नारळाचं दूध लावल्यास संध्याकाळपर्यंत त्वचेची आर्द्रता कायम राहते.
3ऑलिव तेल (Olive Oil)

ऑलिव्ह ऑईलचा अनेक वर्षांपासून नैसर्गिक मॉईश्चराईजर म्हणून वापर केला जातो. यात असलेलं अँटीऑक्सीडंट आणि नैसर्गिक एसिड उन्हातून उत्सर्जित होणाऱ्या युवी किरणांपासून त्वचेचं रक्षण करतात. याच्या वापरासाठी फक्त ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब आणि लंवेडर एसेंशिअल तेलाचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यात घालावे. या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा मॉईश्चराईज राहते. याशिवाय झोपण्याआधी तुमचा चेहरा धूवूनही तुम्ही ऑलिव्ह ऑईल लावू शकता. असं केल्याने सकाळी उठल्यावर तुमची त्वचा चमकदार दिसते.
4. शिआ बटर (Shea Butter)

जुन्या काळी शिआ बटरचा वापर हा मॉईश्चराईजर म्हणून केला जात असे. शिआ बटर व्हिटॅमीन ए चा चांगला स्त्रोत आहे. हे व्हिटॅमीन कोरड्या त्वचेतील आर्द्रता कायम ठेवतं. तसंच सनबर्न आणि त्वचेसंबंधित इतर समस्या कमी करण्यातही मदत करतं. यात फॅटी अॅसिड्स ही असतात. जे तुमच्या त्वचेला तारुण्यमय ठेवण्यात मदत करतात.
5. केळ (Banana)

केळ हे फक्त शरीरासाठीच चांगलं आहे असं नाहीतर ते तुमच्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. केळ हे चांगल मॉईश्चराईजर आहे. केळ्यामध्ये व्हिटॅमीन सी, ए, पॉटेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्सचे भरपूर गुण असतात. जे तुम्हाला कोरड्या त्वचेपासून मुक्ती तर देतातच पण त्वचेचा अनेक प्रकारे फायदाही करतात.
6. अवकॅडो (Avacado)

सर्वात आधी अवकॅडोचे छोटे छोटे तुकडे करून त्यातील गुठळ्या काढून टाका. आता तो गर मिक्सरमध्ये चांगला वाटून घ्या. नंतर या मिश्रणात एक चमचा मध, एक चमचा लिंबूचा रस आणि अर्धा कप दही घाला. मग चांगल मिक्स करून घ्या. साधारण अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा आणि मग चेहऱ्याला लावा. अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धूवून टाका. चेहरा धुतल्यावर तुम्हाला मिळेल जास्त मऊ आणि मुलायम स्कीन जी कधीच कोरडी वाटणार नाही.
7. कोरफड (Aloevera)

कोरफड हे एक नैसर्गिक मॉईश्चराईजर आहे, जे त्वचेतील आर्द्रता कायम ठेवण्यास मदत करतं. कोरफड हे डेड स्कीन सेल्सना मुलायम करून त्वचा खूपच मऊ बनवण्यात सहायक ठरतं. कोरफडातील अँटी ऑक्सीडंट गुण त्वचेला कोरडं होण्यापासून वाचवतात आणि त्वचेची नैसर्गिक चमकही कायम ठेवतात.
8. ग्लिसरीन (Glycerin)

ग्लिसरीन त्वचेची आर्द्रता कायम ठेवतं. तुम्हाला फक्त 3 चमचे ग्लिसरीनमध्ये 1 छोटा चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावायचा आहे. यामुळे त्वचा हायड्रेट होईल.चला तर मग हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून संरक्षण करण्यासाठी करूयात हे घरगुती उपाय.👍.
# कुतूहल हिवाळ्यातील कोरड्या त्वचेचे
# कोरडी त्वचा
# त्वचा रोग
संदर्भ-इंटरनेट, मराठी विश्वकोश
चित्र-google इंटरनेट
माहिती-संकलित
@सौ. उज्वला तायडे, अकोट
फारच उपयुक्त माहिती
ReplyDeleteउपयुक्त माहिती 👌😊
ReplyDeleteVery useful information dear
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDelete