'कुतूहल'दिवाळीतील फटाक्यांचेआणि नैसर्गिक अतिषबाजीचे.....

                   
 काही दिवसांपासून सगळी कडचे वातावरण बदलले आहे,सर्व काही आता झगमगीत झाले आहे.बाजारामध्ये लोकांची नवीन कपडे घेण्यासाठी रेलचेल सुरू आहे.कारण आता दिवाळी आली आहे.'दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी ',असे म्हणून आपण दिवाळीचे स्वागत करत असतो.दिवाळी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच जवळचा आहे.एकमेकांना भेटून शुभेच्छा देने, एकमेकांकडे फराळाला जाणे,नवीन कपडे घेणे हे सर्व दिवाळीमध्ये केले जाते.दिवाळीच्या या4,5 दिवसांत सर्वच आनंदी असतात.
या दिवाळीत आणखी एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे फटाके वाजवण्याचा उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे.ही बंदी योग्य आहे कारण फटाके फोडण्याने फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसान च होणार आहे.फटाके फोडताना लहान मुलांचे अपघात होतात,शिवाय प्रदूषण, अंधत्व.
दिवाळीचा आणि फटाक्यांचा तसे पाहिले तर काही संबंध नाही.फटाके फक्त दिवाळीच्या दिवसातच फोडले जात नाहीत तर ते आनंदाच्या प्रसंगी सुद्धा फोडले जातात,आनंद दर्शवण्यासाठी.
पण असे केल्याने दुसर्याना किती त्रास होतो,याचा आपण कधीही विचार करत नाही.
दिवाळी हा खर तर दीपोत्सव यात फटाके कुठून घुसले कुणास ठाऊक?पूर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोल सारखी वाद्य वाजवली जायची, असे ऐकिवात आहे.कदाचित त्यामुळे ही फटाक्यांचे आवाज करण्याची प्रथा रूढ झाली असावी.
फटाके बनवण्यासाठी कोळसे, गंधक, बंदुकीच्या दारूचे मिश्रण भरून उपयोग केला जातो.
पारंपरिक फटाक्यांमध्ये बेरीअम नायट्रेट आणि अल्युमिनियम वापरले जाते.
दिवाळी म्हणजे फटाके आणि आवाज हे एक समीकरण च झाले आहे.मोठमोठया फटाक्यांच्या माळा,सुतळी बॉम्ब फोडणे,म्हणजे अनेक सण उत्सवांचे,आनंद व्यक्त करण्याचे ,जल्लोष करण्याचा स्टेट्स सिम्बॉल च झाले आहे.तेव्हाचे फटाके आणि आताचे फटाके यात थोडा बदल झाला असेल .पण त्यात सुधारणा करून अधिक रंगीत, कमी धुराचे,रंगीत आकर्षक, प्रदूषण मुक्त फटाके तयार होत असतील तरीही फटाके फोडल्यानंतर फटाक्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेतून विषारी धूर आणि कानठळ्या बसण्याइतका आवाज बाहेर पडतोच ना, हे लक्षात घेतले पाहिजे.
या फटाके फोडण्याने वायू, ध्वनी प्रदूषनाणे बऱ्याच समस्या होत आहेत.फटाक्याच्या आवाजाने पक्षी घाबरतात, सैरावैरा पळत सुटतात त्यात त्यांना अपघात होण्याची शक्यता असते.तसेच घाबरणे ,हृदयाची धडधड वाढून पक्षाघात होण्याची शक्यता बळावते.त्यांच्या शरीरांतर्गत बरेच बदल होवून त्यांची जननक्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते,याने पक्षाची जात नष्ट होण्याच्या पातळीवर येवू शकते.
प्रकाश फेकणाऱ्या फटाक्यांमुळे कीटकांच्या ,पक्ष्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो. 
रॉकेट्स मुळे आणि वर जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांचा अधिवास म्हणजे त्यांची घरटी जळतात.पक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा अधिक असते या आवाजामुळे पक्ष्यांच्या कानांच्या नसा तुटण्याची शक्यता असते.फटाक्यांचा सर्वाधिक परिणाम चिमनि या पक्ष्यांवर जास्त होतो. तसेही आता आपण5ते12नोव्हेंबर पक्षी सप्ताह महाराष्ट्र मध्ये साजरा करतोय. मी तर दररोज अंगणात पक्ष्यांच्या रंगोळीतूनच  save bird चा message देते.
फाटाक्यांच्या आवाजाने लहानमुळे झोपेत दचकतात,त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मनुष्याला शारीरिक आणि मानसिक विकार होण्याची शक्यता असते.त्यांच्या आवाजामुळे घर, इमारत, रस्ते, पूल अश्या निर्जीव वस्तू देखील हादरून जातात.
बहिरेपणा देखील येवू शकतो.सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला तर फार चांगले होते.
तसेही आता यावर्षी corona, covid -19मुळे corona रुग्णांना  फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा आणखी जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो.
फटाक्यांवर लाखों रुपये खर्च कमी करून इतर आवश्यक कामांसाठी त्याचा वापर करता येवू शकतो.
काहिंना तर फटाक्यांशिवाय दिवाळी ही कल्पनाच करवत नाही.कारण दिवाळी आणि फटाके यांची संलग्नता मेंदूमध्ये ठामपणे कोरलेली आहे.आणि पिढ्यानपिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.
अशा प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांपासून मुक्त अशी दिवाळी साजरी करता येणार नाही का?नक्कीच करता येईल, कारण आता सुजाण ,सुसंस्कृत पालक आपल्या पाल्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करू लागले आहेत. आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
     
         
              रामन विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहिती नुसार यावर्षी नोव्हेंबरमध्ये आकाशात उल्कावर्षाव  ,उल्कापाताचा  घटनाक्रम र्होणार आहे.अवकाश प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे."एकने"या धूमकेतू च्या धुळीमुळे हा उल्कावर्षाव होतो.नागपूर आणि जवळपासच्या आकाशात 16ते30नोव्हेंबरमध्ये उल्कावर्षाव सोहळा रंगणार आहे.पूर्वांचलात हा उल्कावर्षाव अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येणार असला तरी नागपुरातही अवकाश प्रेमींचा हिरमोड होणार नाही.
🌠उल्का म्हणजे काय तर नैसर्गिक आतिषबाजी.
अवकाश प्रेमींच्या भाषेत उल्कावर्षावाला नैसर्गिक आतिषबाजी म्हटले जाते.या आतिषबाजीचा पर्यावरणाला फटका बसत नसल्याने त्याला 'नैसर्गिक   आतिषबाजी'असे म्हटले जाते.
पृथ्वीच्या आसपास असलेला किंवा पृथ्वीच्या बाजूने जाणारा धूमकेतू पृथ्वीच्या वातावरणात आल्यास आल्यास उल्कापात होतो.एखाद्या वेळेस, उत्तम उल्कापात होतो तर एखाद्या वेळेस फारच कमी होतो.
हा उल्कावर्षाव मुळात या धूमकेतूचेच अवशेष असतात.
परंतु पृथ्वीच्या वातावरणाशी या अवशेषांचे घर्षण झाल्याने उष्णता निर्माण होते ही उष्णता आपल्याला उल्कावर्षावाच्या  रुपात दिसून येते. 
न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्यच आहे,चला तर मग फटाके फोडण्याऐवजी आपण सर्वजण एकत्र येऊन बंधूभाव वाढवून फराळाची मजा घेऊ,पण यावर्षी corona मुळे आपल्याला थोडं अजुनही सोशल distance पाळूनच दिवाळीचा आनंद घ्यायचा आहे.
आणि घरातील लहान मुले जर छोट्या, छोट्या फटाके फोडत असतील तर त्यांना सुध्दा हात पाण्याने धुवून घ्यायला सांगायचे, कारण आपल्याला सर्वांना गेल्या6 महिन्यांपासून sanitizer ची चांगली सवय झाली आहे.
Sanitizer मधील पदार्थ लगेच पेट घेतात म्हणून मुला नबाबतीत खबरदारी घेतलेली बरी.
आणि जमल्यास आकाशातील नैसर्गिक आतिषबाजीचा आनंद घेऊ.
✨🌠☀️⭐🌟🌠🌠⭐🌟🌠✨⭐🌟☀️🌠
    #  कुतूहल दिवाळीतील फटाक्यांचे
      # कुतूहल आकाशातील नैसर्गिक आतिषबाजीचे
       #कुतूहल प्रदूषण मुक्त दिवाळीचे
#कुतूहल उल्कावर्षाव/उल्कापात चे
        संदर्भ-माहिती इंटरनेट, मराठी विश्वकोश
                   @सौ. उज्वला तायडे, अकोट

Comments

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....