'कुतूहल' रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या अन्नघटकांचे.......
हिमोग्लोबिन(haemoglobin)हा रक्तातील महत्वाचा घटक असून.तो लोह(iron) आणि प्रोटीन(protein) यापासून बनलेला असतो.साधारणपणे रक्तामध्ये12ते14.5ml इतके हिमोग्लोबीन चे प्रमाण आवश्यक असते.मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्यामुळे ते ऍनिमिया ला बळी पडतात.डेंग्यू मलेरिया सारख्या आजारात हमखास हिमोग्लोबिन कमी होते.डॉक्टर त्यावर उपाय म्हणून लोह आणि प्रोटीन च्या गोळ्या देतात.मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते.अशावेळी तुमच्या सकस आहारातील पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात.....
☘️पालक-पालकाचा तुमच्या आहारात समावेश असणं महत्वाचे आहे.पालकमुळे रक्तातील iron लोह वाढण्यास मदत होते.सुप्स, भाजी, पालकवड्या, पालक पराठा,आमटी, सलाड कोणत्याही स्वरूपात आपण ती खाऊ शकतो, पालकपनीर तर मस्तच....
पालकवर लिंबू पिळून खाल्ल्याने त्यातील लोह अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण होते.
🍊संत्रा-संत्र्यामधील व्हिटॅमिन 'c'आणि व्हिटॅमिन B6रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते.रोज किमान दोन ग्लास संत्राचा रस साखर न टाकता घेतल्यास भरपूर फायदा होतो.
🥛🍶दूध आणि दुग्धजन्य पदार्थ-आहारात नियमित किमान ग्लासभर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फार महत्वाचे आहे.दुधात शरीराला पूरक अनेक minerals (खनिज)व व्हिटॅमिन्स असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात.दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबीन वाढते.
खजूर-खजुराचे दोन प्रकार आहेत काळा आणि लाल .
खजूर हे लोहाप्रमाणे व्हिटॅमिन'c'व व्हिटॅमिन'B'वाढवण्यास मदत करते.खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते,परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच खण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी, लाडू,चटणी असे पदार्थ मधून आपण खाऊ शकतो.
गूळ-आपल्या भारतीय स्वयंपाक घरात अगदी सहजतेने वापरला जातो.आयुर्वेदात गुळाला औषधीय शर्करा म्हणून संबोधले जाते.गूळ लोहवर्धक असून उत्तम स्वस्था साठी अतिशय उपयुक्त आहे.गुळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढतेच त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढतेआणि त्वरित ऊर्जा मिळते.गूळ शेंगदाणे, गूळ फुटाणे खाल्याने सुध्दा हिमोग्लोबिन वाढते.दररोजच्या जेवणात साखरेऐवजी गूळ वापरणे केव्हाही चांगले/हितावह.
डाळिंब-डाळिंबातील लोहवर्धक आणि मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटॅमिन'c'चे प्रमाण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते.आठवड्यातून 3,4वेळ डाळिंबाच्या रस घेतल्यास नक्कीच हिमोग्लोबिन वाढते.शारीरिक स्वास्थ्याप्रमाने सौंदर्य खुलवण्यासाठी डाळिंबाचा प्रामुख्याने आहारात वापर केला जातो.डाळिंबामध्ये मोठया प्रमाणात कॅल्शियम अन लोह असल्याने हिमोग्लोबिन वाढते.ऍनिमिया वर गुणकारी आहे डाळिंब.डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स, अँटिइन्फल्मेटरी गुण असतात.
बिट-शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर बीटरुट सर्वात चांगला पर्याय आहे. कारण बीटामध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते.
फरसबी-प्रोटीन, कॅल्शियम,लोह, सल्फर,फॉस्फरस तसेच व्हिटॅमिन 'A'असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामुळे folic acid मुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण राखण्यास मदत होते.फरसबी ची भाजी किंवा कोशिंबिरीत फरसबी चा वापर केल्यास हिमोग्लोबिनवाढते.
सुका मेवा-सुका मेव्यात व्हिटॅमिन B6चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषता पिस्ता सर्वाधिक प्रमाणात शरीरात व्हिटॅमिन पुरवते.त्यामुळे लाडू, शिरा, हलवा खीर यांसारख्या पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर वाढवला पाहिजे पिस्त्यातील व्हिटॅमिन B6 रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करते.
डेंग्यू मुळे रक्तातील प्लेटलेट्स भरून काढण्यासाठी किवी fruits फळाची मदत होते.
गरम मसाला-भारतीय खाद्य संस्कृती चे खरे वैभव म्हणजे यामध्ये वापरले जाणारे गरम मसाले.जेवणात तमालपत्र,कोशिंबीर, पुदिना,तुळशीची पाने यांचा योग्य वापर करावा.मसाले आहारातील 'लोह'योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण राखण्यास मदत होते.
#रक्तातील हिमोग्लोबिन
#हिमोग्लोबिन वाढवणारे अन्नघटक
@उज्वला तायडे, अकोट
संदर्भ-इंटरनेट,मराठी विश्वकोश
चित्र-इंटरनेट
Khup chan . Be strong n healthy
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteफार उपयुक्त व माहिती पूर्ण लेख
ReplyDeleteअतिशष उपयुक्त माहिती.फोटोंसह छानच
ReplyDeleteUpyukta mahiti. Aakarshit photo chi sangat. Mast ch.
ReplyDeleteVery nice Ujju...keep it up dear
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete