'कुतूहल'बहुगुणी आपट्याचे/आपट्याच्या पानांचे☘️.....

      
      आज विजयादशमी. या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पण, या आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व फार कमीजणांना ठाऊक आहे. तेव्हा, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया.

आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो,टॅनिन ही मिळवले जाते. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. 'अश्मंतक' म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच 'अश्मंतक' याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा. धन्वंतरीने 'निघण्टू'मध्ये आपट्याच्या झाडाचे आणखी औषधी उपयोग विशद केले आहेत.

तसे पाहिले तर आपटा (Bauhunia racemosa)आणि कांचन (Bauhunia variegata)दोघेही सोन्यासारखी भावंड आहेत एकाच प्रजातीचे caesalpiniaceae family मधीलआहेत ते bauhunia orchids आहेत ती, दोघेही dwarf plant मला मात्र कांचन ची फुले खूप आवडतात, त्यांच्या रंगामुळे.आपट्याच्या पानाला मात्र ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण ।

इष्टानां दर्शनं देही कुरू शत्रुविनाशनम् ॥

 या श्लोकानुसार, आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते. इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. अशाप्रकारे पुराणांमध्ये आणि आयुर्वेदातही आपट्याच्या झाडाचे वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे संदर्भ आढळतात.
             पित्त-कफदोषावर गुणकारी

अश्मन्तकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।

मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ॥

म्हणजेच आपट्याची पाने ही पित्त आणि कफदोषांवर गुणकारी आहेत. दाह, तृष्णा आणि प्रमेह यांच्यावर विजय मिळण्यासाठी आपट्याची पाने उपयोगी ठरतात.

 लघवीवरील जळजळीवर रामबाण उपाय

 लघवीच्या वेळी खूप जळजळ होत असल्यास आपट्याच्या पानांचा हमखास चांगला परिणाम दिसून येतो. आपट्याची पाने शुष्क असल्यामुळे त्यांचा रस निघत नसल्यामुळे ही पाने पाण्यात घालावी व मग ओली पाने नीट वाटून घ्यावी. या रसामध्ये त्याच प्रमाणात दूध व साखर टाकावी आणि तयार काढ्याचे दिवसातून चार-पाच वेळा सेवन करावे. यामुळे लघवीच्या वेळी होणारी जळजळ थांबण्यास मदत होते. आपट्याच्या शेंगा मूत्रल असल्यामुळे पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळ प्यायल्याने लघवी स्वच्छ होते व इतर त्रासही उद्भवत नाही.
 जखमेवर गुणकारी

 त्वचेवर जखम झाल्यास, व्रण उठल्यास त्यावर आपट्याची साल बांधण्याचा सल्लाही आयुर्वेदिक डॉक्टरांकडून दिला जातो. आपट्याच्या सालीचा काढा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध टाकूनसेवन करावा. यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.
 पोटाच्या विकारांवरील औषध

 केवळ आपट्याचे पानच नाही, तर आपट्याच्या बियाही तितक्याच उपयोगी आहेत. या बियांचे बारीक चूर्ण करावे. ते चूर्ण गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार करावे. ही मलम मग कीटकांचा दंश झालेल्या ठिकाणी लावल्यानंतर बरे वाटते. आपट्याच्या बीयुक्त घृताचे सेवन केल्यास कृमी शौचावाटे बाहेर पडतात. मधाबरोबर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण १० ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.
 गालगुंड व कंठरोग

 गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असल्सास आपट्याच्या सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून घ्यावा. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालावा. तसेच गंडमाळेवर आपट्याची साल बांधावी. असे केल्यास गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होण्यास मदत होते.
 विंचवाचे विष उतरवण्यासाठी

शरीरावर विंचू चावल्यास त्यावरून आपट्याची शाखा फिरवायला सांगितले जाते. असे केल्यास विंचवाचे विष उतरते. पण, तरीही अशा घटनांमध्ये इस्पितळ गाठणे केव्हाही योग्यच.

हृदयाची सूज

आपट्याच्या मुळाची साल ही हृदयाची सूज कमी करण्यास मदत करते. आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळावी व ते मिश्रण गाळून प्यावे.
    इतिहासात आपट्याच्या पानांची एक कथा सुद्धा आहे.
फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे 'कौत्स' नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, "मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. " ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.
    कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
    कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.
    असो ही झाली कथा परंतु आपल्याला माहिती आहे की शुद्ध सोने आणि त्यापासून नाणी बनवण्यासाठी कित्तीतरी प्रक्रियेतून जावे लागते .

याच दिवशी इ .स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने कलिंग युद्धात दहाव्या दिवशी विजय मिळवला म्हणून सुद्धा या सणाला अशोक विजयादशमी म्हणतात.याच दिवशी सम्राट अशोक याने बौद्ध धम्म दीक्षा घेतली होती.कलिंग च्या युद्धानंतर सम्राट अशोक याने हिंसेचा मार्ग त्याग करून  बुद्ध धम्म स्वीकारण्याची घोषणा केली होती.
कलिंगच्या युद्धात झालेल्या मानवी संहारामुळे दुखीत होवून तलवारीच्या सहाय्याने मानवांची हत्या करून विजय मिळवण्यापेक्षा धम्माच्या साहाय्याने मने जिंकणे श्रेयस्कर असा विचार करून आपली तलवार सम्राट अशोक ने आपली तलवार ज्या दिवशी म्यान केली तो दिवस म्हणजे अशोकविजया दशमीच्या दिवस.तेव्हापासून भारतामध्ये अशोकविजया दशमीच्या दिवशी उत्सव साजरा केला जातो.कारण त्या दिवशी मैत्री,करुणा, प्रज्ञेने क्रूरतेवर विजय मिळवला.
म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अशोक विजयादशमी चा दिवस आपल्या धम्मदीक्षेसाठी निवडला.
याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.14 ऑक्टोबर1956 साली आणि तो दिवस होता अशोकविजया चा.धम्मचक्र प्रवर्तन दिन बौध्द धर्मीयांसाठी एक खास दिन आहे.कारण याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला .
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी .
'दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा'या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे.या सणात चातुर्वर्ण्य र्एकत्र आलेले दिसतात.
असे आहे या bauhunia resemosa बहुगुणीआपट्याच्या झाडाचेऔषधी गुणधर्म आणि ऐतिहासिक महत्व.आपट्याच्या पानांचे पुराणातल्या गोष्टीमुळे, आणि त्यात असलेल्या औषधी गुणधर्म यामुळे सुध्दा त्याचे महत्व वाढते.
आहे की नाही कुतूहल आपट्याच्या झाडांच्या पानांचे.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
 
          #  कुतूहल आपट्याच्या पानांचे
#    आपट्याची पाने
#           कुतूहल बहुगुणी आपट्याचे
संदर्भ-माहिती इंटरनेट,internet ,संकलित माहिती
-मराठी विश्वकोश
चित्र-इंटरनेट
@उज्वला तायडे, अकोट
                    

Comments