'कुतूहल'पक्षी स्थलांतराचे..…....

     
आपलेकडे हिवाळ्यात भरपूर नवीन पक्षी पहायला मिळतात.पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे. 
पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल सर्वांनाच  'कुतूहल' वाटते.
हिवाळा ऋतूमध्ये परदेशातून अनेक पक्षी स्थलांतरीत होऊन आपल्याकडे येतात. पक्ष्यांचे स्थलांतर हा एक कुतूहलाचा विषय असून त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जगभरात दरवर्षी वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते.थंडीच्या मोसमात त्यांचे वास्तव्य असलेल्या देशात मोठया प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने त्यांना त्यांचे खाद्य कमी पडते, जगण्यासाठी वातावरण कठीण असते आणि त्यांच्या पिल्लांची सुयोग्य वाढ अशा प्रमुख कारणांसाठी हे पक्षी3ते4 महिन्यांसाठी स्थलांतर करतात.
अन्न, पाणी आणि घरटी बांधण्याची सोय या तीन प्राथमिक गोष्टींची गरज जितकी मानवाला, तितकीच ती पक्ष्यांना देखील!म्हणून त्यासाठी होत असावे स्थलांतर.त्यामुळे साहजिकच पक्षी, ज्या ठिकाणी या गोष्टींची कमतरता भासू लागते, अशी ठिकाणे सोडून मुबलकतेच्या जागी स्थलांतर करतात.


    हे पक्षी इतक्या विविध प्रकारचे रंगात, रुपात असतात की त्यांना रांगोळीत उतरवण्याचा मोह आवरत नाही.
      आता पक्षी स्थलांतर म्हणजे नक्की काय ?तर पक्षी स्थलांतर म्हणजे विणीच्या स्थानाकडून मुबलक अन्नसाठा असलेल्या ठिकाणापर्यंत व परत विणीच्या स्थानाकडे होणारा पक्ष्यांचा वार्षिक प्रवास. या प्रवासात पक्षी काही किलोमीटरपासून काही हजार किलोमीटरचा प्रदेश ओलांडतात. यादरम्यान ते एक ते अनेक देशांना पार करतात. स्थलांतराचे एकूण १२ प्रकार आहेत. मात्र, यातील सर्वात अधिक आढळणारा प्रकार म्हणजे ऋतूनुसार होणारे स्थलांतर. यात उत्तरेकडील थंड प्रदेशातील पक्षी दक्षिणेकडील गरम प्रदेशात थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता येतात. यात ते मुबलक अन्नसाठा व कमी स्पर्धा असलेल्या ठिकाणांची निवड करतात.
      स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या ठळक व आश्चर्य कारक अशा काही गोष्टी आहेत. ते हजारो की. मी.उंच उडत प्रवास करतात. काही पक्षी हवेत 6ते7की मी उंच उडत प्रवास करतात. पक्षांना नेमके ज्या ठिकाणी पोहोचायचे असते ,नेमके तेथेच पोहोचतात. पक्षी प्रवासाची दिशा ठरवण्यासाठी आकाशातील तारे, सूर्य आणि चंद्र यांचा उपयोग करतात.त्यांचा मार्ग शोधण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. अनेक पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्ग त्यांच्या जणुकांमध्ये कोरलेला असतो. जर पक्ष्यांना गंध/वास याची जाणीव कमी झाली, तर स्थलांतर करताना बाधा येवू शकते. स्थलांतरित पक्षी ते ज्या ठिकाणी जन्मले,ते ठिकाण लक्षात ठेवू शकतात आणि तेथे परत जाऊ शकतात.
      स्थलांतर प्रक्रियेविषयी सर्वसाधारणपणे निर्माण
 होणार प्रश्न म्हणजे. पक्षी हे स्थलांतराची वेळ कशी ठरवतात? आपण पाहत असलेले पक्षी हे हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालेले आहेत. त्यांना स्थलांतरणाकरिता लागणारी प्रेरणा ही त्यांच्या पुर्वजांकडून आलेल्या जनुकांमधून मिळाली आहे. त्यासोबत बदलणारे हवामान, दिवसांचा अवधी, अन्नाचा साठा, इ. नैसर्गिक घटनाही स्थलांतरणाला प्रेरणा देतात. हे स्थलांतर विविध पद्धतीने होत असते त्यामुळे अद्यापही त्याची अचूक यंत्रणा समजलेली नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचे असेल, तर आपण नकाशा, तक्ते किंवा हल्लीच्या काळात ‘गुगलमॅप’ सारख्या उपकरणांचा वापर करतो. परंतु, या सगळ्याशिवाय हे पक्षी आपला मार्ग कसा ठरवतात? हे पक्षी दरवर्षी थोड्याफार फरकाने त्याच जागी कसे पोहोचतात? यामागचे कारण आहे पृथ्वीचे चुंबकत्व. पक्ष्यांना हे चुंबकत्व जाणवते आणि त्याआधारे ते आपला मार्ग ठरवतात. त्याच सोबत चंद्र-सूर्य, तारे यांची दिशा, हवेचा वेग व दिशा, विविध भूभाग अशा अनेक खुणगाठींच्या साहाय्याने ते दरवर्षी एकाच स्थळी पोहोचतात.
हवामान, हा देखील या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. विशेषतः उत्तर गोलार्धातील पक्षी वसंत ऋतूमध्ये कीटकांची वाढती संख्या, झाडे आणि घरट्यांसाठीची भरपूर जागा यांचा फायदा घेण्यासाठी उत्तरेकडे स्थलांतर करतात. जसजसा हिवाळा जवळ येतो आणि कीटक आणि इतर गोष्टींची उपलब्धता कमी होते, पक्षी पुन्हा दक्षिणेकडे जातात. तीव्र थंडीपासून दूर राहणे हा या स्थलांतरणामागील एक महत्वाचा घटक आहे.
पक्षी स्थलांतर करण्याअगोदर जास्त खाद्य घेऊन स्वतःच्या40%ते50%वजन वाढवितात .स्थलांतर करताना त्यांना अनेक गोष्टींचा धोका असतो.
 महाराष्ट्रात दरवर्षी थंडीच्या मोसमात अनेक पाहुणे पक्षी स्थलांतर करून येतात. यामध्ये प्रामुख्याने पट्टकदंब,अग्निपंख, लाल डोक्याचा ससाणा, सामन्य खरुची, छोट्या ठिपक्यांच्या गरुड ,नेपाळी गरुड, सामान्य बाज, आखूड बोटांचा सर्प गरुड, छोटी लालसरी ,मोठी लालसरी,  चित्रांग बदक,अडाई, चक्रवाक, नटका बदक व इतर पक्ष्यांचा समावेश आहे.
राजहंस हा पक्षी मंगोलिया, कझाकीस्थान या देशातून दक्षिणेकडे सुमारे 1500कि.मी .प्रवास करीत 50ते60दिवसांत भारतात येतो. हा पक्षी आकाशात हिमालयाच्या पर्वतरांगावरून6ते7किमी उंचावरून (आकाशात उडणाऱ्या विमानाहून उंच)उडत येतो.ह्या पक्ष्यांचा समूह दर वर्षी नेमका विशिष्ट तलावावर येऊन पोहोचतो.आर्टिक टर्न प्रत्येक वर्षी 49,700 मैलांपेक्षा जास्त प्रवास करू शकतो. पट्टेरी शेपटीचा पान टीवला हा पक्षी न थांबता सलग7000मैल प्रवास करतो.एक गाणारा लहान पक्षी उत्तरी व्हिटीयर सर्वात कमी वजन असलेला पक्षी15000 किमी अलास्का ते उपसहारा आफ्रिकेत स्थलांतरित होतो.
सोलापूर ला भारतात आढळणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 23%पक्षी आढळतात. सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन आहे.
मागील काही वर्षे निसर्गात अनेक बदल होताना आपण पाहतो. निसर्गातील समतोल झपाट्याने ढळत चाललाय वेगवेगळ्या कारणामुळे जंगलावरील, नदीवरील, समुद्रावरील आणि तलावावरील अतिरीक्त,मोठया प्रमाणात होणारी झाडांची कत्तल, पक्षी आणि प्राण्यांच्या नैसर्गिक निवासक्षेत्रात मानवाचा होणारा हस्तक्षेप आणि कीटकनाशकांचा वापर.
आपण सर्व जण आपल्या अवतीभवतीच्या वन्यजीवणाची, पर्यावरणाची, निसर्गाची आणि स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची काळजी घेतल्यास त्याचे रक्षण केल्यास आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकण्यास मदत होईल,आपल्याकडे स्थलांतरित झालेल्या ह्या पाहुण्या पक्ष्यांचे सौन्दर्य अनुभवायला मिळेल.
संदर्भ-माहिती इंटरनेट
#कुतूहल पक्षी स्थलांतराचे
#पक्षी स्थलांतर
#migration
#birds

@उज्वला किसन तायडे, अकोट



Comments

  1. महत्वाची आणि विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल निर्माण करणारी माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....