'कुतूहल'अचानक येणाऱ्या जांभई चे.......

       
दररोज आपण स्वतः किंवा इतरांना एकदा तरी जांभई देताना बघतो. जांभई देताना वेडेवाकडे तोंड करून ,विशिष्ट प्रकारचा आवाज देखील काढला जातो.
 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्‍याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना!मग जाणून घेऊया कुतूहल जांभई येण्याचे.
एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय.
जांभई दिल्याने मेंदू toxin free होतो. ऑक्सिजन चा पुरवठा वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढला असल्यास  नियंत्रित होण्यास मदत होते. परिणामी तणाव कमी होतो.
जांभई कशी असते ते आपल्या सर्वानांच माहिती आहे. संपूर्ण जबडा उघडून आपण जोरात श्वास बाहेर सोडतो. बऱ्याचदा जांभई दिल्यानंतर आपण उसासा देखील सोडतो.
जांभई देताना आपल्या जबड्यांच्या होणाऱ्या वेगवान हालचालींमुळे आपल्या कवटीभोवती रक्ताभिसरण होते आणि त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर नेण्यास मदत होते. तसेच दीर्घश्वसन केल्याने  सायनस कॅव्हिटी मध्ये आणि कॅरोटीड artery च्या आजूबाजूला गार हवा पोहचते. हा गारवा पुढे मेंदूपर्यंत पोहचतो ,त्याचप्रमाणे या तणावपूर्ण हालचालींमुळे सायनसच्या बाहेरील त्वचेवर म्हणजे membrane वर ताण येवू शकतो.यामुळे गार वाऱ्याची हलकीशी लहर या कॅव्हिटी मधून वाहते आणि म्युकस म्हणून श्लेष्म नाहीसा होवून मेंदू वातानुकूलित व्हावा तसा थंड होतो.
एखाद्या वेळी जेव्हा आपण जास्त थकतो तेव्हा शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते असे मानले जाते. मग हे ऑक्सिजन चे प्रमाण कमी का होते?तर मनुष्याला जास्त ऊर्जेसाठी जास्त ऑक्सिजन लागतो .तसेच जर झोप व्यवस्थित झाली नाही तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन ची आवश्यकता पडते .मग कमी पडलेला ऑक्सिजन मिळवण्यासाठी तोंड मोठे उघडून अधिक प्रमाणात हवा शरीरात खेचून घेतली जाते, ज्याला आपण जांभई म्हणतो.
दुसरीकडे काही शास्त्रज्ञांच्या मते रक्तातील कार्बन डायॉक्साईड चे प्रमाण वाढल्यास तो बाहेर टाकण्यासाठी देखील जांभई येते.
कधी कधी समोर सुरु असलेल्याएखाद्या कामाचा, घटनेचा, चर्चेचा,बोलण्याचा जेव्हा माणसाला कंटाळा येतो तेव्हा त्या व्यक्तीला जांभया येतात.
एखादे व्याख्यान कंटाळवाणे असेल तर निश्चितच व्यक्तीला जांभई येते.
आणि गम्मत म्हणजे5ते6 जांभया देऊन झाल्या की व्यक्ती झोपायला तयार होतो. कधीकधी झोपायच्या आधी/उठल्यावर जांभया येतात.
आपण झोपायच्या आधी आणि उठायच्याआधी आपलं शारीरिक तापमान वाढतं. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या उठल्या मेंदुलायोग्य तापमानात आणण्यासाठी आपल्याला जांभई येत असते.
कधी कधी तणावपूर्ण परिस्थितीत सुद्धा जांभया येतात.
ऑलम्पिक मध्ये बरेच खेळाडू स्पर्धेआधी जांभई देतात. कलाकार देखील कार्यक्रमाचे आधी जांभई देतात. तेव्हा आपल्याला rebut करण्यासाठी, आपण झोपाळलेले असतो तेव्हा आपल्याला सावधान करण्यासाठी जांभया येतात, आपण विचलीत असताना देखील जांभया येतात.
मनुष्य च काय पण काही प्राणी देखील जांभई देताना दिसतात. मांजर, कुत्रा, घोडा, वाघ, सिंह, पक्षी देखील जांभई देतात. मगर, साप, इतकेच नाही तर, पाण्यातील मासे देखील हळूच जांभई देतात, आहे की नाही कुतूहल.
जांभया संसर्गजन्य देखील आहेत बरं. समोरच्या व्यक्तीला  जांभई देताना बघून,जांभई देण्याचा मोह न अवरल्याने 50%लोकं तर हमखास जांभई देतात.
जांभई संबंधित आपण काहीही वाचले, ऐकले तरीही जांभई येते.जांभई देताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज देखील काढला जातो.....
आयुर्वेदात देखील जांभई विषयी सांगितले आहे की, मल, मूत्र, अधोवायू, शिंक यांच्याप्रमाणेच जांभई हि एक नैसर्गिक क्रिया आहे, ज्याला आयुर्वेदाने नैसर्गिक वेग असे म्हटले आहे. नैसर्गिक वेग अडवणे  शरीराला त्रासदायक होते इतकेच नव्हे तर रोगकारक देखील ठरते असे आयुर्वेद सांगतो.
माणसाच्या साऱ्या भावभावना मेंदूतच निर्माण होतात.
बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणिव जिथे निर्माण होतात ते ठिकाण म्हणजे मेंदू.
जांभई का येते, कशामुळे येते, त्याचे नेमके कारण काय? या सगळ्या प्रश्नाबाबत संशोधकांमध्ये मतभेद असले तरी, जांभई दिल्याने आपल्या थकवा दूर होतो याबाबत मात्र यांचे एकमत आहे. खरे जांभई येणे ही झोपेची वेळ झाल्याची सूचना नाही, तर ती ही झोपेची वेळ नाही हे सांगणारी सूचना आहे.
कुणाला सतत जांभया येतात म्हणून आता चीडचीड करण्याचे कारण नाही; कारण, यामागची नेमकी प्रक्रिया आता स्पष्ट झाली आहे.कारण शिंक येणे,उचकी लागणे यासारखीच जांभई येणे  ही देखील एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे.(reflex action.).
मग काय जास्त विचार न करता देत रहा हमखास जांभई... आणि घ्या आनंद..... जांभई देण्याचा... refresh होण्याचा.....
                       #कुतूहल जांभई येण्याचे
                     #जांभई
             संदर्भ-माहिती इंटरनेट, चित्र इंटरनेट
        
                 @ujwala tayade, Akot


Comments

  1. माहितीपूर्ण. खरंतर जांभई हा आपल्या नित्याचाच भाग. त्याविषयी कुतूहल वाटून त्यावर या लेखातून अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....