"कुतूहल"कोकीळ पक्षाच्या 'कुहू',कुहू अश्या... पंचम स्वराचे....

               
           आज कोकीळ पक्षाच्या कुहू ...sssकुहूsss..
अश्या आवाजावरून लहानपणी ची आठवण झाली.
लहानपणी दररोज सकाळी सकाळी टेपरेकॉर्डर वर भक्ती गीत लावली जायची,त्यातील एक म्हणजे बाळ कोलहट्टकरांचे पं. कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेलं गीत 
मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला लाविला,
स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा...
अक्षरशः तोंडपाठ झाली होती तेव्हा गाणी.
त्या गीतातील शेवटच्या ओळींचे खूप 'कुतूहल'वाटायचे तेव्हा....."वनवेळूनचे वाजवी मुरली छान सूर लागला,
आ sss तरुशिखरावर कोकिळ कवीने पंचम स्वर लाविला...... खूप कुतूहल वाटायचं पंचम स्वराचे.
ऋतुराज वसंताचे आगमन झाले की साऱ्या निसर्गाला जणू आनंदाचे उधाण येतं.
सर्व जिवंत प्राण्यांसाठी वसंत ऋतु; उदाहरणार्थ, झाडे, वनस्पती, फुले, प्राणी, पक्षी, मानवासाठी आनंद आणि आनंदाचा एक हंगाम आहे कारण तो खूप गरम किंवा खूप थंड होत नाही दिवस आणि रात्र जवळजवळ सारखीच आहे, ना खूप मोठी किंवा लहान नाहीत सर्व हिवाळ्यात खूप थंड, उन्हाळ्यात खूप उष्ण होतात आणि पावसाळी खूप चिखल, पण वसंत ऋतू, हेच सर्व मिक्स हवामान असते.
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकीळ पक्ष्याच्या विणीचा काळ असतो.मात्र हा पक्षी आपले घरटे बांधत नाही,कोकीळ गटातील काही पक्षी बांधतात.
 'असावे घरकुल अपुले छान'हे त्यांना कदाचित त्यांना आवडत नसावे.
तसेच ते आपल्या पिल्लांची देखभाल करत नाहीत.
मादी कोकिळा फिकट हिरव्या राखाडी रंगाची त्यावर लालसर तपकीरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अश्या कोणत्याही पक्षाच्या घरट्यात सोडून जाते...बहुतांश कावळा..
कोकीळ पक्षाला मिळालेली देणगी म्हणजे कोकीळ पक्षी संपूर्ण तयार झालेले अंडे स्वतःच्या पोटातच ठेवू शकतो .जेव्हा संधी मिळेल तेंव्हा ते इतरांच्या घरट्यात अंडी घालतात. कोकीळ गटातील काही पक्षी वगळता बाकीचे परावलंबी आहेत.
                कोकीळ पक्षी मुखत्वे झाडावर राहणारा(Arboreel),तो दाट पाने असलेल्या झुडुपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. हल्ली माझ्या mulberry वर कोकीळ पक्ष्याचे एक जोडपे जणू दत्तक च घेतले आहे.
कीटक, फुलपाखरे, सुरवंट ,फळे, मध हे त्यांचं खाद्य.
म्हणजे हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.
 'इतर पक्षी आपल्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे पिलांना,  खाऊ घालणे वगैरे काम त्या घरट्यात राहणारे माता पिता करतात. त्यांची स्वतःची पिल्ले अंड्यातून बाहेर येण्याआधी बहुदा कोकिळेची पिल्ले बाहेर आलेली असतात.त्यांची वाढही इतर पक्ष्यांच्या पिल्लांच्या तुलनेत वेगाने होते.

जेव्हा पक्षांच्या गाण्यांनी पहाटेची सुरुवात होते म्हणजे पावसाळ्याची नांदी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस पक्षी रंगानेही नटलेले असतात. सुमधुर गाणी आणि रंगांची उधळण हे फक्त जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी.
मादी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठीच्या या स्पर्धेत आणि जणू पावसाळ्याची दवंडी पिटवण्याच्या उत्साहात  उच्यांक गाठला आहे तो कोकीळ च्या गटातील पक्ष्यांनी. कोकीळ पक्ष्याची कुहूss कुहूss सुरू होते आणि मौसम बदलाची चाहूल लागते.
गाणारा मात्र नर कोकीळ पक्षी असतो बरं,कोकिळा नाही.. हे बऱ्याच जणांना माहिती नसते.
बहुतांशी गाणारे पक्षी किंवा रंगाने भडक असणारे पक्षी हे नर पक्षी असतात.
कोकीळ पक्ष्याचे पिल्ले अंड्यातून बाहेर येईपर्यंत पावसाळा आलेला असतो. अगदी पावसाळ्याच्या तोंडाशी कोकीळ पक्ष्याच्या ताना वाढत जातात. त्याच्याच जोडीला आणखी एक कोकीळ कुलातील पक्षी साद द्यायला सुरुवात करतो, तो म्हणजे पावशा....
पेर्ते व्हा..... पेर्ते व्हा.... ही आरोळी सर्वांनाच परिचयाची आहे. हाच तो पावशा.. common hawk.-cuckoo
Cuckoo गटातील सर्व पक्षी पावसाच्या सुरुवातीस संपूर्णपणे गायनात गुंतलेले असतात.
भारतातील बव्हंशी जंगलाचा ताबा यांच्याच आवाजाने घेतलेला असतो. गावात, आणि शहरात सुद्धा.
पावसाळ्याशी हे सूर घट्ट जुळलेले आहेत.
मान्सून सुरू होतो आणि निसर्गात विविध जीवांची लगलग सुरू होते. बेडूक, पाली, किडे, मुंग्या, कोळी/कोष्टी, अनेक जातींची जीव जन्माला येतात.
सर्वत्र हिरवाई.... सर्वांना पुरेल इतके अन्न निसर्गात उपलब्ध असते. सर्व जीव भरपूर संख्येने उपलब्ध असल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारे पक्षीही या काळात आपल्या पिल्लांना जन्म देतात जेणेकरून अन्नाची कमतरता होत नाही. अन्नसाखळी, जैवविविधता दुसरे काय...जिओ जिवस्य जीवनम.... आणखी काय...
कोकीळ पक्षाचे कुहू sssss ओरडणे म्हणजे सप्त सुरातील पंचम स्वर. पक्षी सुरातच बोलतात. 
आंब्याला मोहोर येण्याच्या काळात ऋतुराज वसंताच्या आगमनापासून 'कुहू'....ते ग्रीष्मातही... तेव्हा कोकीळ पक्ष्याला कंठ फुटला असे म्हणतात.
.

                       संदर्भ माहिती-इंटरनेट
                चित्र-इंटरनेट 
                          सौ. उज्वला तायडे, अकोट
       # 'कुतूहल'कोकीळ पक्ष्याच्या कुहू अश्या पंचम स्वराचे,
       #कुहू कुहू
       #कोकीळ पक्षी 

                   

Comments

  1. खरंच कोकीळ पक्षाचा स्वर खूपच छान ..
    सुमधुर ..सगळ्यांना मोहित करतो.. सर्वांनाच कुतूहल वाटतं.. छान वर्णन केलं

    ReplyDelete
  2. खरंच कोकीळ पक्षाचा स्वर खूपच छान ..
    सुमधुर ..सगळ्यांना मोहित करतो.. सर्वांनाच कुतूहल वाटतं.. छान वर्णन केलं

    ReplyDelete
  3. खुपचं छान अत्यंत उपयुक्त माहिती.

    ReplyDelete
  4. Ujwala tumche saglech lekh khup Chan astat. Nisargacha ani nisargatil jaivik ghatakancha khup Chan abhyas Purna ani nirikshan Purna lekhan asta tumcha. Khup Chan lihilay ani rangoli madhun khup Chan msg denya cha prayatna rather idea khup ch awadli mala. Pudhil likhana sathi shubheccha

    ReplyDelete
  5. Ujwala tumche saglech lekh khup Chan astat. Nisargacha ani nisargatil jaivik ghatakancha khup Chan abhyas Purna ani nirikshan Purna lekhan asta tumcha. Khup Chan lihilay ani rangoli madhun khup Chan msg denya cha prayatna rather idea khup ch awadli mala. Pudhil likhana sathi shubheccha

    ReplyDelete
  6. अभिनंदन मॅडम
    खरच अभ्यासपूर्ण व रंजक माहिती असते
    वाचताना आनंद होतो
    पुढच्या नवीन विषयाची वाट पाहत आहे
    All the Best

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....