'कुतूहल'सुपरमून/pink moon चे......
अवकाशात विलोभनीय दिसणाऱ्या घटनांपैकी एक घटना म्हणजेआपल्याला सुपर मून बघायला मिळणे आहे. चैत्र पौर्णिमेची ही 'सुपरमून' पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपर मून असणार आहे. यावेळेस चंद्र१४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. या 'सुपर मून' चे विशिष्ट म्हणजे पौर्णिमा २७ एप्रिलला असली तरी २६ ते २८ एप्रिल या तीन दिवस चंद्र जवळ जवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील
यावेळेस अंतर ३ लाख ५८ हजार ६१५ किमी असेल.
कोरोनाच्या विषाणूचा प्रार्दुभाव आणि लॉकडाउनमुळे खगोल अभ्यासकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नसले तरी अनेक खगोलप्रेमी घरूनच सुपरमूनचाआनंद घेणार आहेत.नेहरू। सायन्स सेन्टर नि एक live दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
वर्षातील हा पहिलाच सुपरमून आहे.या पौर्णिमेच्या चंद्राला पिंक मून म्हणत असले तरी त्याचा रंगाशी काही संबंध नाही. खगोल वैज्ञानिकांनी सुपरमूनसाठी प्रत्येक पौर्णिमेला वेगळा रंग दिला आहे, म्हणून पिंकमून म्हणून याची ओळख निश्चित केली आहे.दुर्बिणीची गरज नाही सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. हा सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही, परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येतील.
याशिवाय DSLR कॅमेरा ने ही टिपता येतील.
ज्यावेळी चंद्र अवकाशात भव्य स्थिती धारण करते त्यावेळी पृथ्वीवर वसंत ऋतूत फ्लोक्स ही फुलांची झाडे बहरतात. या झाडाला गुलाबी रंगांची मनमोहक अशी झुबकेदार फुले येतात. म्हणूनच चंद्राच्या या स्थितीला पिंक मून हे नाव सर्वश्रुत झाले.
प्रत्येक वर्षी सुपरमूनच्या वेळेस चंद्र-पृथ्वी मधील अंतर कमी अधिक होत असते. हे कमीतकमी अंतर ३ लाख ५६ हजार ५०० किमी तर दूरचे अंतर ४ लाख ६ हजार ७०० किमी असते .या वर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमून च्या वेळी राहणार आहे. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेबर २०१६ ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हे देखील खूप कमी अंतराचे राहील. परंतु पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल तर ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून होणार आहे. खऱ्या अर्थाने २७ एप्रिल आणि २६ मे २०२१ हे दोन जुळे सुपरमून आहेत. दोन्ही वेळेसच्या चंद्र-पथ्वी अंतरात केवळ १५७ कि.मी.चा फरक आहे. भारतीय कॅलेंडर नुसार ही चैत्र पौर्णिमा असून या दिवशी हनुमान जयंती आहे. गौतम बुद्धाने याच दिवशी श्रीलंकेला भेट दिली होती. त्यामुळे तिथे या पौर्णिमेला 'बक पोसा' असे म्हटले जाते.
आज या वर्षातला पहिला सुपरमून म्हणजे सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. यावेळी चंद्र त्याच्या नेहमीच्या आकारमानाहून 14 टक्के मोठा आणि 30 टक्के तेजस्वी दिसेल.
चंद्र जेव्हा जवळ येतो, तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षाणामुळे समुद्राला मोठी भरती येते. पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्व आहे.
चंद्र जेव्हा जवळ येतो, तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षाणामुळे समुद्राला मोठी भरती येते. पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्व आहे.
तसे दर महिन्याला दिसणाऱ्या चंद्राची पुरातन काळानुसार वेगवेगळी नावे आहेत
🌕January: Wolf Moon. ..🌕.,February: Snow Moon. ..🌕.,March: Worm Moon. ...🌕,April: Pink Moon. ...🌕,May: Flower Moon. ...🌕,June: Strawberry Moon. ...,🌕July: Buck Moon. ..🌕.,August: Sturgeon Moon.🌕,Septeber-harvest moon,🌕October-hunter moon,🌕November-beaver moon,🌕December-cold moon
आपल्या साहित्यात चंद्राला बऱ्याचश्या उपमा दिल्या, त्यावर खूप सारी गाणी पण प्रसिद्ध आहेत.
तसेही चंद्र हा पृथीच्या सर्वात जवळचा म्हणून हक्काने आपण त्याला मामा म्हणतो चांदोमामा.
लहानपणी पासून सर्वांच्या आवडीचा चांदोमामा.
#सुपेरमून
#पिंक मुन
#कुतुहल सुपेरमून चे
संदर्भ-माहिती इंटरनेट चित्र इंटरनेट
@उज्वला तायडे, akot
कुतुहल ,स्पष्ट करणारा लेख.
ReplyDeleteवाह खूपच छान माहिती
ReplyDelete