🌍🌱🌎🌱🌏🌱🌐🌱🌍🌱🌎🌱🌏🌱
वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे.
वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा ही वसुंधरा आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमींसोबतच सर्वसामान्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी संकल्प करून तो प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा.
फक्त "save earth, save life",पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा",असे म्हणून चालणार नाही.
जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. अलिकडे मानवाला विकास आणि प्रगती या दोन गोष्टींची चटक लागली आहे. त्यामुळे मानव निसर्गावर विजय मिळवू पाहात आहे. त्यासाठी डोंगर सपाट करणे, झाडे तोडणे... जंगलं नष्ट करणे असे उद्योग मानव करत आहे. कोळसा आणि भूखनिजांसाठी अति प्रमाणावर जमीन खणली जात आहे. ज्यामुळे पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. उद्योग आणि व्यवसाय उभारण्यासाठी, विस्तारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणास चालना दिली जात आहे. ज्यामुळे रसायणमिश्रीत पाणी ओढे, नाले, नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्याचा परिणाम समुद्रातील पाणी दुषीत होते.आणि समुद्री सजीवांना हानी पोहोचते.
पृथ्वीचे तापमान वाढत चालले असून समतोल ढासळत आहे. हे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात मनुष्य इतर जीवसृष्टी नष्ट होईल, त्यामुळे आपले पर्यावरण वाचवण्याची आज गरज निर्माण झाली आहे
हवामान बदल दिवसेंदिवस स्पष्टपणे जाणवू लागल्यामुळे स्वच्छ पर्यावरणाची गरज अधिक तातडीने अधोरेखीत होऊ लागली आहे. शुद्ध पर्यावरणाची लढाई अजून सुरू असून, दिवसेंदिवस तिची व्यापकता वाढवणे अत्यावश्यक बनले .
१९७० मध्ये सर्वप्रथम सॅनफ्रान्सिस्को (अमेरिका) येथे अर्थ डे साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलाॅर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत. अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने थंड होऊन त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
अन्न,वस्त्र निवारा देणारी पृथ्वी आपलं संतुलन कायम ठेऊन तिच्यावरील जीवसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. आपली ही वसुंधरा सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीचे वयोमान मोजण्याची वैज्ञानिक पद्धती युरेनियम डेटींग ही आहे. युरेनियम २३८ या किरणोत्सारी मुलद्रव्याच्या अर्ध्या आयुष्याच्या काळावरून पृथ्वीचे वय काढण्यात आले आहे. या पृथ्वीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ यावरच जीवसृष्टी तिचा मूळ आधार पाणी आहे.
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त संसाधनं उपलब्ध आहेत. या पृथ्वीवर मनुष्याकरीता पशु पक्ष्यांकरीता तसच झाडा वेलींकरीता पाणी मिळतं. श्वास घेण्याकरीता प्राणवायु प्राप्त होतो या सोबतच पृथ्वीवर आपल्या जगण्यासाठी चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे.
या धरतीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणुनच आपण सर्वांनी या धरतीचे रक्षण करावयास हवे. परंतु आज मनुष्य या पृथ्वीचे संरक्षण करण्या ऐवेजी तिच्या अस्तित्वालाच नष्ट करावयास निघाला आहे.
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज आहे.
मृदा म्हणजे माती नव्हे अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा अर्धवट किंवा पुर्णपणे कुजलेले पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात.
आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी आता शाळेमध्ये सुद्धा वृक्ष रोपण करण्यात येत आहे. सरकारने सुद्धा वृक्षारोपण करण्यात आपला सहभाग दर्शवला आहे. दरवर्षाला कमीत कमी एक कोटी वृक्ष लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. असे झाले तर आपण पृथ्वीला वाचवू शकू. तसचं येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आणि चंगला निसर्ग देवू शकू. येणाऱ्या पिढीचा विचार करून सर्वांनी आपल्या दारी एक तरी वृक्ष लावला पाहिजे.
अंगणी लावा एक तरी तुळस ऑक्सिजन चा होईल कळस.
वनस्पती आपल्या प्रकाशसंश्लेषण क्रियेतून आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करुन देतात. वातावरणातील कार्बन डायॉक्साईड शोषून घेवून शुद्ध ऑक्सिजन देतात .वनस्पतींच्या पानांवर असलेल्या
छिद्रांमधूम ही क्रिया घडते एका पानांवरील छिद्रांची संख्या जवळपास 40 ते 60 हजार इतकी असते .
प्रकाशसंश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर वातावरणात सोडला जातो.अआता तर corona मुळे ऑक्सिजन ची नितांत आवश्यकता आहे.
वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होते. विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्य, फळे, भाज्या देतात. मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे.हया सर्व गोष्टी आपल्याला लहान मुलांना समजावून सांगायच्या आहेत.त्यांना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची आठवण करून देण्याची गरज आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पशुपक्ष्यांशी सोयरिक जोडणारे हे संतकवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती.
🌍🌎🌏🌐 🌱 🌍🌎🌏🌍 🌱🌍🌎🌏🌐
संदर्भ. माहिती इंटरनेट
चित्र-इंटरनेट
🌱 उज्वला तायडे, अकोट🌱
होय खरै आहे आज जर आपण वसुधरेचे सरंक्षण (झाडे 🌲 आणी पाणी ) ह्या पृथ्वी चे रुपांतर चंद्र आणि मंगळा सारखे होईल ह्यात शंका नाही.
ReplyDeleteखुप विविध प्रकारची माहिती आपण ईंटरनेट च्या साहाय्याने संकलीत करून आपला लेख छान प्रस्तुत केला आहे. चित्र॔ची निवडही विषयानुसार चपखलपणे केली आहे. लेख प्रेक्षणीय आणि वाचनीय, माहितीपूर्ण आहे.
ReplyDeleteनेहेमीप्रमाणे गंभीर विषय सरल करून मांडलाय. चित्रं, छायांनी आकर्षक केलाय. यात मूर्त (tangible) माहितीही आहे. यापेक्षा थोडे संक्षिप्त असलेले तुमचे लेख अधिक गुंतवून ठेवतात.
ReplyDelete