'कुतूहल'....मृगजळाचे....


   
          लहानपणी सतत उन्हाळ्यात पडलेला प्रश्न असायचा, लांबून रस्त्यावर पाणी वाहताना का दिसते?लांब दूरवरून शेतात एकही पीक नसताना पाणी हल ल्यासारखे का दिसते?मोठ्यांकडून उत्तरे मिळायची मृगजळ आहे ते, तेव्हा खूप ' कुतूहल' वाटायचे त्या मृगजळचे.
मिराज  किंवा  वाळवंटातील पाण्यातील लाटा याला हरीण/ डियर अनेकदा त्यावर फसतो, याला मृगजळ असे म्हणतात.
जे कधी होणार नाही ,घडणार नाही अश्या गोष्टींचा निरर्थक आशावाद बाळगून त्या पाठी मृगाप्रमाणे धावणं म्हणजे मृगजळ.

अगदी सोप्या भाषेत मृगजळ म्हणजे "जसं आहे तसं न दिसता वेगळे काहीतरी दिसणं" होय.
आपण एखादी वस्तू पाहतो कारण त्यावर प्रकाश किरणं पडतात म्हणुन आणि किरणं सरळ रेषेत प्रवास करतात म्हणुन ती वस्तू आहे तशी जागेवर हुबेहूब आपल्याला दिसते. पण किरणं वाकडी तिकडी झाली तर ?आहे की नाही गंमत.

दुपारच्या वेळेस उष्णतेमुळे जमीन खुप गरम होते. त्यातुन निघणारी गरम हवा वातावरणात असलेल्या हवेत मिसळते. वातावरणातील हवा कमी उष्णतेची असल्यामुळे त्यातुन जाणारी किरणं रिफ्रॕक्ट वाकडीतिकडी होतात. त्यामुळे आपण पाहिले की आपल्याला ते पाण्याचा पृष्ठभागासारखे दिसते. .. ते मृगजळ असतं.


थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे काहीवेळासाठी तरी थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर असतो. सूर्याकडून येणारे प्रकाशकिरण घन हवेतून कमी घन हवेत शिरताना वक्रीभूत होतात, आणि परिवर्तित होऊन वाळवंटातून प्रवास करणाऱ्या माणसाच्या डोळ्यापर्यंत पोचतात. त्यामुळे माणसाला वाळवंटाच्या सपाटीवर आजबाजूच्या झाडांची किंवा आकाशाची प्रतिमा दिसते, आणि पाण्याचा भास होतो. माणसेच नव्हे तर मृग (पशू) देखील फसतात. त्यामुळे या प्रतिमेला मृगजळ म्हणतात.

थंड हवेच्या थरावरचा गरम हवेचा थार फार काळ टिकत नसल्याने मृगजळे थोड्या वेळातच अदृश्य होतात.

मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तन द्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून मधून, हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यत: तपमानातील कमी जास्त होण्यामुळे होते.

 अन्न शिजवताना शेगडीवर पण हालचाल दिसते जी उष्णतेमुळे होते. ते पण मृगजळ झालं. ते खरतर नाही पण आपल्याला दिसतयं..

 वाळवंटात आपण भटकून गेलो. खुप खुप भुक लागली आहे आणि आपण पाण्याचा कण शोधत आहोत. त्यावेळेस आपलं डोकं मेंदू काम करणे बंद करुन देतो. आपल्याला आभास व्हायला लागतात की ते समोर पलिकडे नारळाचे झाड आहे पाण्याचा तलाव आहे ते ही मृगजळचं झालं.


वाळवंटात कधीकधी आपल्याला दुरून पाण्याचा तलाव दिसते पण जवळ गेल्यास पाणी नसते. जेव्हा आपण महामार्गेवर गाडी चालवतो तेव्हा देखील समोर पाणी दिसते पण जवळ गेल्यास  काहीच नसते. ह्यास भ्रमेला आपण मृगजळ म्हणतो.


सामान्यतया, सूर्यापासून प्रकाशाचे किरण वातावरणातून आपल्या डोळ्याकडे प्रवास करतात. परंतु, वेगवान वायु आणि थंड हवेमुळे प्रकाश वेगवेगळ्या वेगाने प्रवास करते.मृगजळ तेव्हास होते जेव्हा जमीन गरम असते. गरम जमीन त्यावरची वायुला ही गरम करते.एक ऑप्टिकल भ्रम म्हणजे मृगजळ म्हणता येईल.

बऱ्याच ठिकाणी मृगजळ ही संज्ञा वापरली जाते.

तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात,

"मृगजळ दिसे साचेपन ऐसें|खोटीयाचे पिसे उर फोडी||

जाणोनि का करा आपुलाले घात|विचारा रे हित लवलाही||

संचित सांगाती बोळवण सवे|आचरले द्यावे फळ लेने||

तुका म्हणे सेखी स्मशान ते वरी|संबंध गोवरी आगीसवे||

तुकाराम महाराज म्हणतात मृगजळ जसे खरे वाटते, खरे असल्यासारखा भास होतो आणि त्याच्या नादाला लागून मग जंगलातील हरणे जसा स्वतःचा जीव फाडून घेतात ,त्यातील पाणी खरे असे वाटून ते पिण्यासाठी वेडेपिसे होतात.

मानवी संसारबद्दल सांगितले त्यांनी.

एकूण काय तर खुळा आशावाद म्हणजे 'मृगजळ'.

लहानपणी आईवडिलांनी दाखवले ले मृगजळ अजूनही आठवते दरवर्षी पहिल्या नंबर बद्द्ल चे मृगजळ.

आमच्यासाठी पहिल्या 3 नंबरात येणे म्हणजे खूप काही होते. आईवडील तेव्हा आमिष दाखवायचे पहिला नंबर आला की नविन पुस्तके, नवीन bags, सुट्यांमध्ये वाचनासाठी वेगवेगळी गोष्टींची पुस्तके,आणखी बरेच काही......त्या पहिल्या नंबर साठी होणारी चढाओढ, खूप खूप मेहनत करून केला जाणारा अभ्यास, आणि शेवटी निकालाच्या दिवसाची वाट पाहात राहणं.

नंबर नाही आला तर पुढच्या वर्षी च्या तयारी ला मुकाटपणे सुरु राहणे, नित्याचेच होते.पण नंबर यायचा तो मोठया भावाचा.ज्यांचा नंबर आला  त्याला सर्वकाही नवीन ,नंबर नाही आला त्यांना मग थोडं ते पुढच्या पगारावर त्यातील काही देण्याचे  सांगितले जायचे .झालं मग काय मुकाटपणे जुनी पुस्तके वापरायची.आणि पुन्हा नव्याने अभ्यासाला लागायचे .पण ज्या वर्षी पहिला नंबर यायचा त्या वर्षी ची गोष्टच निराळी असायची. सर्वकाही नविन, नविन, नविन पुस्तकाचा गंध तर खूपच वेगळा असायचा. पहिल्या नंबर चा खरा आनंद मात्र नवीन पुस्तकांचा गंध हुंगण्यात आणि मित्र मैत्रिन्नींना  नवीन वस्तू  दाखवण्यात असायचा.

मोठं झाल्यावर ,स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर कळला होता अर्थ आईवडिलांनी दाखवलेल्या त्या मृगजळाचा.आहे न कुतूहल मृगजळाचे.....


                 #मृगजळ

           #कुतूहल मृगजळाचे 

             

                 संदर्भ-इंटरनेट ,चित्र -इंटरनेट

                          उज्वला तायडे  ,अकोट

      







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....