'कुतूहल'....once upon a mulberry plant......
आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने
कुतूहल माझ्या अंगणातीलmulberry plant चे...
Once upon a mulberry plant.....
माझा शाश्वत लहान असताना माझ्या प्रत्येक story ची starting अशीचअसायची .....
त्याला कारणही तेवढेच महत्वाचे आहे..
माझ्या आईने माझ्या एका वाढदिवसाला दिला होता, mulberry plant झाले त्याला 10वर्षे.
दररोज माझ्या शाश्वतला झोपताना 4ते5 गोष्टी सांगाव्या लागायच्या.आज त्या mulberry वर खूप मोठ्या संख्येने चिमण्या, कोकीळ पक्षी, बुलबुल पक्षी आणि इतरही पक्षी भरपूर प्रमाणात येतात.
कारण त्यावर पक्ष्यांना थंड पाणी पिण्यासाठी3,4 earthen pot, 2 bird feeder लावले आहेत त्याने.
दररोज सायंकाळी,सकाळी पक्ष्यांची शाळाच भरते त्या mulbery वर, खूप खूप आनंद होतो पक्ष्यांची शाळा बघून.
या झाडाचे इंग्रजी नाव mulberry, तर मराठीत तुती/तुतु, शहतूत,मोरस,अशी बरीच नाव आहेत ह्याला.
सामान्यपणे जंगलात,आणि शेती पण केली जाते याची.भारतात रेशीम किड्यांची खाद्य म्हणून याच्या पानांचा उपयोग केला जातो.
तुतींची पिकलेली फळे फारच रसाळ आणि गोड असतात. पिकलेली ताजी फळे तशीच खातातम्हणजे आम्ही तरी तशीच खातो.
फळांचे सरबत देखील बनवतात,त्यापासून काही खाद्यपदार्थ देखील बनतात .फळांच्या रसावर आंबवण्याची (fermentation)प्रक्रिया करून मद्य देखील बनवतात.सुकलेल्या फळांपासून पाव देखील बनवतात.तुतीच्या फळांमध्ये शेकडा जलांश87.5,प्रथिने1.5,मेद(स्निग्धपदार्थ)0.4,कर्बोदके8.3,धागे1.4,खनिज 0.9असतात; दर 100gm ला कॅल्शियम 80mg,फॉस्फरस40mg,लोह 1.9mg असतात.याशिवाय कॅरोटीन, thayamin,निकोटींनीक ऍसिड,रायबोफ्लेविन, ascorbic acid इ असतात.
तुतीच्या काही जाती फळांकरिता, लाकूड मिळवण्यासाठी करतात. क्रिडा साधने बनवण्यासाठी लाकूड वापरतात.या झाडांची पाने देखील उपयोगी आहेत.
मला अजूनही आठवते जेव्हा मला आईने plant gift केले तेव्हा जेमतेम ते 4ते5च महिन्याचे होते.
तेव्हा त्याला छान छोटी छोटी फळं लागली होती.
खूप कुतूहल वाटायचे तेव्हा त्या mulbery चे. एवढे छोटे असताना त्या mulberychya अंगाखांद्यावर छोटी छोटी फळं लागली होती. त्या एवढ्याश्या mulbery वर केवढि मोठी जबाबदारी त्या फळांची.
मला तेव्हा ते झाड बघून बालिका वधू ची आठवण होत होती.मग काय गोष्टीत एक चिमणी आली, एक दाणा नेला अश्या गोष्टी सांगत कधी झोप लागायची हे समजायचं पण नाही. जेवतानाही तेच चिऊ ये दाना खा, पाणी, पी भुर्रर्रर्रर्रर्र उडून जा, चिऊताई ची famous story चिऊताई चिऊताई दार उघड....
अश्या गोष्टींचा मुलांच्या मनावर छान परिणाम होऊन मोठी झाल्यावर चक्क ती त्याचे application करतात. खूप कौतुक वाटते या गोष्टीच.
आता तर माझ्या शाश्वतनि प्रत्येक खिडकीत, गॅलरीत, झाडावर, घराच्या बगिच्यात, सर्व ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी, आणि त्यांचे food चारा ठेवले.
आता तर रसाळ mulberry खायला खूप खूप पक्षी येतात. कोकीळ पक्ष्याचे जोडपे तर जणू दत्तक घेतले त्या झाडानि .तशी अंगणात भरपूर झाडे आहेत पण ह्या झाडाला जास्तच महत्त्व आहे, कारण ते आईने दिलंय😊
तसेही आईने दिलेली जगातील कोणतीही गोष्ट नितांत सुंदर आणि विशेष असते.
एकदा तर limitच झाली, मला माझा मुलगा म्हणायला लागला तू आपल्या story मध्ये pig ला का नाही घेत ,मला pink lips चे pig ची story सांग म्हणून हट्ट केला, काहीतरी सांगून वेळ निभावून घेतली खरी तेव्हा. सकाळी उठून मला माझा मुलगा गोष्ट सांगतो म्हणाला त्यानं त्याची story सुरू केली......
Once upon a time there is a mulberry plant .one night all pig s, with their family member sat on mulberry tree &eat whole berries .from that morning who ate unripe mulberries their lips becomes pink.😊.&who ate ripe,black mullberries becomes black.
तेव्हा फार कौतुक वाटलं होतं त्याच्या कल्पना शक्तीचे.
एकूणच काय तर निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता बद्दल awareness निर्माण होत होता त्याच्यात.
सर्व पक्ष्यांच्या तुलनेत चिमणी आपल्या जरा जास्त म्हणजे अतिपरीचयाची आहे असे म्हटले तरी काही हरकत नाही.एकूण काय तर नेहमीच दिसणारा असा पक्षी म्हणजे चिमणी.परंतु आता मात्र चिमणीला जागाही नाही, अंगणही नाही,आणि आजकाल घराघरांत चिमणीला घरटं पण नाही.काय तर म्हणे चिमणी जगायला हवी म्हणून 2010 पासून चिमणी दिवस साजरा करतात.पण जेव्हा प्रत्येक व्यक्तीत प्राणिमात्रावर दया करण्याचा, त्यांच्यावर प्रेम करण्याचा विचार जागृत होईल तेव्हाच चिमणी दिवस साजरा होईल.
नाहीतर मग आपल्याला ग दि मांचे
"या चिमन्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या....
या गाण्याची आठवण करून द्यावी लागेल.
ग दि मांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे ...
'आई तुझ्या तीर्थावर भरली एकच कळशी..
त्या कळशीच्या तीर्थावर झालो आजन्म पावन..
आई तुझ्या नावाच्या पारंब्या बांधतील इमला..
इमल्यात नांदतील पिढ्यांवर पिढया
जोजवतील संसारा राघू चिमण्या बोबड्या.....
सकाळी चिमण्यांच्या किलबिलाटात होणारी पहाट हल्ली मोबाईल alarm नि होते.चिमण्या गायब होण्यामागचे एक कारण म्हणजे वृक्षतोड.
प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवनिशी जुळलेला एकमेव पक्षी म्हणजे चिमणी. आता मात्र चिमणी दिसेनाशी झाली .आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे फार दुर्मिळ झाले आहे.
हल्लीच्या जीवनशैली मध्ये मानवाने आपलं अंगण देखील कमी केले आहे, तेव्हा अंगणात झाडे कशी लावणार, आणि झाडे नाही म्हणजे पक्षी पण नाही.
प्रत्येकाने आपल्या बालपणीच्या आठवणीतील चिमणीची गोष्ट मुलांना सांगितली तर त्याचा चिमणीच नाही तर इतरही पक्ष्यांना फायदा होईल. सोबतच एखादे तरी झाड अंगणात लावून पक्ष्यांच्या संरक्षणार्थ थोडे धान्याचे दाणे आणि पाणी दिले तर आनंदही मिळेल.
शेवटी काय तर "ज्याने चोच दिली तो चाराही देईल",या म्हणीवर च पक्ष्यांना समाधान मानावे लागेल.
हल्ली तर एक गाणं खूपच प्रसिद्ध झाले आहे,
चिव चिव चिमणे , अगं ये चिमणे
काय रे चिमण्या
हे बघ आणलाय मोत्याचा दाणा
बघु बघु बघु पण ठेवायचा कुठे ’ ?
हे बघ आणलाय मोत्याचा दाणा
बघु बघु बघु पण ठेवायचा कुठे ’ ?
अशी गाणी सुद्धा मुलांच्या जास्त प्रमाणात लक्षात राहतात.....
थोडं सर्वांनी mulberry सारखे किंवा इतरही एखादे झाड लावून पक्षी संवर्धनातून आनंद मिळवू शकतो...
आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने माझ्या mulberry लाही महत्त्व आले.
#कुतूहल mulberries चे
# चिमणी दिवस
#चिमणी गाणे
संदर्भ-काही माहिती, इंटरनेट
चित्र-काही चित्रे इंटरनेट
@उज्वला तायडे, अकोट
Nice 👍
ReplyDeleteNice 👌👍
Deleteछान लिहिलंय , माझ्याकडे सिंगापूर चेरी चे झाड आहे , त्यावरही खूप लहान मोठे पक्षी येत असतात , चिमण्या खूप निरनिराळ्या प्रकारच्या आहेत . आपल्या साध्या चिमण्यांची ही खूप घरटी आहेत , मस्त वाटतं सकाळ संध्याकाळी 👍
ReplyDeleteमनापासून लिहिलंय. मला आवडलं.
ReplyDeleteमाझ्या आईनेही आमच्या घराच्या खिडकीबाहेर छोट्या मातीच्या पात्रांना आणि वाट्यांना तारांनी वर बांधून हलते पक्षी जेवण झोपाळे तयार करून लावले होते. त्यात एकीकडे खाणं आणि दुसरीकडे पाणी असायचं. पक्षी पाणी पिऊन त्यात आंघोळही करतात. ते फारच नयनमनोहर असतं.
आमच्या घरासमोरून गाई, म्हशी, बकर्यांचे जथ्थे जायचे. आमच्या अंगणात गवत असल्याने चरून जायचे. आईने त्या चारणार्यांकडून म्हशीच्या गळ्यात बांधतात त्या घंटा घेऊन या झोपाळ्यांना लावल्या. मग तर मौजच मौज. झोपाळ्यावर पक्षी आला रे आला की आम्हाला आत आवाजाने कळायचं. आवाजाच्या तीव्रतेवरून लहान पक्षी की मोठा, वारंवारितेवरून नुसतेच बसलेत का आंघोळ करतात हे ही कळायचं आणि मग पक्षांच्या नकळत आम्ही ते बघूही शकायचो.
आमच्या घरी तीन चार मांजरीही होत्या. त्यांचा ह्या पक्षांवर डोळा असायचा. पण त्यांनी जर या झोपाळ्यावर स्पर्श केला तर त्यांच्या वजनाशे या घंटा फार मोठ्याने वाजायच्या आणि मांजरी स्वतःच घाबरून पळून जायच्या.
तो काळच रम्य होता. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
छान च लिहिलय
ReplyDeleteआम्ही लहानपणी माझ्या मैत्रिणीकडे जायचो तिथे होत हे झाड
सगळे याला शेतुक म्हणायचे
लाल खायचं म्हणजे ओठ लिपस्टिक सारखे दिसतील असे वाटायचे
खूप छान मनातलं कागदावर
खुप छान आणि ओघवते. निसर्गाचे ॠण कसे असते, मानव आणि सभोवतालचा परीसर यातील बारकावे ही छान टिपले आहेत. 👍👌🤓
ReplyDelete