'कुतूहल'मोगऱ्याच्या सुगंधी फुलांचे....



      "मोगरा फुलला ,मोगरा फुलला|
फुले वेचिता बहरु कळीयासी आला||"
असा सूर कानी पडताच कुणाच्याही नकळत वाऱ्याच्या मंद झुळकेने उमलणारी  मोगऱ्याची कळीच  आठवते.
सौन्दर्याचीही एक परिभाषा असते. तसेच सुगंधाचीही.
मोगऱ्याचा हा सुगंध  देखील मादक पासून ते मनाला शांती देणारा, पावित्र्यदायक अशा अनेक छटा घेवून येतो. जाई, जुई, मधुमालती,चाफा, बकुळी, शेवंती आणि पारिजातक या भारतीय सुगंधी फुलांच्या मांदियाळी मध्ये मोगरा मात्र आपला पहिला नंबर ठेवून आहे. खरोखरच पहिलाच नंबर मिळवला या मोगऱ्याने  म्हणूनच तो देवाच्या चरणी सुगंधी फुल म्हणून तर एखाद्या नायकिणीच्या केसातला गजरा म्हणून देखील जाऊन बसला. एवढ्यावरच थांबला नाही तर लग्नसारख्या मंगलप्रसंगी प्रत्येक सुवासिनीच्या केसातील स्थान अबाधित ठेवून बसला.
मोगऱ्याच्या खूप प्रजाती आहेत, बट मोगरा, सिंगल, डबल, मोतीया, गुडूमलाई, मदनबाण.हजारी मोगरा तर यावर्षी माझ्या एका मैत्रिणीने वाढदिवसाला दिला होता.
,त्यातील मदनबाण हा मोगरा मला मझ्या घरीच womens day ला gift मिळाला
मदनबाण म्हणजे मोगऱ्याच्या कुळातील राजा असे म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. ह्याच्या नावात आणि दिसण्यात कळीत  बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणू नाजूक, सुंदर नारच दिसते .आणि उमल्ल्यावरही त्या फुलाच रूपही तितकच विलोभनीय, मनमोहकदिसते.
मोगऱ्याला मात्र मोठं करण्यात अनेक साहित्यिकांचा देखील मोठा वाटा आहे. साहित्यिकांनी त्यांच्या प्रतिभावान लेखणीने मोगऱ्याची भरभरून स्तुती केली त्यामुळेच मोगऱ्याची कीर्ती सगळीकडे पसरली.
मदनबाण मोगरा हा बाराही महिने फुले देणारा आहे. Jasmine samba madanban असे शास्त्रीय नाव आहे.मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले उन्हाळ्यात च येतात. मोगऱ्याला देखील इतर झाडांप्रमाने सूर्यप्रकाशाची जास्त आवश्यकता असते. याला कमीत कमी 4ते8तास उन्हाची गरज असते.4तासापेक्षा सूर्यप्रकाश कमी असेल तर फुले येणारच नाहीत किंवा कमी येतील.
जरी मोगऱ्याला प्रखर ऊन प्रिय असले तरी पाणी देखील तेवढेच महत्वाचे आहे. जर पाणी कमी असेल तर झाडाची पाने पिवळी पडतात आणि पाणी जास्त झाले तर झाडांच्या मुळांच्या व्यवस्थेला धक्का बसून मुळे सडू लागतात. त्यापेक्षा पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. वसंत ऋतूच्या सुरुवातीला शेणखत घातले तर कळ्या छान बहरतात.
या फुलातील बाष्पनशील तेलाचा उपयोग सुवासिक अत्तर बनवण्यासाठी, साबण ,उदबत्ती बनवण्यासाठी करतात. आयुर्वेदातही मोगरा फुलांचे खूप महत्त्व आहे.
भारतातील अनेक ठिकाणच्या महिला मोगऱ्याचा वापर आपल्या केसांत। माळण्यासाठी ,केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी करतात. चीनमध्ये तर 'ग्रीन टी' चा स्वाद वाढवण्यासाठी मोगऱ्याच्या फुलाचा वापर केला जातो. मग तो jasmine tea म्हणून ओळखला जातो.
केसांच्या सजावटीसाठी पुरातन काळापासून या फुलांचा वापर केला जातो.जेव्हा मी नवीन job वर रुजू झाले तेव्हा शाळा सुरू होवून जेमतेम15दिवस झाले असावेत. short break मध्ये 2मुली स्टाफ रूम बाहेर उभ्या राहून हातांनी काहीतरी खुणावत होत्या, बाहेर येवून बघते तर माझ्या हातावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा ठेवून खास तुमच्यासाठी आणला म्हणत केसात लावण्याचा आग्रह करत होत्या. चक्क पिन सुद्धा गजऱ्याला लावून आणली होती त्यांनी, नुकत्याच आठवीतून नवव्या वर्गात गेलेल्या मुली होत्या त्या.
पल्लवी, प्रीतम असे नाव होती त्यांची. नको म्हंटले तर हिरमुसल्या होवून आग्रह धरला त्यांनी, कारण गजरा हा नवऱ्याने दिलेलाच फक्त आजपर्यंत केसात माळला गेला होता. त्यांची समजूत काढून त्यातील 2च फुले केसांत माळली आणि गजरा घरी गेल्यावर लावते म्हणून सांगितले त्यांना. खरं सांगते त्या दोनच फुलांनी जणू काही एक नवीन ऊर्जा मिळाली होती.तेव्हापासून मग काय सुरु झाला सिलसिला वेगवेगळ्या फुलांचा गजरा, फुले देण्याचा इतरही मुल्लींचा.कधीकधी तर चक्क काटेकरोंट्याची जांभळी, पिवळ्या फुले देखील मिळायची.मग काय एक flower पॉट च केला होता, जेणेकरून सर्वांना च फुलांकडे बघून प्रसन्न वाटेल. एकदा तर बोलताना indirectly सांगूनच टाकले भाषणात मला  रंगीत फुलांपेक्षा सुगंधी  पांढरी, त्यातही मोगऱ्याची फुले आवडतात म्हणून.
आपली गाडी दिसताच मुले फुले घेवून धावत पळत येतात .पण खरं कुतूहल, आनंद तेव्हाच वाटतो जेव्हा त्यांच्या हातातील फुलांचा स्वीकार thank you असे स्मित करत केला की. तेव्हा मात्र त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद जणूकाही परीक्षेत पहिल्या नंबर मध्ये पास झाल्यासारखा, अगदीच टीपण्यासारखा असतो.
शाळेमध्ये तर औषधी वनस्पती च्या बगिच्यात मोगऱ्याची जास्त झाड आहेत.
चाफा जसा अबोलपणे स्मित हास्य करीत आपल्या सुगंधाची दरवळ करतो.मोगऱ्याचे तसे नाही तो नेहमीच अगदी खळखळून हसत मुक्तपणे आपल्या सुगंधाची उधळण करतो.मला तर वाटते मोगऱ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उन्हामुळे होणारी मरगळ  मोगऱ्याच्या सुगंधी दरवळींने दूर होत असावी.
  मोगऱ्याचा सुगंध इतका आल्हाददायक आहे की त्याची नुसतीच 3,4 फुले जरी घरात ठेवली तरी मन लगेचच प्रसन्न होऊन जाते. चित्तप्रवृत्ती प्रसन्न करण्यासाठी आणि मनावरील औदासिन्य झटकण्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग होतो. मोगऱ्याच्या फुलात, त्यापासून काढलेल्या त्याच्या तेलात antibacterial, antiseptic, antiviral गुण असतात.
एकदा moderator कडे paper च्या निमित्ताने  जाणे झाले तेव्हा ,मॉडरेटरच्या पत्नीने दिलेली ओंजळभर मोगऱ्याची फुले अजूनही आठवणीत आहे,विशेष म्हणजे त्यांचा सुगंध.
मनाला आनंद देणारा मोगरा फुलला ,बहरला की सर्वांनाच आपलंसं करून टाकतो.
भारतातील अनेक ठिकाणच्या स्त्रिया मोगऱ्याचा वापर केसांत माळण्यासाठी करतात,मंगल प्रसंगी करतात.
जेव्हा जेव्हा मोगरा बहरतो तेव्हा तेव्हा 'घाल घाल वारा पिंगा माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात' या गाण्याची प्रकर्षाने आठवण होते.
इवलेसे रोप लवियेले दारी,
तयाचा वेलू गेला गगणावरी ..…..
मोगऱ्या सारखे असे रोप प्रत्येकाच्यादारी असावे..…
   

                             संदर्भ-थोडी माहिती-इंटरनेट
                           चित्र-काही इंटरनेट
                  @उज्वला तायडे, अकोट

Comments

  1. छान माहिती

    ReplyDelete
  2. Wow...so good ujju..keep it up

    ReplyDelete
  3. Va...aaav Bali well written✌️
    Nice information about Mogra
    Mazya kunditil mogra pan aata bahru laglay 😊
    Keep it up dear😘😘

    ReplyDelete
  4. Very nice information about Mogra,

    ReplyDelete
  5. मोगरा माझे अगदी आवडते फुल!....तसाच दरवळ तुमच्या लेखातही जाणवला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....