'कुतूहल'सुर्यसंक्रमणाचे,मकरसंक्रांतीचे...☀️🌞
एखादी वाईट घटना घडली, की 'संक्रांत आली' असे म्हटले जाते; ते योग्य नाही. दिनमान वाढत जाणे, सूर्य धनू राशीतून मकर राशीत जाणे,यात अशुभ असे काही नाही.
संक्रांत सणाचा मूळ हेतू जर कायम ठेवायचा असेल तर मकर संक्रमणाचा आग्रह न धरता उत्तरायणाशी संक्रांतीची म्हणजे तिळगुळाची सांगड घातली पाहिजे..सूर्याचा प्रवास मेष ते मीन या राशीतून होतो. प्रत्येक राशीत सूर्याचा प्रवेश झाला की त्या संक्रमणास संक्रांत म्हणतात. ज्या राशीत प्रवेश होईल त्या राशीच्या नावाने ती संक्रांत ओळखली जाते. उदा. सूर्याने मेष राशीत प्रवेश केला की त्या संक्रांतीला मेष संक्रांत म्हणतात. सर्व आबालवृद्धांना जी माहिती आहे ती मकरसंक्रांत तिळगूळ देण्याघेण्याशी या मकरसंक्रांतीचा संबंध आहे. त्यामुळेच ही संक्रांत सर्वपरिचित आहे. तिळगूळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि संक्रांतीच्या आगेमागे हिवाळा असतो, त्यामुळे ही तिळगूळ वाटपाची प्रथा पडली याबद्दल मतभिन्नता नसावी असे वाटते.
उन्हाळा काय, हिवाळा काय हे ऋतू आहेत आणि ऋतूस कालावधी असतो. ऋ तू सहा धरले तर प्रत्येक ऋतूचा काळ दोन महिन्यांचा असतो. सूर्यस्थानाचा म्हणजे सूर्य कोणत्या राशीत आहे याचा विचार केला तर वर्षभरात समसमान दिवस व रात्र असल्याचे दिवस वर्षांतून दोन असतात व या दिवसांना विषुव दिवस म्हणतात. सूर्याने मेष आणि तूळ राशीत प्रवेश केला की हे दोन दिवस विषुवदिवस म्हणून धरले जातात. सूर्य जेव्हा जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो त्या दिवशी तो कर्क राशीत प्रवेश करतो. हा ऋतू म्हणजे उन्हाळा. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. तेथून पुढे उत्तरायण सुरू होते असे मानले जाई किंवा काही हजार वर्षांपूर्वी अशी स्थिती प्रत्यक्षात होती. सारांश सूर्याचा कर्कराशीतील प्रवेश किंवा कर्क संक्रमण म्हणजे दक्षिणायन आणि सूर्याचा मकर राशीतील प्रवेश म्हणजे उत्तरायणाची सुरुवात अशी परिस्थिती भूतकाळात होती म्हणून भूगोलातही यावरून कर्कवृत्त आणि मकरवृत्त असे दोन शब्द आले आहेत.
वर सांगितलेले उत्तरायणाचे आणि मकर संक्रमणाचे साहचर्य आता संपुष्टात आले आहे. सध्या आपल्या पंचांगात दिलेला सूर्याचा मकर प्रवेश आणि उत्तरायण यांच्यात फारकत झाली आहे. आपली पंचांगे सूर्याचा मकर प्रवेश १४ जानेवारीला दाखवितात.
लहानपणी आजीकडून ऐकून होते की संक्रांतीनंतर दिवस तीळा एवढा मोठा होत जातो म्हणून
उत्तरायण मात्र प्रत्यक्षात २२ डिसेंबरला होते. म्हणजेच उत्तरायण अगोदर होते आणि मकर प्रवेश नंतर होतो. थोडक्यात मकर संक्रमण आणि उत्तरायण हा दिवस पूर्वीप्रमाणे एकच नसून त्यांच्यात फरक आहे आणि हा फरक वाढत जाणार आहे. म्हणूनच संक्रांत केव्हा साजरी करायची याचा विचार करणे आवश्यक झाले आहे.
उत्तरायण आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दोन्ही घटना जेव्हा एकाच वेळी घडत असत तेव्हा मकरसंक्रांत साजरी करणे, तिळगूळ वाटणे हे नैसर्गिक परिस्थितीला समुचित होते. सांस्कृतिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आणि हेतूचा विचार करता मकरसंक्रांतीची म्हणजेच तिळगूळ समारंभाची गाठ उत्तरायणाशी बांधणे संयुक्तिक वाटते म्हणजे संक्रांतीचा प्रमुख निकष उत्तरायणाचा सुरुवातीचा दिवस हाच असतो. मकर संक्रमण हा निकष गौण आहे. उत्तरायणाच्या दिवशी संक्रांत न करता ती मकर संक्रमणाच्या दिवशी करणे हे कळत असून न
भारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात. जी गोष्ट स्वच्छ आणि वस्तुनिष्ठ आहे तिचा पाठपुरावा करणे हीच वैज्ञानिक दृष्टी आहे. रुळलेल्या, परंपरेने चालत आलेल्या गोष्टी सोडून देण्याची समाजाची मानसिकता नसते.
उत्तरायण मात्र प्रत्यक्षात २२ डिसेंबरला होते. म्हणजेच उत्तरायण अगोदर होते आणि मकर प्रवेश नंतर होतो. थोडक्यात मकर संक्रमण आणि उत्तरायण हा दिवस पूर्वीप्रमाणे एकच नसून त्यांच्यात फरक आहे आणि हा फरक वाढत जाणार आहे. म्हणूनच संक्रांत केव्हा साजरी करायची याचा विचार करणे आवश्यक झाले आहे.
उत्तरायण आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दोन्ही घटना जेव्हा एकाच वेळी घडत असत तेव्हा मकरसंक्रांत साजरी करणे, तिळगूळ वाटणे हे नैसर्गिक परिस्थितीला समुचित होते. सांस्कृतिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आणि हेतूचा विचार करता मकरसंक्रांतीची म्हणजेच तिळगूळ समारंभाची गाठ उत्तरायणाशी बांधणे संयुक्तिक वाटते म्हणजे संक्रांतीचा प्रमुख निकष उत्तरायणाचा सुरुवातीचा दिवस हाच असतो. मकर संक्रमण हा निकष गौण आहे. उत्तरायणाच्या दिवशी संक्रांत न करता ती मकर संक्रमणाच्या दिवशी करणे हे कळत असून न
कळल्यासारखे आहे.
भारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात.
मकर संक्रांत हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही तर पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी जोडलेला आहे.
आपल्याला माहिती आहे की वर्षाचे कालमानाने 12 भाग केलेले आहेत.
12 महिने आहेत तशा 12 राशी देखील आहेत. त्या क्रमाने मेष, वृषभ इंत्यादी आहेत.
आपल्याला पृथ्वीवरून सूर्य या 12 राशींच्या चक्रातून जाताना दिसतो.
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून सूर्य सर्वात दक्षिणेकडे 22 डिसेंबर किंवा 1 पौष या दिवशी दिसतो. त्या दिवसानंतर तो उत्तरेकडे सरकताना दिसतो. 22 जून किंवा 1 आषाढ या दिवशी सूर्य सर्वात उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्तावर असतो. मग पुन्हा दक्षिणेकडे सरकायला लागतो.सहा महिन्यानंतर पुन्हा उत्तरेकडे. असे सूर्याचे आयन आपल्याला दिसते.
(खरं तर सूर्य स्थिर आहे. फिरणार्या पृथ्वीवरून आपण त्याला पाहतो म्हणून आपल्याला 'तो' फिरतो असे दिसते. यालाच म्हणतात - सूर्याचे भ्रमण दृगोत्तर होते.)
सूर्य उत्तरेकडे सरकणार म्हणजे ऊन वाढणार - ऊर्जा वाढणार - वनस्पतींना अन्न बनवायला अधिक वाव मिळणार, प्राण्यांना ते खायला मिळणार. जीवाला बरे वाटणार.उर्जा प्रवाह सुरू राहणार, जैवविविधता टिकून राहणार.
आनंदाचे दिवस असले की - उत्साह वाढतो - उत्सव, सण करावासा वाटतो
पूर्वी कदाचित हाच दिवस मकर संक्रांत म्हणून मानत असावेत. कालांतराने पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दक्षिणायनाचा दिवस आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस यात अंतर पडले.
मकरसंक्रांत १४ जानेवारीस येते म्हणजे सूर्याचे मकर संक्रमण त्या दिवशी होते. तर उत्तरायण २२ डिसेंबरला होते. म्हणजे मकर संक्रांतीचा सण आपण उत्तरायणानंतर साधारण २२ ते २३ दिवसांनी साजरा करतो. सूर्याच्या मकर संक्रमणाच्या दिवशी तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम या गोष्टीला आपण चिकटून राहिलो तर आणखी हजार वर्षांनंतर सूर्याचे मकर संक्रमण फेब्रुवारीस होऊ लागेल. उत्तरायण मात्र २२ डिसेंबरलाच होईल. उत्तरायण व मकर संक्रमण यातील तफावत मंद गतीने का होईना पण वाढेल हे निश्चित. तेव्हा संक्रांत सणाचा मूळ हेतू जर कायम ठेवायचा असेल तर मकर संक्रमणाचा आग्रह न धरता उत्तरायणाशी संक्रांतीची म्हणजे तिळगुळाची सांगड घातली पाहिजे.
मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे 'भोगी'.,'न खाई भोगी तो सदा रोगी'हे वाक्य कदाचित सर्वांनीच ऐकलं असेल.भोगी शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा/उपभोगणारा!भोगी हा उपभोगाचा आणि आनंदाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.
हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात.शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो .मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात .या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतीची कामे करण्यास सज्ज होतात.आता हे भोगीची भाजी म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास mix vegetable .यात प्रामुख्याने हरभरा, पावटा,घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, मटार, गाजर, शेंगदाणे,चाकवत, फ्लॉवर ई. भाज्या असतात.शिवाय तिळाचा कूट असतो ह्यात.
भोगीची खिचडी सुध्दा करतात. भोगी ची भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खातात.बाजरी आणि तीळ यामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. संक्रांत या सणाला भारतभर वेगवेगळी नावं आहेत.
काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तीळ घातले जातात .दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे. परंतु आकाश हे पक्षांचेही आहे. धारदार मांजामुळे आकाशात उडणारे अनेक पक्षी घायाळ होतात. स्कूटरवरून प्रवास करणारे प्रवाशीही जखमी होतात. म्हणून धारदार मांजा वापरू नये.
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना आनंद, उत्साह एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत ,रुढी परंपरा यांना फार महत्व दिले जाते.
स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवतात, ही प्रथा विशेष करून महाराष्ट्रामध्ये आहे. हळदीकुंकू समारंभात गावातील ,शहरातील स्त्रिया एका ठिकाणी जमा होतात,किंवा ज्यांना जसे जमेल तसे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, हल्ली तर group वर msg टाकून मोकळे होता येते. या कार्यक्रमासाठी त्या महाराष्ट्रीयन पेहरावात नटून-थटून येतात. एकमेकांना हळदी कुंकू लावून हा कार्यक्रम साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने data transfer, नवीन माहितीची देवाणघेवाण, नवीन collection यांचे माहिती share केली जाते, गप्पा गोष्टी केल्याने mind fresh होवून आनंद होतो.हळदीकुंकवाच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्त्रियांची मात्र दररोज नटण्यामुरडण्याची चंगळ असते.
तसेच यावेळी स्त्रिया एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देतात,
हल्ली तर मैत्रिणी(जवळच्या)असतील तर ठरवून भेटवस्तू दिल्या जातात, त्यातही एक गोडवा असतो, हक्काचा.
भारताच्या खूप साऱ्या प्रांतांमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी रब्बी पिकाची सुरुवात असते. या काळात शेतातील पेरणी झालेली असते आणि अवघड कामे संपलेली असतात मग या वेळी लोक एकत्र येतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, गुरांची काळजी घेतात, एकत्र पतंग उडवणे असे सामूहिक कार्यक्रम करतात.
या सणाला सुवासिनी मटर, हरभरे, ऊस, बोरं, गाजर, गहू mix करून सुगड्याचे वाण देतात .ठिकठिकाणी उखाणे स्पर्धा आयोजित केल्या जातात.एकदा तर चक्क एकच उखाना त्यामध्ये त्यातील आकडा( नंबर) बदलून एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे घेण्याची स्पर्धा जिंकली होती.(उखाणा ★7+2=9....very fine,😃).हळदीकुंकू चे आयोजन करतात, लहान मुलेच नाही तर मोठ्यांपर्यंत सर्वचपतंग उडवतात.'तीळ गूळ घ्या गोड गोड बोला'असे म्हणायची संधी फक्त याच सणाला आहे बरं.
संत कबीर यांनी म्हटलं आहे की,'मधूर वचन सूनने मे भी और कहणेमेभी प्रसन्नता देते है.लेकिन मधूर वचन अहंकार त्याग से ही संभव है.'
तीलगुळाच्या वड्या,तीलगुळाची पोळी, तिळगुळाचे लाडू ,आणि माझ्या आवडता तीलगुळाची करंजी हा पदार्थ तिळाची करंजी माझ्या आईकडून शिकले होते मी, दरवर्षी या सर्व पदार्थांसोबत ,तिळाची करंजीला विशेष महत्त्व देते मी परंतु काही केल्या आईच्या हाताची चव येत नाही माझ्या करंजीला,असो असे सर्वच पदार्थ बनवले जातात.तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने शरीरात थंडीच्या दिवसात उष्णता निर्माण करतात.भरपूर ठिकाणी या दिवशी पतंग महोत्सव सुध्दा आयोजित केला जातो.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात गोड व्हावी असे म्हणतात म्हणून कदाचित भारतात पौष महिन्यात येणारा हा सण नवीन वर्षाची सुरवात गोड व्हावी या उद्देशाने असावा.तीलगुळाचा गोडवा माणसांतील नात्यांमध्ये उतरवण्यासाठीच कदाचित 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला 'ही म्हण तयार झाली असावी.
#तिळगुळ
#तिळगुळ वड्या
#संक्रांत
संदर्भ -इंटरनेट माहिती,
संग्रहीत माहिती -इंटरनेट
चित्र-इंटरनेट
@ujwala tayade, Akot
छान M
ReplyDeleteछान... मकर संक्रांतीच्या सणाची सखोल माहिती
ReplyDeleteखूपच माहितीपूर्ण आणि छान
ReplyDeleteVery good information
ReplyDelete