'कुतूहल' साडी day चे.............

         
              २१ डिसेंबर म्हणे  जागतिक साडी दिवस,आज मात्र सर्वांच्या dp मध्ये साडी दिसली कारण आज साडी day आहे म्हणे......
साडी हा भारतीय स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा.कपाटात कितीहि साड्या असल्या तरीही तरी प्रत्येक साडी खुणावतेच.कपाट उघडल्यावर भलेही मग साड्या अंगावर पडून दररोज लूट झाली तरीही नवीन साडी हवीच असते.साडी हे भारतातले असे अजब वस्त्र आहे की त्याच्या मोहापासून कोणतीही भारतीय स्त्री वाचू शकत नाही.आणि एका स्त्रीला साड्या किती असतील हा तर कुणीच विचार करू शकत नाही, माझ्यामते जर कोणी संख्या विचारली तर ती infinate अगणितच असणार😊.
स्त्रियांचं सौंदर्य खुलावणाऱ्या ६ वार आणि ९ वार पेहरावाचा दिवस.भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहराव. तसा हा पेहराव बहुतांशी भारतातच वापरात आहे, तरी देखील आपली प्रत्येक गोष्ट जागतिक असते.
साडी प्रत्येक भारतीय स्त्रियांच्या अगदी मनाजवळची गोष्ट. लहान मुलगी भातुकली खेळताना अडखळत पण साडी नेसतेच. माझी मुलगी तर लहान असताना पासूनच   कोणतीही नविन साडी आणली की सर्वांत अगोदर तीच घालून बघते. प्रत्येक मुलीला आपल्या आईची साडी नेसायची असते.मग शाळेत नाटकात, नाचात,कोळी गीतावर, गरबा करताना साडी नेसून थिरकते.दरवर्षी teachers day शिक्षक दिनाला मुली ,विद्यार्थी स्वयंशासन मध्ये teaching कमी आणि साडी घालून मिरवणेच जास्त असते. कॉलेजमध्ये ती Saree Day ची आतुरतेने वाट पाहते. कोणती साडी नेसु हा तेव्हा तिच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठा प्रश्न असतो. किती ही भारतीय स्त्री आधुनिक असु दे साडी बद्दल तिच्या मनात एक वेगळे बंध असतात भलेही ते आजी,आई,मावशी, शिक्षिका ह्यांच्या मुळे जुळलेले असतील.
आता तर साखरपुडा पासून तर लग्नाच्या
 साडीच्या खरेदी पर्यंत चा प्रवासआणि
लग्नाची साडी खरेदी ह्या वर एक ग्रंथ लिहिला जाऊ शकतो. लग्नातील मामाची पिवळी साडी, शालु,पैठणी ह्यांला स्त्रियांच्या भावविश्वात वेगळे स्थान आहे.
साडी हे भारतीय महिलांच मुख्य वस्त्र आहे .ही जवळजवळ5ते10 वार लांबीची असून तो एक आयताकार तुकडा असतो.कोणतीही स्त्री असू द्या ती साडी मध्ये जास्त सुंदर दिसते.
साडी कमरेभोवती गुंडाळल्यावर जास्तीचा राहिलेला भाग घड्या घालून नाभीपाशी खोवला जातो त्याला निऱ्या म्हणतात. त्या निऱ्या घालण्याची पण एक style आहे.
कमरेला गुंडाळल्यावर उरलेल्या साडीच्या आकर्षक तुकड्याला पदर, पालव, पल्लू म्हणतात.हा भाग खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात.माझी आई तर ड्युटीवर असल्यापासून आजपर्यंत, अजूनही डोक्यावर पदर असते,1cm व्यासाचे कुंकू/टिकली,डोक्यावरचा पदर आणि cotton साडी. म्हणून ती अजूनही इतर स्त्रियांच्या तुलनेत खूप सुंदर दिसते. काही जणी पदर समोरच्या बाजूने देखील घेतात.
साडीचा जमिनीकडे असणारा तळाचा भाग म्हणजे साडीचा काठ होय.साडीच्या काठावर असणाऱ्या विवक्षित नक्षीमुळे काही साड्यांचे प्रकार सहज ओळखता येतात.
साड्यांचे किती प्रकार आणि विविधता पण मराठी स्त्रियांना पैठणी आणि शालू अगदी मनाच्या जवळचा
"पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा."..
तसेच महाराष्ट्र जवळच्या कर्नाटकातील कशीदा...
काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून,व तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात तर काही त्या त्या राज्यावरून.
साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी),पाचवारी किंवा गोल साडी ,सहावारी किंवा दांडिया,नऊवारी किंवा दहावारी.

रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला!...
डोहाळजेवणांच्या हिरव्या साडीत स्त्रीच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज दिसते. लहान बाळ आईच्या साडीच्या पदराखाली सुखावते.हल्ली आपण वर्षभर खरेदी करत असतो पंरतु पूर्वी एक अंगावर आणि एक दांडीवर असण्याच्या काळात नवीन साडीची घडी मोडणे ह्यांला विशेष महत्त्व होते.
मला मात्र साडी दररोज घालावी लागते म्हणून खूप राग येतो, काय करणार teaching profession.एखाद्या वेळी 👌वाटते .पण दररोज तेच कंटाळवाणे वाटते. पावसाळ्यात तर हद्दच होते, गाडी, गाडीवर साडी, साडीवर रेनकोट वरून पाऊस⛈️कितीही रेनकोट घाला 
पण साडीचा खालचा भाग ओला होतोच,म्हणजे पाऊस काही आपला भिजवण्याचा गुणधर्म सोडत नाही.आणि मग तो ओला लिबलिबित भाग घालून अख्ख्या दिवस ओलाव्यात काढावा लागतो.हिवाळ्यात सुध्दा तेच साडी, त्यावर स्कीवी, आणि वरून पुन्हा long स्वेटर, scarf, सॉक्स, handgloves,जास्त थंडी असेल तर आतून legins... तरीही त्यातून थंडी लागतेच. पण पावसाळ्या पेक्षा थोडा कमी त्रास होतो साडीचा.
हा एक मात्र नक्की workshop, training, किंवा इतर programme असला की मैत्रिणींमध्ये ठरवलं जाते कोणती साडी घालायची कोणती नाही, मागच्या वेळची तर repeat नकोच. काय होतं ना कार्यक्रम, workshop असला की सर्व बायकांचे लक्ष चांगल्या साडीकडे असते, design, print, रंग, पोत, सर्वकाही.मग विशेष काही असलं तर चक्क त्या बाईकडे जाऊन विचारूनच घायचे ,साडीविषयी complement द्यायच्या.
एकदा तर limit च झाली होती, एका अवॉर्ड function मध्ये मी आणि माझी मैत्रीण समोरच्या line मध्ये चेअर वर बसलो असताना मैत्रिणीला बक्षीस मिळाले, मी तिचा फोटो काढत होते, स्टेज वर असणाऱ्या प्रमुख पाहुण्या दोघीही माझेकडे बोट दाखवून काहीतरी विचारत होत्या मला काहीच कळत नव्हतं, नंतर त्यांनी programme संपल्यावर स्टेजवरून उतरताच आम्हा दोघींना गाठून विचारूनच घेतले साडीविषयी,with complement🤗.
कांजीवरम, तनछोई,बनारसी, बांधणी, महेश्वरी, बंगलोर सिल्क, नारायण पेठ   असे अनेक प्रकार आणि नेसण्याच्या भारतात अनेक पध्दती.कपाटात साड्या आवरताना वेळ कसा जातो समजत नाही कारण प्रत्येक साडीची आठवण असते ती कधी आईने, सासुबाईंनी, जावेनी,बहीणीने दिलेली असते किंवा एखाद्या लग्नात मिळालेली असते.त्यांच्यावर परत परत हात फिरतो. आजीच्या आईच्या साड्यांच्या गोधडीत ममतेची आणि  निरपेक्ष प्रेमाची उब असते.
हल्ली आपण रोज कोणी साडी नेसत नाही पंरतु अजूनही साडी खरेदीची ओढ असतेच. लग्न समारंभ, पुजा, सणवारला साडी अजूनही आवर्जून नेसली जाते. स्त्री मरण पावल्यावर सुध्दा तिच्या पार्थिवावर माहेरची साडी चढवली जाते.


 रेशीम हा किटकजन्य धागा आहे. त्याच्या मुख्यत्वे दोन जाती. एक जंगली आणि दुसरी मुद्दाम पैदास केलेली किवा जोपासलेली जात. जंगली जातीत रेशीम किडे तुतीशिवाय अन्य झाडांवर वाढतात आणि रेशीम कोश तयार करतात. हे रेशीम सर्वसाधारणपणे  तपकिरी रंगाचे आणि अतिशय मजबूत असते. भारतात सुरवातीला याच रेशमाचा वापर केला जात असे. आजही केला जातो. हे ’टसर सिल्क’ या नांवाने ओळखले जाते. जपानमध्ये याच रेशमाला वाईल्ड सिल्क म्हणून ओळखले जाई. तुतीच्या झाडांवर किडे पाळून त्यापासून मिळविलेले रेशीम हे आज सर्वाधिक प्रचलित आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाणारे रेशीम आहे. या दोन प्रकारांशिवाय अन्य दोन प्रकारही अस्तित्वात आहेत. ते म्हणजे इरी आणि मुगा सिल्क. याचा अर्थ असा की  रेशमाचे एकूण चार प्रकार आहेत आणि या चारही प्रकारचे रेशीम उत्पादन करणारा भारत हा एकमेव देश आहे. इरीलाच इंडी-इरंडी असेही नांव आहे. यात रेशमाचे किडे एरंडीच्या पानंावर वाढतात. बिहार, बंगाल, ओरिसा,आसामच्या पूर्वेकडे हे सिल्क उत्पादन होते. मुगा सिल्क ही मात्र खास आसामची खासियत. सुगंधी झाडांच्या पानांवर हे रेशीमकिडे वाढतात. त्यातून निघणारे रेशीम अतिशय उच्च प्रतीचे, सोनेरी रंगाचे, अतिशय तलम आणि म्हणून मौल्यवानही आहे.मुगा सिल्क ही आसामची खास परंपरा, संस्कृती आहे. विशेष म्हणजे आसामी वधूसाठी याच रेशमापासून विणलेली साडी वापरायची पद्धत असून ही साडी वधूने स्वतःच विणायची असते.

कोश काढून पाण्यात टाकून जो रेशीम धागा मिळविला जातो, तो जाडीला सगळीकडे सारखा नसतो. त्यामुळे दोन,चार धागे एकत्र करून त्यापासून घट्ट,मजबूत धागा तयार केला जातो.एक मीटर कापड विणण्यासाठी साधारणपणे पंचवीसशे ते तीन हजार कोश लागतात.त्याच्या रंग, पोतावरून त्याची वर्गवारी केली जाते.

साडीवरुन एक गोष्ट आठवते. श्रीकृष्णाचे बोट कापले असते आणि रक्त वाहत असते तेव्हा चिंधी शोधत नारद सुभद्रेच्या महालात येतात तेव्हा ती सांगते माझ्या कडे उंची शालुशेले आहेत पण चिंधी नाही जेव्हा हे द्रौपदीला समजते तेव्हा ती आपला भरजरी शालु  जरासुद्धा विचार न करता कृष्णासाठी फाडुन देते.हाच कृष्णसखा जो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्र पुरवुन तिच्या सन्मानाचे रक्षण करतो.

हल्ली साडी दुकानदार, घरगुती साडीवाल्या भाभी, काकू, मावशी लगेच फोन करून, msg करून सांगतात नवीन साडी स्टॉक आला आहे, सबसे पहले आपकोही बताया,म्हणून सांगतात. groups बनवतात online shopping  सुध्दा असते.माझा मुलगा तर लहान असताना ड्युटी व्यतिरिक्त जर साडी घातली तर लगेच चिपकून जायचा आता कुठे जाते, जावू नकोस म्हणून रडायचा, साहजिकच आहे, त्याला वाटायचे साडी घातली की ड्युटी वर जाईल.हल्ली संक्रांत सण आणि नवरात्रात ठेवणीतल्या साड्या देखील बाहेर निघून मिरवतात.
हल्ली तर साडी कशी नेसायची याचेही workshop होतात, सिल्क, cotton, किंवा इतर कोणत्याही साड्या कश्या सांभाळायच्या याचेही workshop होतात.कोणती साडी घालताना कोणती काळजी घ्यावी हेही शिकवले जाते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे साडी घ्यायची नसतानाही नुसतं साड्या बघायला जाणे यातही भरपूर आनंद मिळतो, मूड freshner म्हणून साडीच्या दुकानाला भेट देता येते. मला तर वाटते साड्या न घेता दुकानात जाऊन बघणे म्हणजे डोळ्यांसाठी eye vitamin घेणेच आहे.
काय मग घेणार का eye vitamin👀.
           
               # कुतूहल साडी day चे
        #साडी,#साडी प्रकार
                     साडी माहिती-internet 
                  
                            @उज्वला तायडे, अकोट
       

Comments

  1. सुरेख वर्णन आणि ओघवती शैली. तसंच साड्यांचे प्रकार हा आणखी एक पदर वर्णनाला लाभला आहे. पण भारतीय किंवा मराठी स्रीकडे सरासरी किती साड्या असतात हा शास्त्रीय:) मुद्दा मात्रं टाळला आहे.
    साडीमुळे होणारी गैरसोय आपण नमूद केली आहे ती योग्यच आहे, तरीही शरीरशास्त्राच्या दृष्टीकोनातून साडी हे स्त्रियांसाठी जगातलं सर्वोत्तम वसन / पेहेराव आहे, असं मी वाचलं होतं.
    आणखी लिखाणासाठी शुभेच्छा
    बायकोला माझ्या मूळगावातून लग्नाची म्हणून घेऊन दिलेली पहिली हिरवी साडी ही आमची दोघांचीही सर्वात आवडती साडी आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....